नागरिकांनी मतदार यादी पडताळणी करुन घ्यावी
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना…
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना…
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशांनुसार ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ कार्यक्रमाला आज दोडामार्गातून सुरुवात झाली. या कार्यक्रमात सहभागी होत दोडामार्गवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मंदिरातील दान…
उल्हासनगर महापालिकेचे आवाहन सुनिल इंगळे उल्हासनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले असून, या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या अभियानादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून निर्धारित कालावधीत संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीमध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादीची पडताळणी होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मतदाराचे नाव सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारी व अपील दाखल करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आपल्या घरी भेट देताच त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.
देशभरातील ८०० खेळाडूंचा सहभाग मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियम येथे राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन…
२९५ अधिकाऱ्यांवर जबाबदारी! अनिल ठाणेकर ठाणे-नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या सुमारे ५ हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेचे २९५ अधिकारी जबाबदार असल्याचा दावा…
शिक्षणमंत्र्याचे आंदोलकांना आश्वासन मुंबई :BLO/SIR रद्द करा, शिक्षकांना TET सक्ती नको, तात्काळ FIR मागे घ्या. या मागण्यासाठी मुंबईतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन केले. शिक्षण विभागाने…
बौद्ध साहित्य संशोधकांसाठी मोलाचा संदर्भग्रंथ ठरेल – ज.वि. पवार मुंबई, प्रतिनिधी : काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशनास विलंब झालेल्या ‘अपरान्त’ जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज.वि. पवार यांच्या हस्ते रविवारी मुंबई…
मुंबई : बांद्रा येथील सेंट अँड्र्यूज कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राचार्या डॉ. सिबिल थॉमस यांच्यामुळे प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागत आहे आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात काम करावे लागत आहे. त्यांनी…
७ दिवसांत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांचा इशारा आरती परब दिवा : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि आशा वर्कर्स (ASHA Workers) कडे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘विटामिन ए’ (Vitamin A) या औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा जाणवत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून औषधांचा पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील कुपोषण, अंधत्व रोखण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठराविक अंतराने ‘विटामिन ए’ चे डोस देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील लहान मुले या आवश्यक डोसपासून वंचित आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या नियमांनुसार बालकांमधील अंधत्व निवारणासाठी ‘विटामिन ए’ चा डोस वेळेवर मिळणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क आहे, तसेच माता व बाल संगोपन औषधांचा साठा अखंडित ठेवणे स्थानिक प्रशासनाचे (महानगरपालिका) कर्तव्य आहे. दिव्यातील गरीब जनता पूर्णपणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असताना औषधांचा हा तुटवडा म्हणजे बालकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा आहे, असे सचिन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेना दिवा शहरातर्फे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: १. दिवा प्रभाग समिती अंतर्गत सर्व आरोग्य केंद्र आणि आशा वर्कर्सना ‘विटामिन ए’ चा पुरेसा साठा पुढील ७ दिवसांच्या आत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. २. गेल्या तीन- चार महिन्यांपासून हा औषध पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विभागावर त्वरित कारवाई करण्यात यावी. या गंभीर विषयावर प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून पुरवठा सुरळीत केला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या हक्कासाठी प्रशासनाविरोधात पुढील प्रशासकीय व कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे. 000000000