Author: bittambatami.com

मराठवाड्यात चार महिन्यात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : अवघा देश लोकसभेच्या निवडणूकीत दंग असताना या देशाला जगवणारा शेतकऱ्याचे दुख: संपता संपत नाहीय. दुख:च्या ओझ्याखाली हा शेतकरीच संपत चालल्याची विदारक आकडेवारी समोर आलीय. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धूमाकुळ

मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर…

मुंबईकरांचा निघाला घामटा !

मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट…

‘कौरव सेने’विरोधात आता धनुष्य उचलायचंय-फडणवीस

नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे एकनाथ शिंदेची पांडव सेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कौरव सेना आहे. आपल्याला आता या कौरव सेनेविरुध्द धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?-अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…

शिवाजीपार्कवर ‘गुडबाय’ मोदी सभा !

दोन कॉलम उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल मुंबई: शिवाजीपार्कवर शुक्रवारी होणारी मोदींची सभा ही पंतप्रधान म्हणून त्यांची शेवटची सभा असणार आहे. ‘गुडबाय’ मोदी अशीच ही सभा असणार आहे असा हल्लाबोल करीत ४ जून नंतर नरेंद्र मोदीं हे…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?- अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…

भाजपाला मतदान करणाऱ्यावर बीडमध्ये तलवारीने हल्ला

० बीडमध्ये मराठा आक्रमक ० दगडफेकीमुळे तणाव ० जरांगेचा सरकारला इशारा बीड : लोकसभा निवडणूकीत गावात येऊन भाजपाला मतदान का ‎‎केले, अशी विचारणा करून‎ अशोक राऊतमारे यांच्या घरावर‎ सहा जणांनी दगडफेक करून ‎तलवारीने हल्ला केला आहे. ‎बीड शहरातील नांदुर घाट गावात पिंपरगव्हाण…

शिवाजीपार्कवर आज ‘मनसे’ कमळ फुलणार

स्वाती घोसाळकर मुंबई : दादरचे शिवाजीपार्क अनेक एतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. भारतातील सर्वपक्षीय अनेक दिग्गज नेत्यांनी या मैदानावर सभा गाजवल्या आहेत. याच एतिहासिक सभांच्या मालिकेत भर टाकणारी सभा उद्या शुक्रवारी दादरच्या शिवाजी…

ऑलिवंट, ऑर्थर, एस पुलांच्या पुनर्बांधणीची गरज नाही

रेल्वे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेला पत्र मुंबई : माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल या तीन पुलांच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेला कळवले आहे. रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई शहर भागातील पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील (महारेल) अधिकाऱ्यांची बुधवार, १५ मे रोजी संयुक्त बैठक पार पडली. मुंबई शहरात सुरू असलेली पुलांची कामे वेगाने, तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या बैठकीत दिले. मुंबई महानगरपालिका आणि महारेल यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामात समन्वय असावा, जेणेकरून नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. तसेच पुलांच्या पुनर्बांधणी कामांदरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर भागातील जीर्ण पुलांची दुरूस्ती आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका आणि महारेलने संयुक्तपणे रेल्वेवरील पुलांची कामे हाती घेतली आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, उप प्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (व्यवसाय विकास आणि वित्त) सुभाष कवडे, महारेलचे व्यवस्थापक (नियोजन) जितेंद्र कुमार, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक असीतकुमार राऊत, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक श्रीरामगिरी श्रीकांत आदी उपस्थित होते. मुंबईत रेल्वे मार्गांवर असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो. प्रत्यक्ष पूल उभारणी प्रकल्पाची कामे ही महारेलमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल (दादर) आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तीन पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मंजुरी मुंबई शहरातील करी रोड पूल, माटुंगा (रेल्वे खालील पूल), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजुरी देण्यात आली. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच ऑलिवंट, ऑर्थर आणि एस (भायखळा) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेने २४ एप्रिल २०२४ रोजी महापालिकेला पत्र पाठविले आहे. हे पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणीची आवश्यकता नाही असे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. मुंबई शहरातील चार पुलांच्या कामाची सद्यस्थिती रे रोड पूल – ७७ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. भायखळा पूल – ४२ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. टिळक पूल – ८ टक्के काम पूर्ण. घाटकोपर पूल – १४ टक्के काम पूर्ण.