Author: bittambatami.com

 भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे उद्घाटन

आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेंची प्रमुख उपस्थिती ठाणे,   २० (प्रतिनिधी) : भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिकेतील भाजपच्या दालनातून ठाणेकरांच्या हिताची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त करीत दोन्ही आमदारांनी मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांचीही उपस्थिती होती. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या सदस्यसंख्येनुसार महापालिकेकडून प्रशस्त दालन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या तळमजल्यावर गटनेत्यांसाठी दालन देण्यात आले. या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरातील नागरिकांनी भाजपला कौल दिला. यापुढील काळात गटनेता दालनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जनहितांच्या कामांना न्याय मिळेल. ठाणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. ठाण्यातील २५ लाखांहून अधिक नागरिकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. महापालिकेकडून जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत. महापालिकेसंदर्भातील विविध नागरी सुविधांसाठी नागरिकांनी गटनेते कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन गटनेते मुकेश मोकाशी यांनी केले. या वेळी भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी गटनेते संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, नगरसेवक सुनेश जोशी, दीपक जाधव, सिताराम राणे, वैभव कदम, सुरेश कांबळे, विकास पाटील, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, उषा वाघ, वेदिका पाटील, अनिता ठाकूर यांच्यासह भाजपाचे ठाण्यातील सरचिटणीस विक्रम भोईर, सचिन पाटील, समिरा भारती, पदाधिकारी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, अश्विन शेट्टी, स्वप्नाली साळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

– राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या

अण्णा बनसोडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी.. मुंबई -राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी  द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक कायद्याप्रमाणे व्हावी

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या मूळ हेतूचे उल्लंघन मानला पाहिजे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ७ जानेवारी २०२६ आणि २ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार अनिवार्य केलेली ही  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची निवडणूक प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा माननीय न्यायालयाला योग्य वाटेल त्याप्रमाणे देखरेख केली जावी. अशी मागणी हीलिंग हँडचे युनिटी पॅनल चे संयोजक डॉ तुषार जगताप, डॉ संजय वाठोरे, डॉ ललित आनंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. या  निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात रजिस्ट्रार  त्यांच्या पूर्ववर्तींनी मतदार यादी तयार करताना केलेल्या गंभीर चुका टाळण्याची विनंती केली आहे. एमएमसी निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज उपलब्ध नसणे. वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांना पत्र, नियमानुसार आक्षेप आणि सूचना. नावे वगळल्याबद्दल सहसचिवांना पत्र, सूचना, दिशाभूल करणारी, कायद्यानुसार अनिवार्य असूनही प्रसिद्ध केलेल्या याद्या कार्यालयात ठेवल्या नाहीत. असे अनेक आरोप यावेळी करण्यात आले.

 शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर राज्य शासनाकडून कौतुकाची थाप पडू दे

 राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य राहील. तिला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही, अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले होते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले. या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगाने वाढणारा फॅटी लिव्हरचा धोका

 भारतातील प्रत्येक तिसरा नागरिक प्रभावित मिरा -भाईंदर जागतिक यकृत दिन २०२६ निमित्त मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सने मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) — ज्याला पूर्वी NAFLD/NASH म्हणून ओळखले जात होते — या आजाराच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “सुदृढ सवयी, निरोगी यकृत” या थीमअंतर्गत समोर आले आहे की भारतातील सुमारे ३० % लोकसंख्या फॅटी लिव्हरच्या समस्येने प्रभावित असू शकते. हा एक सामान्य पण सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दिसणारा आजार असल्याने अनेकदा तो दुर्लक्षित राहतो. MASLD चा थेट संबंध आजच्या बदलत्या जीवनशैलीशी आहे. असंतुलित आहार, लठ्ठपणा, मधुमेह आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे यामागील प्रमुख घटक आहेत. सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे दिसत नसल्यामुळे आजार ओळखणे कठीण जाते. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा आजार सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर अवस्थांमध्ये रूपांतरित होऊ शकतो. मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे  डॉ. इमरान शेख, कन्सल्टंट जीआय, एचपीबी आणि जीआय ऑन्कोसर्जन म्हणाले, “मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज म्हणजेच मेटाबॉलिक बिघाडाशी संबंधित फॅटी लिव्हर हा एक ‘सायलेंट’ पण झपाट्याने वाढणारा धोका आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे हा आजार आता तरुण वयोगटातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सुमारे 9०% लिव्हरचे आजार वेळेवर जीवनशैलीत बदल करून टाळता येऊ शकतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी केल्यास हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रणात आणता येतो किंवा उलटवता देखील येतो.” डॉ. इमरान शेख, पुढे म्हणाले आजकाल तरुणांमध्ये लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दीर्घकाळ बसून राहणे, जंक फूड आणि साखरयुक्त पेयांचे अतिसेवन, तसेच शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत. २० ते 3० वयोगटातील तरुणांमध्येही आता फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढताना दिसत आहे, जो वयोगट पूर्वी कमी धोक्याचा मानला जात होता. यासोबतच वाढता मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोम हा धोका अधिक गंभीर करत आहे. मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सने विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना नियमित लिव्हर तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. कारण लिव्हरचे आजार सुरुवातीला लक्षणविरहित असतात आणि अनेकदा उशिरा निदान होते.

 ठाण्यातील नगरसेवकांना महापालिकेचा `बॅच’!

 भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : राज्यातील आमदारांना व मुंबईतील नगरसेवकांना देण्यात येत असलेल्या `बॅच’प्रमाणे ठाण्यातील नगरसेवकांना महापालिकेचा लोगो असलेला `बॅच’चे आज वाटप करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना बॅच देण्याची महासभेत प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. ठाणे महापालिकेत अनेक नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, त्यांच्याबाबत प्रशासनाला माहिती व्हावी, यासाठी बॅच देण्याबाबत मागणीचा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला होता. तर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अनुमोदन दिले होते. विधीमंडळ व मंत्रालयात प्रवेशाबरोबरच प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, यासाठी आमदारांना विधीमंडळाचा लोगो असलेले बॅच सादर केले जातात. मुंबई महापालिकेकडून नगरसेवकांना बॅच उपलब्ध केला जातो. त्यानुसार ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवकांना बॅच उपलब्ध करावे, असा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला. त्याला महापौरांनी मंजूरी दिली. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज उपस्थित नगरसेवकांना बॅचचे वाटप करण्यात आले. या निर्णयाबद्दल नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

पावसाळ्यापूर्वी प्रभाग २९ मध्ये नालेसफाईला वेग

 शिळफाटा ते साबेगावात कामांची सुरुवात दिवा-  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २९ मधील शिळ फाटा- महापे- ठाकूर पाडा डोंगराळ भागातील काच गल्ली ते शिळफाटा येथील मोठ्या नाल्यापर्यंत नालेसफाई कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. तसेच साबेगाव परिसरातील अनेक वर्षांपासून तुंबलेले गटारही कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफ करण्यात आले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील, नगरसेविका अर्चना निलेश पाटील, बाळाराम पाटील, सावन ठाकूर, अरिफ कुमार, स्थानिक रहिवासी तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी नगरसेवक बाबाजी पाटील, प्रभागातील लोकप्रतिनिधी, महापौर आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दोन दिवसांत नालेसफाई सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनानुसार आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभागातील इतर अनेक ठिकाणीही टप्प्याटप्प्याने नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

४ गुणवंत विद्यार्थ्यांचा महापालिका सर्वसाधारण सभेत सत्कार

नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१२० या शाळेचा विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणा-या सीड्स ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे…

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी जाहीर

कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपा कल्याण जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार…

डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर

 अलिशान घरातून ६ कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट कल्याण : नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने साकीनाक्यातून जप्त केलेल्या दोनशे एक्स्टेंसी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड झालं आहे. त्यानंतर टिटवाळाच्या हायप्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अश्विनी पॉल या महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या जप्त करुन तिला अटक करण्यात आली आहे. नेस्को प्रकरण उजेडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टेंसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली. त्याच्या चौकशीतून पॉलचे नाव समोर आले. पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती. दोन महिन्यांपूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग तीन दिवस तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिचा शोध सुरू केला. पथक तिच्या टिटवाळा येथील कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचले. त्यात तिचे घर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातून तिचा शोध घेत शनिवारी रात्री पथकाने घरी छापा टाकला. दरम्यान, तिच्या घरातून ६ कोटी किमतीच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या मिळून आल्याने पोलिसही चक्रावले. पोलिस आपल्यापर्यंत पोहचतील, असे तिला वाटले नव्हते. त्यामुळे ती बिनधास्त होती. पोलिसांनी इरफाननंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली. तो पॉल आणि इरफानमधला दुवा होता. पुढे सुफियानमुळे पोलिस पॉलपर्यंत पोहोचले. पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. तेथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती आहे. तिची दोन लग्नं झाली आहेत. तिचा एक पती गुन्हेगार असून, तिची हिस्ट्री पोलिसांकडून काढण्यात येत आहे. पॉलकडून ४ ते ५ फोन आणि ७ ते ८ सीमकार्ड जप्त केली. पार्टी ड्रग्जच्या सप्लायसाठी ती या वेगवेगळ्या क्रमांकाचा तात्पुरत्या स्वरुपात वापर करत होती. तिच्या फोनमधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलरसह वेगवेगळी चिन्हे, अक्षरे कोरलेली आहेत. यापूर्वी नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीजचे चिन्ह होते. तर वरळी पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांवर ऑडीचे चिन्ह होते. इरफानला अटक झाल्याबाबत पॉलला कल्पना नव्हती. पोलिस तिच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत, या विचाराने तिने एवढा साठा घरातच ठेवला. टिटवाळ्याच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी ‘ती’ मुंबईत ड्रग्ज जाळे पसरवत होती. डान्स बारमधून गुन्हेगारीच्या जगात आलेल्या या महिलेने घरातच ६ कोटींचा साठा दडवून ठेवला होता. पोलिसांनी धाडसी कारवाई करत तिचा हा बेबनाव उघड केला आहे.