चॅम्पियन ट्रॉफी साठी संतुलित संघ निवड
१९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबई येथे एकदिवसीय सामन्यांची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर व कर्णधार रोहित शर्मा यांनी…
दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉल तिकीट
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दाहवीच्या परीक्षेची हॉलतिकीट येत्या सोमवारपासून मिळणार आहेत. सर्व माध्यमिकशाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेची…
‘चिंतामणी चषक – २०२५’ कबड्डी स्पर्धा
लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, शिवशक्ती क्रीडा यांनी प्रथम श्रेणी पुरुष, तर हिंदमाता सेवा, वीर संताजी क्रीडा, शिवनेरी सेवा यांची कुमार गटात विजयी सलामी मुंबई:- लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, शिवशक्ती क्रीडा…
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले उल्हासनगरच्या २६ विद्यार्थ्यांचे प्राण,
मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई कल्याण : उल्हासनगर येथील २६ खेळाडू विद्यार्थ्यांना विरार येथे घेऊन जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाने मद्य सेवन केले होते. या बसचा चालक शुक्रवारी उल्हासनगर येथून निघून कल्याण शहरातून बस घेऊन जात होता. बस चालक वेडीवाकडी बस चालवत असल्याचे कल्याणमधील वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. पोलिसाने तात्काळ त्या बसला रोखून बस चालकाची मद्यसेवन तपासणी केली. चालकाने मद्य सेवन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मद्यधुंद अवस्थेत बस चालकाने ही बस विरारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असता तर वाटेत या बसची दुर्घटना घडण्याची शक्यता होती, अशी भीती वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी तात्काळ या बस चालकाला बसमधून उतरवून त्यांना मद्य सेवन करून बस चालविल्याबद्दल दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती, अशी उल्हासनगर येथील एक खासगी बस जग्गु ॲकेडमीतील २६ विद्यार्थ्यांना घेऊन विरार येथे फूटबाॅल खेळण्यासाठी चालली होती. विरार येथील ग्लोबल शाळेत फूटबाॅल स्पर्धा होत्या. शुक्रवारी उल्हासनगर येथून विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली खासगी बस कल्याणमध्ये वालधुनी पुलावरून सुभाष चौकाकडे येत होती. रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत असलेल्या वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांना खासगी बस चालक वाहतूक कोंडी नसताना बस वेडीवाकडी, वाहतुकीचे नियम तोडून चालवित असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलीस पाटील यांना बस चालका विषयी संशय आल्याने वाहतूक पोलिस पाटील यांनी तात्काळ पुढे जाऊन उल्हासनगरहून आलेल्या बस चालकाला बस थांबण्याचा इशारा केला. बस रस्त्याच्या बाजुला घेऊन वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांनी जवळील ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने खासगी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची मुख तपासणी केली. या तपासणीत चालक गौतम यांनी मद्यसेवन केले असल्याचे आढळले. वाहतूक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खासगी बस चालकाच्या मालकाला ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे नियोजन करून उल्हासनगरची खासगी बस कल्याणच्या वाहतूक विभागाने जप्त केली. वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी पाटील यांच्यासह पथकाचे कौतुक केले. उल्हासनगर मधील एक खासगी बसचा चालक विद्यार्थी घेऊन विरार येथे जात होता. या बसच्या चालकाने मद्यसेवन केले असल्याने त्यांच्यावर दहा हजार रूपये दंडाची कारवाई करून बस जप्त करण्यात आली. हवालदार पाटील यांच्या हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली. राजेश शिरसाट वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग. कल्याण.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनीच स्विकारावे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इच्छा ठाणे : जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कोणाला पालकमंत्री पद मिळेल यावरून चर्चा सुरू आहे. रविवारी खोपट आगाराच्या पाहाणी वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पद स्विकारावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारावे आणि ठाणे जिल्ह्याचा विकास करावा असे सरनाईक म्हणाले. 00000