Author: bittambatami.com

विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटविल्याने डोंबिवलीत तीव्र नाराजी

डोंबिवली : पुणे येथील गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने देशभरातील विद्वतजन, अर्थतज्ज्ञांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील…

 विधानसभा उमेदवारांना माथेरानचा विसर!

 मतांच्या राजकारणात माथेरान विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर   माथेरान : माथेरान या नगावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना आजही स्वप्नवत जीवन जगावे लागत आहे.इथली काही मोजकीच राजकीय पक्षांची मंडळी ज्यांना खरोखरच या गावासाठी काहीतरी नवीन करण्याची मनीषा आहे त्यांनाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कामे करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत.इथल्या एखाद्या पक्षाचे नेतृत्व विकासाची गंगा आणण्यासाठी कार्यक्षम असले तरीसुद्धा मुख्यमंत्री असोत किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यांना ह्या गावाची कैफियत अथवा गार्हाणी कथन करावयाची झाल्यास तालुक्यातील आमदार किंवा जिल्ह्यातील खासदार याना विश्वासात घेऊन जाणे क्रमप्राप्तच आहे अन्यथा होणाऱ्या कामास देखील हेतूपूर्वक खोडा आणून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास जाऊच शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना आलेला आहे आणि ही येथील वस्तुस्थिती असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होणार असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू असून तालुक्यातील गल्लीबोळात प्रचाराची धामधूम सुरूच आहे, प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू असून जल्लोषात वाढदिवस आणि उत्सव साजरे होताना शक्तिप्रदर्शन जोरात सुरू आहे. आपली बाजू भक्कम असल्याचा अविर्भाव इच्छुक उमेदवार आणताना दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी वाड्या असोत किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणी कधी नव्हे ते तिथे जाऊन त्या भागातील लोकांची विचारपूस,त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नादुरुस्त रस्ते, वीज,पाणी समस्या याबाबत जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. याच मतदार संघात जेमतेम तीन हजारांच्या आसपास मताधिक्य असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सुध्दा समाविष्ट आहे. परंतु आजतागायत या स्थळाकडे संबंधित निवडून येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजवर कानाडोळाच केलेला दिसत आहे.आपल्या पक्षाला साधारणपणे माथेरान मधून एक हजारांच्या आसपास मते मिळणार आहेत त्यामुळे निवडणूक काळात इकडे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो सहसा कुणीही उमेदवार वेळ वाया घालवत नाहीत आपल्या काही कार्यकर्त्यांना पाठवून जे काही निवडणुकीचे मतांबाबतचे व्यवहार आहेत ते पूर्ण केले जातात.जणू काही या उमेदवारांना इथल्या मतांचे काहीएक स्वारस्य नसल्याप्रमाणे वागतात. आश्वासने ही नेहमीप्रमाणे दिली जातात पण मतांच्या राजकारणामुळे अल्प मतदान असल्याने इथली विकास कामे पूर्ण करण्याची विधानसभा उमेदवारांना माथेरानच्या विकासाबाबत इच्छाशक्ती नाही.निवडुन आल्यावर सुध्दा इकडे फारसे फिरकत नाहीत. माथेरान करांची काही मोठी मागणी नाही.फक्त याठिकाणी पर्यटन वाढीसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यासाठी उत्तम प्रकारे पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी फिनिक्युलर रेल्वे,प्रलंबित असणारा रोपवे प्रकल्प तसेच चौक येथून मोटार वाहन रस्ता थेट रामबाग पॉईंट पर्यंत उपलब्ध होऊ शकतो ही होणारी कामे असून त्यासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कामे पूर्ण करणे बाकी आमची काहीच मागणी नाही असे जाणकार जेष्ठ मंडळी बोलत आहेत. स्वातंत्र्यानंतर सुध्दा आपल्या न्यायहक्कासाठी माथेरान सारख्या दुर्गम परंतु जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. काही प्रश्न असल्यास शासन दरबारी खेटे मारून कामे कशीबशी पूर्ण करून घ्यावी लागत आहेत आणि जी काही अशक्यप्राय कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार यांना विनवण्या करून आशेवर राहावे लागत आहे मतांच्या  राजकारणात माथेरान पिछाडीवर पडले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इथली अल्प मतदार संख्या त्यामुळे भविष्यात सुध्दा भूमिपुत्रांचे संघर्षमय जीवन राहणार की काय असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र उपस्थित करत आहेत.यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी किती धावपळ करावी हे त्यांनी स्वतःहून जाणले पाहिजे. 0000

विरारमध्ये विसर्जन करताना गणेश भक्ताचा तलावात बुडून मृत्यू

विरार : विरार मध्ये गणपती  विसर्जन करताना, गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ता 18 रोजी पहाटे साडे साडे तीन वाजता ही दुर्दैवी…

आव्हानांवर मात करणारं शिक्षण देणारे  ‘बोकंद स’र शिक्षक आणि विद्यार्थी घडवणारा संस्थाचालक

पालघरः वर्गात चार भिंतीच्या आत आणि शाळेच्या वेळेत केवळ पुस्तक घेऊन ज्ञानदान करणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि असं काम करणारा शिक्षकही नव्हे, तर शिक्षणाची व्याख्या फार विस्तृत आहे. भारताचे दुसरे…

 राज्यात महायुतीच्या १५० ते १६० जागा निवडून येणार

 रामदास आठवले यांचा दावा योगेश चांदेकर   पालघरः महायुतीवर संविधान बुडवायला निघाल्याचा आरोप करणारे आणि संविधान वाचवण्याची मोहीम काढणारे अमेरिकेत गेल्यानंतर मात्र आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेतात. त्यांचा खरा चेहरा आता समोर आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसणारा असून महायुतीला १५० ते १६० जागा मिळतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. यावेळी  खासदार डॉ हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी भानुदास पालवे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण भावसार भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आरपीआयचे सचिन लोखंडे  जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे    जगदीश राजपूत आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डहाणू येथे दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचे लाभार्थी व अन्य घटकांशी आठवले यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी देशात आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानात मोदी हे एकमेव पंतप्रधान असे आहेत, ज्यांनी संविधानावर माथा टेकवून शपथ घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केलेल्या तरतुदींचा विचार करता आरक्षण कोणालाही काढता येणार नाही, हेच मोदी यांनी सांगितले. त्यांच्या काळात देशातील पायाभूत सुविधांचा मोठ्या गतीने विकास झाला, असा गौरव आठवले यांनी केला. या वेळी त्यांनी चारोळ्या सादर केल्या. चुकीच्या प्रचारामुळे लोकसभेत नुकसान पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीत दलित आदिवासी आणि मुस्लिमांमध्ये चुकीचा प्रचार केल्यामुळे महायुतीला फटका बसला; परंतु राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची आरक्षण नीती लक्षात आली असून आता त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगताना विधानसभेतही त्यांच्यामुळे फायदाच होईल, असा दावा आठवले यांनी केला. विधानसभेला हव्यात १२ जागा राज्यात महायुती सत्तेत आल्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात काही जागा देण्याची आणि दोन महामंडळांचे अध्यक्षपद तसेच महामंडळाच्या काही जागा आणि जिल्हास्तरीय शासकीय समित्यांत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे ठरले होते; परंतु अजितदादा आल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली आणि आमची संधी मात्र हुकली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी आता महामंडळाचा विस्तार होत असल्याने आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होत असल्याने रिपब्लिकन पक्षाला ठरल्यानुसार महामंडळे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या बारा जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी ही आठवले यांनी केली. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी चुकीची नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम आम्हीच लावून धरला होता, असे निदर्शनास आणून आठवले म्हणाले, की देशभरातील क्षत्रिय समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव विविध राज्यांनी आमच्याकडे पाठवला, तर त्यावर आमचे मंत्रालय निश्चित विचार करीन. महाराष्ट्रातून मराठा, गुजरातमधून पाटीदार, हरियाणामधून जाट, राजस्थानमधून राजपूत अशा विविध क्षत्रिय जातीसमूहाचा आरक्षणात समावेश आग्रह आहे. याबाबत देश पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसीचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रश्न जटील होईल. ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी सूचना आठवले यांनी केली. मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींचे प्रमाण २१ टक्के आहे. कालेलकर समितीच्या अहवालानुसार देशात ५२ टक्के ओबीसी आहे. या सर्व घटकांना आरक्षण आहे. आता आर्थिकदृष्टया मागासांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले असून, त्यात मुस्लिम, मराठा, ब्राम्हण,लिंगायत आदी सर्व समाजघटकांचा समावेश आहे. मुस्लिम समाजातील बहुतांश घटक ओबीसीत आहे, असे निदर्शनास आणू वक्फ बोर्डासंबंधीच्या नवीन कायद्याचे आठवले यांनी समर्थन केले. वाढवण बंदराविषयी गैरसमज दूर करण्याची गरज वाढवण बंदराच्या प्रश्नाचा उल्लेख करून आठवले म्हणाले, की कोणत्याही पायाभूत सुविधांची कामे किंवा विकासाची कामे ठरलेल्या वेळेत झाली, तरच ती अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे होतात. त्यांना विलंब झाला तर खर्च वाढतो. त्यामुळे ही कामे कोणत्याही परिस्थितीत वेळेतच व्हायला हवीत. या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी मदतीच्या खर्चाची तरतूद प्रकल्पाच्या खर्चातच समाविष्ट असली पाहिजे, अशी सूचना करून ते म्हणाले, की वाढवण बंदर हे ७६ हजार दोनशे कोटी रुपये खर्चाचे आहे. या बंदराच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. या परिसराचा विकास होणार आहे. वाढवण बंदराला विरोध म्हणून आंदोलन करण्याचा घटनेने संबंधितांना अधिकार दिला असला, तरी आपण संबंधित लोकांची भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजेत. आपणही त्यासाठी तयार आहोत. या भागातील प्रकल्पग्रस्तांना जादा नुकसान भरपाई आणि त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. देशातील ४५ टक्के लोकांना लाभ आपल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित देशातील एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकांचा समावेश होत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, की समाजाला जोडण्याचे काम आमचे मंत्रालय करते. त्याचबरोबर समाजातील गोरगरीब लोकांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करते. या मंत्रालयाने गेल्या चार वर्षांपूर्वी देशात नशामुक्त अभियान सुरू केले. त्यासाठी काही जिल्हे निवडण्यात आले होते. आता संपूर्ण देशाची निवड करण्यात आली आहे. देशातील तरुण व्यसनांच्या, अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असून ती वाचवली पाहिजेत, यासाठी नशामुक्त अभियान हाती घेण्यात आली आहे. कोट्यवधी तरुणांना नशामुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यात यश येत आहे. या मंत्रालयांतर्गत आतापर्यंत ५१ कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. ४६ कोटी लोकांना मुद्रा योजनांचा फायदा देण्यात आला आहे. पाच कोटी महिलांना उज्वल गॅस योजनेतून मदत दिली आहे. याशिवाय दिव्यांगासाठी साहित्य बनवणाऱ्या नागपूर येथील कंपनीला ३३० कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 0000

 स्वप्नातील घर साकार होणार

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम व मंजुरी पत्रक वितरण ठाणे  : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थ्यांना  मंजूरी पत्रांचे वितरण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील १४ मंजूर लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्तीपत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २४-२५  करिता  ७ हजार १४१ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी सद्यस्थितीला ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली असून २ हजार ६०१ पहिला हप्ता वितरण करण्यासाठी FTO जनरेट करण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी शिसोदे यांनी माहिती दिली.‌ यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड,‌ अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहायक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केले.‌

 ‘साहित्यिकाकडे नम्रता हवी, अहंकार नको!’

 पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन   मुंबई : ‘जयवंत दळवी हे मला मित्र म्हणून नव्हे, तर स्पर्धक म्हणून भेटले. मात्र स्पर्धा बाजूला राहिली आणि स्नेह वृद्धिंगत झाला. साहित्यिकाकडे नम्रता असली पाहिजे, अहंकार नको,’ असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा आणि बोरिवली शाखेच्या वतीने बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १६ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार मनीषाताई चौधरी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नाटककार, अभिनेते अशोक समेळ होते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरीवली शाखेचे अध्यक्ष जगदीश भोवड यांनी केले. त्यानंतर बोलताना प्रा. ढवळ यांनी जयवंत दळवी यांच्या पहिल्या भेटीची अनोखी आठवण सांगितली. या शताब्दी वर्षात आणखी भव्य प्रमाणात कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.  आपले मनोगत व्यक्त करताना नमिता कीर यांनी जयवंत दळवींच्या नाट्य आणि साहित्याची एकूणच संशोधनात्मक माहिती सादर केली. याप्रसंगी जयवंत दळवी यांचे चिरंजीव गिरीश दळवी यांनी अतिशय हळवी अशी बाबांविषयीची आठवण सांगितली. ज्येष्ठ नाटककार अभिनेते अशोक समेळ यांनी दळवींच्या अनेक नाटकांविषयी साभिनय विवेचन केले. मधुभाई आणि दळवी आपली दैवते असल्याचे सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये दळवींच्या कादंबऱ्यांतील बारकाव्यांचे वर्णन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीचे वैशिष्ट्य सांगितले. शेवटी मार्गदर्शन करताना मधुभाईंनी परममित्र दळवींच्या सोबत घालवलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषद हा एक परिवार असून त्या परिवाराने केशवसुतांचे स्मारक बांधल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच श्री.ना. पेंडसे यांना पालखीतून गारंबी येथे नेल्याची आठवण सांगितली. बोरीवली शाखेच्या माजी अध्यक्षा अनुराधा नेरुरकर यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि दादर शाखेच्या अध्यक्ष विद्या प्रभू यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ००००

कोमसाप वाङमयीन पुरस्कारासाठी लेखकांना आवाहन

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना आपल्या लिखित साहित्याला विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन   २०२३-२४ साठी घोषित होणाऱ्या  वाड्मयीन पुरस्कारासाठी लेखकांची पुस्तके मागविण्यात येत आहे.…

दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू – अमित शाह

जम्मू : जम्मू–काश्मीरमधिल विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद…