Author: bittambatami.com

अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेस खेळाडूंचा चांगला प्रतिसाद

मुंबई – येत्या १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुंबई विभागस्तरीय अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेत ४० संघातून ७०० हून जास्त खेळाडूंनी  नोंद केली आहे. बोरीवली पश्चिम स्थित सुविद्या प्रसारक संघ, स्कूल…

एक अजरामर “आशा”

एक अजरामर “आशा” राजेंद्र हुंजे आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे फक्त यशाची कहाणी नाही… तो संघर्षातून उभं राहण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि प्रत्येक वेदनेला सुरांत रूपांतरित करण्याचा प्रवास आहे.…

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली स्वाती घोसाळकर मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी…

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी   मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला…

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप

  माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला…

 ठाण्यात ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा उत्साहात संपन्न

  ठाणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने ठाणे…

गीत संगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचे आवाहन

कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह…

 काशिगाव मेट्रो स्थानकातील वाहतूक कोंडीवर एमएमआरडीएला २ महिन्यांचा ‘अल्टिमेटम’!

– प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे. पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत