Author: bittambatami.com

शाळेची बस आल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाची चिंता दूर

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय या शाळेसाठी प्रवासी बस आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता दूर झाली आहे. सद्यस्थितीत मराठी शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीला अनेक शाळा  सामो-या जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी…

खासदार नरेश म्हस्के यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले…

वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी कूच करणार

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार   हरिभाऊ लाखे नाशिक : अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी अंबड येथून गुरुवार १६ जानेवारी सकाळी ८ वाजता पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. २२ जानेवारी रोजी राज्यपाल यांना भेटून निवेदन देणार आहोत या आंदोलनात शेवटी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. अंबड व सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली. त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती. एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या : 1994 च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती एमआयडीसीला देण्यात आली. ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी. एम आय डी सी व नासिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP v ETP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली त्यामुळे शेती पिकत नाही. सन 1973 ला जमीन संपादित झाल्यानंतर त्यांच्या लेआउट मध्ये 4 ते 5 मीटर चे रस्ते सोडल्याने आज उरलेल्या जमिनीत अंतिम लेआउट करता येत नाही. एमआयडीसीतील अनेक पडीत भूखंडाचे छोटे छोटे तुकडे करून बिल्डर व गुंतवणूकदार यांना वाटप करण्यात येत असल्याने उद्योजकांना भूखंड मिळत नाही. अंबड चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने गेल्या 20 वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. एमआयडीसीत अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा वापर थांबविण्यात यावा. अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे स्वरूप मोर्चेकरी साधारणता 100 ते 125 प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील सुरुवात दिनांक 16/1/2025 पासून अंबड येथून 1) 16/1/25 मुक्काम 1ला घोटीच्या आसपास 2) 17/1/25 मुक्काम 2रा कसारा खर्डीच्या आसपास…

भांडुप परिमंडलात पाच महिन्यात ८५३ वीज चोरट्यांना महावितरणचा दणका

५ कोटी ८५ लाखांची वीजचोरी उघड   भांडुप : महावितरणच्या भांडुप परिमंडलात अधिक हानी असलेल्या वीजवाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडील ५ कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. अधिक हानी असलेल्या ६० वीजवाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीजजोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदीं विविध उपाययोजनांमुळे महसुलात ४० लाख १४ हजार ५४१ युनिट विजेची भर पडली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये ठाणे मंडल कार्यालयांतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वाशी मंडल कार्यालयातील ४०२ जणांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी सापडली. तर पेण मंडल कार्यालयातंर्गत १९३ जणांकडे ५९ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. तर अधिक वीज हानी असलेल्या ६० वाहिन्यांवरील ४ हजार ६५२ सदोष वीजमीटर बदलण्यात आले. ४ हजार ३४५ जणांनी नवीन वीजजोडणी देण्यात आली. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १२४ ग्राहकांना पुनर्रजोडणी देण्यात आली. १३.४ किलोमीटर कमकुवत वीजतारा बदलण्यात आल्या व जवळपास १० किलोमीटर एरिएल बंच (इन्सुलेशन असलेली वाहिनी) बसवण्यात आली. परिणामी ठाणे मंडलात १० लाख २७ हजार ६७ युनिट, वाशी मंडलात सर्वाधिक २१ लाख ७९ हजार ४६१ आणि पेण मंडलात ८ लाख ८ हजार १३ युनिट विजेची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली. 00000

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतली विशेष मुलांची भेट

ठाणे : विशेष मुलांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, शाळा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे. याचबरोबर सामान्य मुलांबरोबर या मुलांचा…

 अप्पा शिंदे अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती कार्यालयाचे उद्घाटन

29 जानेवारी रोजी अप्पा शिंदे यांचा कल्याणकरांच्या वतीने नागरी सत्कार   कल्याण : 29 जानेवारी रोजी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचा अमृतमहोत्सवी म्हणजेच 75 वा वाढदिवस असून तो कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित साजरा होणार आहे. याकरिता कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. आप्पासाहेब अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती असे या समितीचे नाव असून या समितीच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक सचिन पोटे, नीलेश शिंदे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे, माधुरी काळे, नरेंद्र सूर्यवंशी, अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, विष्णु जाधव, संदीप तांबे, संदीप माने, उमाकांत चौधरी, रुपेश गायकवाड, विजय भोसले, मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी संपूर्ण कल्याण करांच्या माध्यमातुन अप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री मंडळींसह आणखीन काही दिगग्ज नेत्यांची देखील उपस्थित लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. तसेच या समितीत निलेश शिंदे, प्रशांत काळे, सचिन पोटे, नाना सूर्यवंशी, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे यांसह कल्याण पूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असणार आहे. यात प्रामुख्याने 21 पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून १०१ पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत. त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याण पूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना  केले आहे. 00000

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी आनंद परांजपे – सुनील तटकरे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली. मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका व विचार हे माजी खासदार आनंद परांजपे हे मांडतील, भाष्य करतील. घटक पक्षांविषयीची भूमिका, इतर राजकीय भूमिका यांवर पक्षाचे इतर सर्व प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करुनच पक्षाची भूमिका मांडतील. तर आनंद परांजपे हे, सखोल अभ्यास व माहिती घेऊनच, पक्षाची धेय्य धोरणे व भूमिका, प्रसार माध्यमांसमोर मांडतील, वक्तव्य करताना आपल्या पक्षाबद्दल गैरसमज व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही मुख्य प्रवक्ते म्हणून आनंद परांजपे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

कोपरखैरणे व ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल…

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील –

ठाणे : घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड…