Author: bittambatami.com

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू,

आजपासून जेल भरो आंदोलना इशारा ! अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर, जोरदार पावसाला न जुमानता सोमवारपासून अंगणवाडी कर्मचारी व संघटक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. २४ तासांच्या साखळी उपोषणात सुमारे ५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिष्टमंडळ मैदानावर परतल्यावर त्यांनी या भेटीबद्दल असमाधान व्यक्त करुन बेमुदत उपोषण, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच २५ सप्टेंबरच्या जेल भरो आंदोलनात राज्यभरातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले. शासनाने अनेक घटकांना मानधनात वाढ देण्याची घोषणा केली आहे. मग शासनाच्या सर्व योजना यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे. शासनाने जीआर काढेपर्यंत हे आंदोलन व उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 000

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट

अशोक गायकवाड   अलिबाग : आदिवासी बांधवांच्या विकासाच्या वाटचालीत मुख्य प्रवाहासोबत आणण्याच्या व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणा-या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मंत्रालय / विभाग पुढील ५ वर्षात उद्दीष्टे निश्चीत करून त्यांची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी करेल. या अभियाना अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी सक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ध्येय सामाविष्ट आहे. त्यासाठी आदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते बांधणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्या पर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देणे तसेच अंगणवाडी केंद्र उभारून याद्वारे पोषण अभियान राबविणे या व यासारख्या अनेक सुविधांचा सामावेश करण्यात आला आहे. आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोवर राहणे) यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, वनक्षेत्रात राहणाऱ्या FRA पट्टाधारकांकडे मिशन अंतर्गत विशेष लक्ष पुरविले जाईल. या अभियानांतर्गत जिल्हयातील शासकीय आणि वसतीगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले क्षमता केंद्र स्थापन करण्यात येईल. या अभियानांतर्गत आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी आणि विपणन पायाभूत सुविधा, जागरूकता, ब्रेडींग, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आदिवासींकडून थेट खरेदी करता यावी यासाठी टीएमएमसी केंद्रांची स्थापना केली जाईल. हे अभियान जिल्ह्यातील असुरक्षित समुदायाच्या कल्याणासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचणारी सहकारी संघराज्य व्यवस्था आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाचे आगळे वेगळे उदाहरण ठरेल. 00000

 ऐरोली विभागात तोडक कारवाई

 नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी पाचव्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 06 हॅमर, 04 ब्रेकर व 15 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. ०००००

 मणक्याच्या दुर्धर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत,

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशनकडून पुढाकार घेण्यात आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत. या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च 3 लक्ष ते 5 लक्ष रूपये ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. 00000

पार्किंगसाठी एमपी ९३ प्लॉट मिळेपर्यंत पर्यटकांची ससेहोलपट कायम ?

माथेरान : माथेरान बद्दल प्रचंड आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु इथे आल्यावर दस्तुरी वाहन पार्किंग मध्ये सुट्ट्यांच्या हंगामात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध…

 सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थळाला दिली भेट

 प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश नवी मुंबई : सिडको अध्यक्ष,  संजय शिरसाट, यांनी २४ सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगी  विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संतालक,  शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,  गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको,  शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प व विशेष प्रकल्प) सिडको आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रावर, दोन टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळ हे प्रती वर्ष 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.5 टन मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे दोन समांतर टॅक्सी वे असणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी एनएमआयएएल यांच्यावर आहे. विकासपूर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्प स्थळी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लॅंडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या भेटीदरम्यान मा. अध्यक्ष यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सिडकोचे अधिकारी व सवलतधारक एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले. कोट “सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.” संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको

नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज…

काळा घोडा परिसरात शनिवार-रविवारी वाहनांना बंदी

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची ५९वी वार्षिक सभा’ २८ सप्टेंबरला

मुंबई:- मुंबई शहर कबड्डी असो.ची २०२३-२४ची “५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा” शनिवार,२८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे मुंबई शहर संघटनेचे अध्यक्ष आमदार…