दहीहंडीला पावसाची दांडी !
मुंबई : येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी ही पावसाशिवाय होणार आहे. नेमक्या दहीहंडीच्या दिवशी पाऊस दांडी मारणार आहे. येत्या २६ ते…
मुंबई : येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी ही पावसाशिवाय होणार आहे. नेमक्या दहीहंडीच्या दिवशी पाऊस दांडी मारणार आहे. येत्या २६ ते…
जळगाव : जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये ३१ जण जखमी…
बदलापूरमधिल शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याच्या गुन्ह्यासाठी विशेष तपास समितीने बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Pocso Act च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने हे म्हटलं…
अत्याचाराची घटना घडलेल्या बदलापुरच्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे. चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने…
खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहिणींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि…
न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे ० आता राज्यभरात निषेध आंदोलने मुंबई : बदलापुरमधिल शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद न्यायालयाच्या…
दक्षता पथक मार्फत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरुळ विभागाअंतर्गत नेरुळ स्टेशन व सेक्टर-20 येथील गुडविल कॉर्नर येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्किंग करणारे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पंधरा हातगाडी, तीन टेम्पो व एक रिक्षा इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील केंद्रीय अतिक्रमण् दक्षता पथक मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तेरा मजूर, तीन टोईंग, तीन पिकअप, एक आयशेर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
जळगावात 25 ऑगस्ट रोजी सोहळा मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून श्री.मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबीयाना गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा प्रधानमंत्री .मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात प्रधानमंत्री 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दिदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दिदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दिदींचा समावेश आहे. ००००
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री…