Author: bittambatami.com

छत्रपतींचा पुतळा उभारणीत कामचुकारपणा

चौकशी समितीच्या अहवालात ठपका राजन चव्हाण सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत कामचुराकरपणा झाल्याचा ठपका या पुतळा कोसळल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशसमितीने ठेवलाय. २६ ऑगस्टला छत्रपतींचा हा पुतळा उभारणीनंतर अवघ्या ९ महिन्यात…

निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…

अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत पीसीसीओई अजिंक्य

मुलींमध्ये एमआयटी, आळंदीचा प्रथम क्रमांक पिंपरी, पुणे (दि. २६ सप्टेंबर २०२४) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

ज्येष्ठ फार्मासिस्ट सत्कार, पोस्टर स्पर्धा संपन्न

 जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त  बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ऍण्ड रिसर्च, डोंबिवली असोसिएशनचा संयुक्त कार्यक्रम डोंबिवली : जागतिक फार्मासिस्ट दिन डोंबिवली शहरात साजरा करण्यात आला. बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ फार्मसी सत्कार, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त अभिमन्यूजी काळे यांच्या हस्ते नीरज इंगळे, सुनंदा बिराजदार, तलाक्षी छेडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, मल्हार नार्वेकर सीईओ, जॉन डिसोझा प्राचार्य, शिक्षक वृंद डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी फार्मासिस्ट उपस्थित होते. कॉलेज कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन यावेळी अभिमन्यू काळे, निलेश वाणी, संजू भोळे, विलास शिरुडे, राजेश कोरपे अन्य पदाधिकारी कॉलेजचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने माजी आयुक्त अभिमन्यू काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा

राजेंद्र साळसकर मु़ंबई – श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील समाधी मंदिर विकास कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून  ६६.११कोटी निधी मंजुर झाला आहे. या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्या नुसार विकासकामाचे भूमिपूजन शुक्रवार ४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सुदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथे होणार आहे. सदर मिटिंगमध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे अध्यक्ष मधुकर नेराळे  यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा मुंबईत घेण्यात आली होती. यावेळी दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत , सुभाष कसाबे, विजय निगडकर तसेच समाज इतर मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. या भूमीपूजन सोहोळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री संत संताजी  जगनाडे महाराज महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख दिलीप खोंड यांनी  सर्व तेली समाज बांधवांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सर्व धर्म गुरूंनी शांती संदेश समाजात रुजवावा ….

 ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे आवाहन रमेश औताडे मुंबई : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित सर्व धर्मीय सद्भावना संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला विविध धर्मातील धर्म गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ज्या वेळी धर्माचा आधार घेऊन स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न होतात. सच्चा धर्माच्या विचारांना बाजूला सारून धर्माच्या नावाने पाखंडीपणा केला जातो  तेव्हा खऱ्या धार्मिकांना त्या पाखंडाचं खंडन करून खऱ्या धर्माच रक्षण करावं लागतं. या संमेलनाला इस्लामचे उपासक मौलाना, जमात ए इस्लाम हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, हिंदू धर्मातील साधू, सन्याशी, बैरागी, वेदशास्त्र पंडित, निरंकारी, तुकडोजी महाराज परंपरेतील गुरूदेव संप्रदायाचे प्रबोधनकार, बौद्ध भिकू, भंत्ते उपस्थित होते.

विविध प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग आझाद मैदानात

रमेश औताडे मुंबई : दिव्यांगाना अत्योदय योजनेचा लाभ का मिळत नाही ? दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना तातडीने लागू का होत नाही ? दिव्यांगाना महामंडळाकडून वितरीत केलेले कर्ज माफ का होत नाही ? असे अनेक सवाल करत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही  सरकारचे लक्ष नाही.  कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले त्यात आम्ही ही होतो. मग आमचे कर्ज माफ केले का नाही ? असा सवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगशे साळवी यांनी यावेळी केला. दिव्यांगाना सहा हजार रुपये पेन्शन,  प्रत्येक जिल्हयामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल मिळावेत. दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन खुप उशीरा जमा का होते ते लवकरात लवकर जमा करावे. प्रत्येक जिल्हयामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करून आम्हाला योग्य आसरा देण्यात यावा. रेल्वे जिने हे सरकते असावेत.जेणेकरून आम्हाला योग्य प्रकारे प्रवास करता येईल. असे मंगेश साळवी यांनी सांगितले.

