Author: bittambatami.com

जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सन्मान मॅरेथॉन’चे आयोजन

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवनदीप फाउंडेशन आणि जीवनदीप वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता “महिला सन्मान मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी, आत्मविश्वास वृद्धीसाठी व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. टिटवाळा येथील पद्मावती रॉयल सोसायटी येथून या मॅरेथॉनची सुरवात होणार असून ३ कि.मी. अंतर पार करून घोटसाई गाव प्रवेशद्वार येथे सांगता होईल. यामध्ये १८ ते ३० वर्षे व ३० वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतात मात्र नाव नोंदणी अनिवार्य आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ९१६७५६३४१२, ९५६१३६३१३३

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा- नरेश म्हस्के

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा- नरेश म्हस्के अनिल ठाणेकर ठाणे, कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचे वेळापत्रक साफ कोलमडले आहे. सात तास, पाच तास विलंबाने गाड्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहीत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासन्‌तास उशिराने धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक १ मार्चचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस २२११९ ही गाडी सुमारे सात तास उशिराने धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालेले नाही. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल, तर इतर एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येणे कठीण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गाड्यांच्या विलंबनाबाबतची एसएमएस सूचना प्रणाली पूर्णपणे अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना रेल्वे स्थानकांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. होळी, पालखी त्यांनतर मे महिन्याची सुट्टी आणि येणाऱ्या सण उत्सवानिमित्त लाखो कोकणवासी रेल्वेने आपल्या गावी जात असतो. कोकण रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित असल्याची प्रवाशांची भावना आहे. रेल्वेमुळे प्रवासातील वेळेचीही बचत होत असते. त्यामुळे लाखो कोकणकर रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या भावनेचा आदर करून कोकण रेल्वे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता वेळेचे काटेकोर नियोजन प्रभावी करून तांत्रिक सुधारणेवर भर देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

महागाई आणि वास्तव

महागाई आणि वास्तव भारताने आता महागाईचे नवे मोजमाप आणले आहे. उच्च-वारंवारतेचा डेटा (हाय फ्रिक्वेन्सी डेटा), ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील किंमती, डिजिटल पेमेंट्स यांमधून प्रत्यक्ष-वेळेतील किंमत बदल टिपणे आदींचा विचार आता…

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था अनिल ठाणेकर मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने काल दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत: VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ, VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,’ असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप ठाणे: अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करा, हे हल्ले इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, संयुक्त राष्ट्राची सनद तसेच सर्व आंतरराष्ट्रीय करार यांना निर्लज्जपणे धाब्यावर बसवून करण्यात आले आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णतः डावलून हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांतून स्पष्ट होते की त्यांचा या चर्चांवर कधीच विश्वास नव्हता. अमेरिका ही एका आक्रमक दबंग शक्तीप्रमाणे वागत असून, सार्वभौम देशांवर मनमानीपणे हल्ले करत आहे. इराणवरील हा हल्ला अलीकडेच व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि क्यूबाला दिलेल्या धमक्यांनंतर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा संपवल्यानंतर तात्काळ इराणवरील हा हल्ला करण्यात आला आहे. भारत सरकारने आपला मैत्रीपूर्ण देश असलेल्या इराणवरील या हल्ल्यांचा ठामपणे निषेध करून तात्काळ युद्धखोर कारवाई थांबवण्याची मागणी केली पाहिजे, असे आवाहन माकपने केले आहे.

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर: ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणतात कि, “दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन  पिसवलीतील जीआरसी हिंदी शाळेत उत्साहात होळी साजरी कल्याण : समाजातील वाईट, खोटेपणा आणि अहंकार यांचे प्रतीकात्मक दहन करून होळी साजरी करण्याचा संदेश देत कल्याण पूर्वेतील पिसवली येथे…

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात  अडकलेल्या भारतीयांसाठी दिवसभर मोफत जेवण मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील मुंबईमूळ असलेल्या उपाहारगृहाने अडकलेल्या भारतीय नागरिक आणि पर्यटकांसाठी दिलासा…