अनिल ठाणेकर

ठाणे : विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक लढविणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त करुया, हाच संकल्प आपण घेऊया, अशी सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस फक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आनंद परांजपे म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालाच्या निमित्ताने कुठेही हताश न होता विधानसभा निवडणुकीसाठी संघटन अधिक बळकट करणे आणि जास्तीत जास्त ताकदीने येणारी विधानसभेची निवडणूक लढणे हे उद्दीष्ट कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यानी पक्षाचे संघटन शेवटच्या बुथपर्यंत नेण्याचे काम केले पाहिजे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आपण सर्व कार्यकर्त्यांनी करुया, हाच संकल्प आपण घेऊया हीच सदिच्छा सगळ्यांना देतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संदेश पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, श्री. रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य श्री. नितीन पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री. विजय भामरे, श्री. अजित सावंत, श्री. निलेश कदम, ब्लॉक अध्यक्ष श्री. प्रविण खताळ, श्री. शंकर कोळेकर, श्री. समीर शेख, वॉर्ड अध्यक्ष श्री. साई प्रभू, श्री. रामचंद्र सकपाळ, श्री. सौरभ धुमाळ, महिला पदाधिकारी सौ. मायाताई केसरकर, युवक पदाधिकारी श्री. दिपक पाटील, विद्यार्थी सेल चे पदाधिकारी, अल्पसंख्यांक सेल चे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. हुसेन सर आणि इतर  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *