अनिल ठाणेकर
ठाणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अभियानांतर्गत सन २०१८ पासून ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑनलाइन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर येथे गटविकास अधिकारी अशोक मंगलदास भवारी यांना उमेद संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी उमेद संघटनेच्या वतीने विजया टिक्कल, मंदा कापसे, अरविंद शहापुरे यांच्यासह उमेद अभियानातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील महिला आणि नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व उपक्रम पोहोचविण्यात उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीने कामे करून घेतली जात असून, त्यासाठी आवश्यक असलेली मोबाईल उपकरणे, डिजिटल साधने, इंटरनेट, वीज आणि नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र व पुरेसा मोबदला द्यावा, प्रत्येक कर्मचाऱ्याला शासकीय मोबाईल व आवश्यक डिजिटल साधने उपलब्ध करून द्यावीत, तसेच ग्रामीण भागातील वीज व नेटवर्कच्या समस्यांमुळे ऑनलाइन काम पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानधनावर करू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच, उमेद अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना शैक्षणिक पात्रतेची अट नव्हती. त्यामुळे आता अचानक नवीन शैक्षणिक पात्रतेचे निकष लावून सन २०१८ पासून सातत्याने काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण व सुविधा देण्यात याव्यात. त्यांच्या दीर्घ सेवाकाळाचा आणि अनुभवाचा विचार करून मानधनात योग्य वाढ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.उमेद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सहानुभूतीपूर्वक व तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, या प्राथमिक सभेत अद्याप संघर्षाचे अधिकृत नेतृत्व करणारी समिती निवडण्यात आलेली नाही. आगामी बैठकीत दहा गावांतील शेतकऱ्यांच्या सहभागातून संघर्ष समितीची निवड करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. “जमीन आमची, निर्णयही आमचाच” या भूमिकेतून दहा गावांतील शेतकरी आता संघटित होत असून, ३० सप्टेंबरच्या मोर्चाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
