Category: Blog

Your blog category

Heading – एमआयडीसी फेज दोनमध्ये दारुड्यांच्या हैदोस

नोकरदार महिला त्रस्त कल्याण : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील जेथे प्रोबेस स्फोट झाला होता त्या W – १६० ते W – २५१ या लेन मधील कारखान्यासमोर गटाराच्या बाजूस काही तरुण, मध्यमवयीन दारुडे हे रोज सायंकाळी दुचाकी व अन्य वाहनांत येऊन दारू व इतर व्यसने करीत आहेत. सायंकाळ ते रात्री पर्यंत या दारुड्यांचे प्रताप तेथे चालू असतात. येथील कंपन्यांतून सायंकाळी सुटणाऱ्या महिला समक्ष हे प्रकार चालू असल्याने महिला वर्ग दहशतीखाली असून या दारुड्यांनी नशेत काही दुष्कृत्ये केली तर मोठा अनर्थ होणार आहे. हे नशेखोर दारुडे ठराविक प्रकारची म्हणजे मास्टर्स डीलाईट ही दारू पित असून त्याच्या लाल रंगाच्या प्लास्टिक बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि चकणा साठी घेतलेले पेपर, कागदी डिश या बाजूच्या गटारात फेकून ते अस्वच्छता करीत आहेत. यामुळे गटारात या बाटल्यांचा खच जमा होत आहे. केडीएमसी, एमआयडीसी प्रशासन तर ही गटारे कधीच साफ करीत नाहीत. त्यामुळे येथे दुर्गंधी वाढली आहे. या संदर्भात येथील महिला उद्योजक वर्षा महाडिक यांनी याबाबत फोनवरून तोंडी तक्रार ही मानपाडा पोलिसांना आणि केडीएमसी एमआयडीसी यांच्याकडे केली असून लवकरच यावर कडक कार्यवाही करावी असे त्यानी सांगितले आहे.

समृद्धी महामार्गावरील अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका

तातडीच्या कारवाईची मनसेची मागणी कल्याण : राज्याच्या महत्त्वाकांक्षी आणि अतिवेगवान वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आसनगाव तसेच निंबवली टोल प्लाझा परिसरामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहने अनधिकृतरित्या रस्त्याच्या कडेला व वाहतूक लेनमध्ये उभी केली जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित विभागाकडे तक्रार वजा निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे तक्रार वजा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके तसेच रोहित जोशी उपस्थित होते. मनसेच्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग हा अतिवेगवान वाहतुकीसाठी विकसित करण्यात आला असून दररोज हजारो नागरिक, खासगी वाहने, प्रवासी बस तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र इगतपुरी ते आसनगाव या दरम्यान आणि विशेषतः निंबवली टोल प्लाझा परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत ट्रक व कंटेनरच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन ते तीन लेनपर्यंत ही वाहने उभी असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी केवळ एकच लेन उपलब्ध राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता, पावसाळी वातावरण, धुके अथवा वाहनांचा वेग लक्षात घेता अशा प्रकारे उभी असलेली वाहने चालकांच्या लक्षात वेळेत न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. विशेषतः मागून येणाऱ्या वाहनांना अचानक लेन बदलावी लागत असल्याने साखळी अपघात, वाहनांचे नियंत्रण सुटणे तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत पोलिस प्रशासन तसेच निंबवली टोल नाक्यावरील अधिकारी सातत्याने रस्ते विकास महामंडळ व संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहेत. विविध माध्यमांतून या प्रश्नाची दखल घेण्याची विनंती करण्यात आली असून परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग असला तरी त्यावरील सुरक्षा धोक्यात येऊ देणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 00000000000000

 माता रमाबाई नगरातील आंबेडकर पुतळा परिसर होणार आकर्षक

 आठवडाभरात आराखडा सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश… मुंबई :   घटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामांची शहानिशा करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बृहमुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए,म्हाडा विभागाचे अधिकारी आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, माता रमाबाई आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून परिसराचे नियोजनबद्ध सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी पुतळा परिसरातील रस्ते, पदपथ, प्रकाशयोजना, स्वच्छता व्यवस्था, संरक्षक भिंत, हरित पट्टा तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. तसेच पुतळ्याभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामांची संबंधित विभागांनी तातडीने शहानिशा करावी. नियमबाह्य आढळणाऱ्या बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करून परिसर मोकळा करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे पुतळ्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना स्वच्छ व सुस्थित परिसर उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान सुशोभीकरणाच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात सादर करण्यात या परिसराचा विकास करताना स्थानिक नागरिकांच्या भावना आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन कामे करण्यात यावीत असे निर्देशही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

खाद्यतेलाची आयात वाढली

‌‘सॉल्व्हन्ट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडिया‌’ (एसईए)च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची खाद्यतेल आयात तीन टक्क्यांनी वाढून 166.51 लाख टनांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या वाढीमागे नेपाळकडून होणाऱ्या शुल्कमुक्त आयातीत…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश मुंबई  : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील  घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार बद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी  दिले आहेत. विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र ८ डी/१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रायांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार विल्हेवाट लावण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याचे तक्रार समोर आले असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  

 ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’चे आयोजन

 सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नवी मुंबई : आसामंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’ या चारदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पर्यटन…

फॉक्सकॉन देणार तीस हजार महिलांना रोजगार

फॉक्सकॉन देणार तीस हजार महिलांना रोजगार फॉक्सकॉन ही तैवानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ती ‌‘ॲपल‌’साठी करारावर आयफोन बनवते. तिने मोठ्या संख्येने लोकांना कामावर ठेवले आहे. कंपनी बंगळुरूजवळील देवनहल्ली येथील नवीन ‌‘आयफोन…