Author: bittambatami.com

निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक

ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील  नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.

गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंची चमक

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक किसन कदम यांचे निधन

मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन  सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना  समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा  स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता. कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी  आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी एका कंपनीत वाढवली भागीदारी!

‘टाटा सन्स’ने समूहाच्या आणखी एका कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. ‘टाटा सन्स’ने सिंगापूर गुंतवणूक कंपनी ‘टेमासेक’कडून दहा टक्के शेअर्स खरेदी करून ‘टाटा प्ले’मधील आपला हिस्सा वाढवला आहे. या करारानंतर ‘टाटा…

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार “सक्षम ॲप”

विशेष मनोज शिवाजी सानप आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ…

मतदान रंगले, सरशी कोणाची?

विश्लेषण प्रा. नंदकुमार काळे एव्हाना मतदानाचे आकडे समोर येत असून मतदानाच्या तिसर्‍या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र उमेदवारांमधील चुरस, पक्षांचे यशाचे दावे आदी लक्षात घेता ही निवडणूक इतिहासात वेगळी…

अतृप्त आत्मा !

गत ४५ वर्षांपासून महाराष्ट्रावर एक अतृप्त आत्मा फिरत असून हा आत्मा कायम महाराष्ट्र सरकार अस्थिर करत असतो अशा आशयाचा आरोप करणारे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका प्रचारासभेत बोलताना…

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १ मे हा महाराष्ट्र स्थापना दिवस जल्लोषात साजरा झाला. यावेळी राज्यपाल आणि मुख्यंत्र्यांनी राज्यातील सुरक्षा बलांची सलामी स्वीकारली… छाया –…

संजय निरुपम शिंदेंच्या सेनेत  

मुंबई : काँग्रेसमधून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संजय निरुपम 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार…