अनिल ठाणेकर

ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात विहिर स्त्रोतद्वारे उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी  १२ महिने गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ७२० योजना राबविण्यात येत आहेत. मुरबाड तालुक्यात जल जीनव मिशन अंतर्गत २०२ योजना राबविण्यात येत असून या सर्व योजना भूजलावर आधारित आहेत. मुरबाड तालुका डोंगराळ व कठिण खडकाने म्हणजे मॅसिव्ह बेसाल्ट ने व्यापलेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ यावर्षी विहिर तयार करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात काम सुरू करण्यात आले होते. या विहिरीच्या मागिल वर्षी जून अखेर या स्रोताची जमीनीपासून ९.५० मीटर स्थिर पातळी होती यंदा मे महिन्यात जमीनीपासून ५.२५ मीटर स्थिर पातळी आढळून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०० मीटर ने पाणी पातळी वाढ झाल्याने हा स्त्रोत शाश्वत झाला आहे. स्त्रोत शाश्वत करण्यासाठी पाच आढवे बोरवेल खोदण्यात आले. या कामाची दखल वेळोवेळी घेतल्यामुळे यदां उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
सन २०११ मधील जनगणनेप्रमाणे गावातील लोकसंख्या १ हजार ७४७ असून सरासरी अंदाजे ७० हजार लिटर पाण्याची अवश्यकता असून विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहण्याचे उत्तम कामकाज ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. या कामामुळे गावकऱ्यांसाठी शाश्वत स्त्रोत उपलब्ध असणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध पाणी साठा तपासून विविध ७२० योजनाचे काम हाती घेण्यात आले आहे.  खुटल बारागावातील ग्रामस्थांना या विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहिल अशा प्रकारे काम करण्यात विभागाने यश मिळवले आहे. याठिकाणी जागा निश्चिती पासून ते कामाची सुरुवात करण्यापर्यंत विविध तांत्रिक पध्दतीने जागेची तपासणी करण्यात आली होती. यासाठी सहायक भूवैज्ञानिक सपना बोरकर, ग्रामस्थाचा प्रत्यक्ष सहभाग व वसुंधरा संस्थेच्या सहकार्यामुळे बंधारा दुरुस्तीचे काम उत्तमरित्या पुर्ण झाले आहे, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी यांनी सांगितले.
चौकट
विहिरीची सन २०२२-२३ मधील जून महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ९.५० मीटर स्थिर पातळी. विहिरीची सन २०२३-२४  मधील मे महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ५.२५ मीटर स्थिर पातळी. सद्यस्थितीत जमीनीपासून पाण्याची पातळी – ४:३० मीटर स्थिर पातळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *