मुंबईला वादळी वाऱ्याचा तडाखा
बेकायदेशीर होर्डींग पडल्यामुळे आठ ठार, शेकडो जखमी मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज वादळी वाऱ्याचा तडाक बसला. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईची पार दैना उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोलपंपावर महाकाय…
बेकायदेशीर होर्डींग पडल्यामुळे आठ ठार, शेकडो जखमी मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज वादळी वाऱ्याचा तडाक बसला. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईची पार दैना उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोलपंपावर महाकाय…
मुंबई : नाशिकला अवघ्या दोन तासांसाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत या जड बॅगात दडलयं काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…
पालघर : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्यात ११ लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची जी टक्केवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक सरासरी ६०.६० टक्के मतदान झाले आहे. आज नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड…
उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…
अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या संयुक्त प्रचारार्थ रविवारी कळवा येथील खारीगाव मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
पटणा : बिहारमधील भाजपचा चेहरा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत…
मुंबई – इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येताच देशात जीएसटीच्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद आम्ही थांबवू. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. हा कर दहशतवाद आम्ही थांबवणारच असे…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुटीत गावी गेलेल्या मुंबईकरांनी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आर. जी. हुले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अलका हुले यांनी ग्रामीण भागातून ‘चलो मुंबई’चे बॅनर लावत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. मे महिन्याच्या सुटीत अनेक मुंबईकर कुटुंबासहित गावी जात असतात. काही जण मतदान असतानादेखील मुंबईत येऊन आपले कर्तव्य बजावत नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी रायगडमधील आंबेगाव गावात ‘मतदानासाठी मुंबईत चला’, असे आवाहन बॅनरद्वारे केल्याचे आर. जी. हुले यांनी सांगितले.
कासा : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते. सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली. उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही. तलासरीमध्ये गारांचा पाऊस तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.