मिरा -भाईंदर : ९ ऑगस्ट देशभरात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मिरा -भाईंदर शहराला सुद्धा क्रांतिकारकांचा वारसा लाभलेला आहे. मीरा भाईंदर मधील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी महानगरपालिकेने नवघर नाका येथे मिरा -भाईंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभे केले आहे. आजच्या क्रांतीदिनी शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्मारकासमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले.
देशाच्या स्वातंत्र्य साठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारकांना आज देश भर अभिवादन केले जाते. मिरा भाईंदर परिसरात सुद्धा नवघर गाव, गोडदेव, खारीगाव, भाईंदर गाव, उत्तन आदी गावातून विविध  स्वातंत्र सैनिकांनी गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने तर काहींनी क्रांतिकारक मार्गाने तर काहींनी ज्या वेळी जो मार्ग योग्य वाटला, त्या साधना सहित ब्रिटिशांविरुद्या लढ्यात उडी घेतली. हे करताना आपल्या कुटुंबाचा संपत्तीचा विचार त्यांनी केला नाही. तुरुंगवास सोसला. अनेक क्रांतिवीरांचे योगदान अनेक वेळा  प्रकाशातच आले नाही. सुदैवाने तुरुंगातील कागदपत्रे पोलीस स्टेशन मधील नोंदी इत्यादी तत्कालीन सरकारी कागदपत्रांवरून परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांची नावे प्रकाशात आलेली आहेत. ही सर्व नावे आपल्याला नवघर नाक्यावर उभारलेल्या स्वातंत्र्यसैनिक स्मारकावर कोरलेली दिसतात. या सर्व महानिय व्यक्तींच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून महाविद्यालय प्रतिवर्षी क्रांतीदिनी येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करते. स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय परिसरातील नागरिक विद्यार्थी आधी सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमासाठी जमले होते.  स्वातंत्र्य सैनिक कुटुंबीयांचे प्रतिनिधी म्हणून तुळशीदास रामचंद्र पाटील, निर्भय भारत संघटनेचे अध्यक्ष अंकुश मालुसरे, नवघर पोलीस स्टेशन चे पोलिस उप निरीक्षक सावजी, सुभाष किणी, भूषण पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *