अनिल ठाणेकर
ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली.तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.
मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष्य साधण्याकरिता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबाबतीतला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत आहे. मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील माझे सहकारी माजी नगरसेवक यांच्या मागणीनुसार हा ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. इथल्या आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काहीवर्षात पीए व ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा प्रसिद्धी माध्यमांनीच प्रसिद्ध केला आहे. पण आम्ही मात्र नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नागरी विकास कामांमार्फत देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, महायुतीच्या राज्य शासनाकडून उपलब्ध ५० कोटी निधीचा उपयोग होणार आहे. मुंब्रा कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कौसाच्या पुढील लोकवस्ती आठी, वाय जंक्शन च्या पुढेल लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली.
तर प्रभाग क्रमांक ३२ पॅनलसाठी ५ कोटी, प्रभाग क्रमांक ३३ पॅनलसाठी ७. ६० कोटी रुपये, मिराज खान व आशरीन राऊत यांच्या पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अजिज शेख व जाफर नोमानी प्रभाग क्रमांक ३० पॅनलसाठी ८.४० कोटी रुपये, मोरेश्वर किणे आणि इतर यांच्या प्रभाग ३१ पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अनिता किणे व विष्णू भगत २६ पॅनलसाठी ८.५ कोटी रुपये, प्रकाश बर्डे प्रभाग क्रमांक २५ पॅनलसाठी ७.२० कोटी रुपये, याप्रमाणेच उद्यान, सुशोभीकरणसाठी ७ कोटी रुपये, दिवा येथील २९ नंबर पॅनलसाठी २५ लाख रुपये अशापद्धतीने या ५० कोटीच्या निधीचे विकास कामांसाठी वितरण केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानत आहे. डंकेकी चोटपर सच्चेपणाने काम करत आहोत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार, लोकांमध्ये जावून, लोकांना विचारुन, लोकशाही पद्धतीने विकास कामांसाठी प्रभागनिहाय हा ५० कोटीचा निधी खर्च होणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा, प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नईम खान, माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेवक राजू अन्सारी, अजीज शेख, इब्राहीम राऊत, मोरेश्वर किणे, मिराज खान, विश्वनाथ भगत तसेच तकी चेऊलकर, प्रभाकर सावंत, मनिषा भगत, राजनाथ यादव, जसबीर शेख, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
