सहा महिन्यांपासून बंद असलेली घंटा झाली मुक्त
सुनिल इंगळे
उल्हासनगर : उल्हासनगरातील हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेशी निगडित असलेल्या एका महत्त्वपूर्ण विषयावर अखेर तोडगा निघाला असून, मागील सुमारे सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या देवी मंदिरातील घंटा पुन्हा वाजू लागल्याने परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर-१ येथील जय अंबे माता मंदिरात मंगळवारी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी या विषयात पुढाकार घेतला. हिंदू समाजाच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने त्यांनी मागे-पुढे न पाहता आवाज बुलंद करत मंदिरातील घंटा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमानंतर जय अंबे माता मंदिरात पुन्हा एकदा घंटानाद घुमला. मंदिरातील घंटा खुली करण्यात आली असून, लाऊडस्पीकरवर विधिवत सुंदरकांडाचा पाठ करण्यात आला. त्यानंतर माता राणीची महाआरती उत्साहात संपन्न झाली. यापुढे मंदिरात दररोज नियमितपणे आरती करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.महाआरती आणि सुंदरकांड पाठामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. सिंधी समाजातील स्थानिक नागरिकांनी विक्की भुल्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तहेदिलाने स्वागत केले. हिंदू समाजाच्या आस्था आणि धार्मिक श्रद्धेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी परिवहन सभापती संतोष पांडेय, उत्तर भारतीय शहर संघटक के. डी. तिवारी, म्हारळ युवासेना शहर अधिकारी अमित देशमुख, उपशहरप्रमुख जयकुमार केणी, अरुण तांबे, सुरेश सोनवणे, जितू उपाध्याय, नंदू भोईर, विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मारसळे, कृष्णा सातपुते, विभाग संघटक आदेश पाटील, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपीन सिंग, महिला उपशहर संघटक शशिकला राजपूत, उपविभागप्रमुख विशाल आंबेकर, मुन्ना खान, सागर पगारे, संतोष पाठक, विक्की चौहान, समाजसेवक महेश यादव, ओमप्रकाश मिश्रा, रमेश सिंग चौहान (मिंटी), किशोर साळवी, राजेश त्रिपाठी, कुणाल सिंह, शिवम चुनिया आणि भावेश खत्री यांच्यासह स्थानिक शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि मंदिरांच्या पावित्र्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.या उपक्रमामुळे परिसरात एकच संदेश देण्यात आला की ‘श्रीराम मंदिराला कोणी रोखू शकले नाही, तर उल्हासनगरमध्ये हिंदू मंदिरातील आरती आणि श्रद्धेला कोण रोखणार?, मंदिर हे आमच्या श्रद्धेचे केंद्र आहे, आरती हा आमच्या भक्तीचा आवाज आहे आणि हिंदू समाजाच्या आस्थेचा सन्मान झालाच पाहिजे! हिंदुत्वाच्या विचारांसाठी, हिंदू समाजाच्या आस्थेसाठी आणि मंदिरांच्या सन्मानासाठी हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर सदैव मैदानात राहतील’, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *