विकास होईल अफाट, विरोधक होतील भुईसपाट – एकनाथ शिंदे
विकास होईल अफाट, विरोधक होतील भुईसपाट – एकनाथ शिंदे यावेळी मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार अरविंद जोशी मिरा-भाईंदर: मिरा -भाईंदर विकासाची नवी उड्डाणे घेण्यास सज्ज आहे. हे शहर आपले आहे…
विकास होईल अफाट, विरोधक होतील भुईसपाट – एकनाथ शिंदे यावेळी मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार अरविंद जोशी मिरा-भाईंदर: मिरा -भाईंदर विकासाची नवी उड्डाणे घेण्यास सज्ज आहे. हे शहर आपले आहे…
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६चे कामकाज पारदर्शक रितीने व सुरळीतपणे व विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा…
प्रभाग २८ च्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाचे १५ कलमी ‘गॅरंटी कार्ड’ जाहीर शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित…
पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली शिवसेनेने करुन दिली देवाभाऊंना आठवण मुंबई : ५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ…
महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश दिवा : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश…
ठाणे पूर्व, पश्चिम, आनंद नगर, कशीश पार्क, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर यांसारख्या प्रमुख मार्गांवर एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅली करी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रचार केला.…
ठाणे : भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेन उघडकीस आणल आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये म्हणजे ५०० रुपयांच्या ६ नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात होते. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत होते अशी माहीती मिळताच येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. भाजपाचे विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेचे हा व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत आहेत.
महायुतीचा ‘वचननामा‘ जाहीर ० ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत ० २४ तास पाणी ० लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपा, एकनाथ शिंदें यांची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आरपीआय यांच्या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही कायकाय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. आम्ही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असा…