१०० कोटी खर्च झाल्यानंतरही  ‘सायपन’ पाणी योजना बंद

 राज्यातील दुष्काळी भागातील जनतेचे स्वप्न अखेर अपूर्ण रमेश औताडे मुंबई : मुसळधार महापूर येण्यासारखा पाऊस पडला की जनतेला सुरक्षित सुविधा देण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यंत्रणा कामाला लागते. उन्हाळा पडला की टँकर देण्यासाठी जाहिरात केल्यासारखी उपाययोजना सुरू होते. पुढील वर्षी अशीच अवस्था असते. यातून सरकारने धडा घ्यावा म्हणून, विना वीज वापर असणारी  सायपन पाणी वाटप योजना अनुभवी तज्ञ मंडळींनी सरकारला सांगितली. मात्र सरकारने ही योजना १०० कोटी रुपये खर्च करून अद्याप बंदच ठेवली आहे. जनतेसाठी कायमस्वरूपी उपाय योजना केली तर पुढील पाच वर्षांनी मतांच्या जोगव्यासाठी कुणाकडे जायचे ? अशी भीती असल्याने जनता आहे त्रस्त जीवन जगत आहे. त्यामुळे हि योजना सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मनसेचे सांगली जिल्हा सचिव राजेश जाधव यांनी केले आहे. या योजनेचा प्रायोगिक तत्त्वावर आटपाडी तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार होता. सायपन धनगांव पाणी योजना असे नामकरण केले होते. तालुक्यातील ५३ गावांच्या कायमस्वरुपी  पाण्याचा पुरवठा करण्याच्या हेतूने तयार केलेल्या या योजनेवर  जवळपास १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही ही योजना का ठप्प आहे ? ही योजना कार्यान्वित होऊ नये यासाठी कोणाचा राजकीय दबाव आहे का ?  असा सवाल राजेश जाधव यांनी सरकारला केला आहे. सायपन पध्दतीने तालुक्यातील प्रत्येक गावांना या योजनेद्वारे पाणी उपलब्ध होऊन, शुध्द पिण्याचे पाणी तसेच जनतेचे आरोग्य सुरक्षित राहणार होते. सायपन पद्धत असल्याने वीज बिल येणार नसल्याने पैशांची बचतही होणार होती. मात्र सरकार या चांगल्या योजना का पूर्ण करत नाही. लवकरात लवकर सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर  १ ऑक्टोंबरपासून उपोषणास बसणार असल्याचा  इशारा राजेश जाधव यांनी दिला आहे.

मुंबईतील झोपडीधारकांचा मतदानावर बहिष्कार

 फक्त घोषणा करणाऱ्या सरकारच्या विरोधात रमेश औताडे मुंबई :अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा सरकार भागवू शकत नाही. मात्र  निवडणूक जवळ आली की फक्त घोषणा करायच्या. त्याची अंमलबजावणी करण्यात मात्र हात आखडता घ्यायचा. सरकार कुणाचेही आले तरी गरिबांचे प्रश्न मात्र आहे तसेच आहेत. मुंबईतील रेल्वे लगत असलेल्या दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम व इतर झोपडीधारकांना कायमस्वरूपी घरे देतो म्हणून सरकारने आश्वासन दिले होते मात्र अद्याप काहीच कार्यवाही नाही. आम्हाला न्याय कधी मिळणार ? असा सवाल करत झोपडीधारकांनी आता आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे. पश्चिम रेल्वे रुळाच्या लगत असलेली झोपडपट्टी त्यामध्ये प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहीम येथील ५०३ झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन  व महाराष्ट्र शासन यामध्ये संयुक्त बैठक झाल्यानंतर रेल्वे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी ५० टक्के राज्य सरकार व ५० टक्के पच्छिम रेल्वे मिळून संबंधित झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २००८ मध्ये घेण्यात आला. मात्र तो आजही धूळ खात बसला आहे. पादचारी पूल व रोड बनविण्याकरिता पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पच्छिम रेल्वेचे उपमुख्य अभियंता यांनी निर्देश दिले, त्या निर्देशानुसार झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश स्पार्क संस्थेला सन २०१६ ला देण्यात आले होते. मात्र अद्याप काहीच कार्यवाही नाही. पश्चिम रेल्वेच्या कारवाईमुळे संपूर्ण सर्वेक्षण झाले नाही. संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.असा आरोप झोपडपट्टी धारक करत आहेत.

खो-खोच्या १० आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रत्येकी सात लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर

राज्य शासनाकडून प्रशिक्षकांनाही प्रत्येकी १.८७ लाख रुपये मंजूर मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना  रोख पारितोषिक म्हणून मंजूर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात खो-खोतील १० आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्या या खेळाडूंना प्रत्येकी सात लाख व प्रशिक्षकांना १ लाख ८७ हजार ५०० रुपयाचे पारितोषिक मिळणार आहेत. पारितोषिक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा यांनी अभिनंदन केले. पारितोषिकप्राप्त  खो खो खेळाडू : अरूण अशोक गुणकी (सांगली), अमित वरुण पाटील, अवधुत भरत पाटील. (दोघे कोल्हापूर), सुयश विश्वास गरगटे, अक्षय प्रशांत गणपुले (दोघे पुणे ) अनिकेत भगवान पोटे (मुंबई), अक्षय संदिप भांगरे ( मुंबई उपनगर),  अपेक्षा अनिल सुतार (रत्नागिरी), गौरी राजेश शिंदे,निकीता चक्रधर पवार (दोघी धाराशिव).