Category: होम

कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा

महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ   हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि  कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या  कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात  विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने    नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव  केला . दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज‌ पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात  बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६  गुणांनी आरामात पराभव केला. तर भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली  विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत‌ दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने   तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला. ०००००००

एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२०  क्रिकेट स्पर्धा

धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले. विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२). ०००००००००

दुसऱ्या मानांकित सामंतला हरवून वर्तक उपांत्य फेरीत

जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने…

 कळंब येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

 तहसीलदार धनंजय जाधव आणि उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे यांची प्रमुख उपस्थिती कर्जत : (अशोक गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत शुक्रवार, १० एप्रिलला महसूल मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समाजकल्याण सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्य रेश्मा जोशी, तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे यांनी केले . यावेळी नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच मंडळ कळंब अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी निलेश पवार, मोहिनी भडांगे, आकाश निकाळे, रणजीत कोळेकर, शशिकांत हुलगुंडे, दर्शना कांबळे, तहसील व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “एका दिवसात डिलिव्हरी सेवा” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ०००००

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते.त्याच्याच प्रयत्नातून आपल्याला आज समाजात एकता व बंधुता दिसून येते. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा…

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव…

निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे…

निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे… १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. १० एप्रिल १७५५ रोजी जन्माला आलेल्या डॉ. सॅम्युअल हॅनिमन या शास्त्रज्ञाने या आगळ्यावेगळ्या उपचार पद्धतीचा…

सोशियल मीडियावरील बंदीनिमित्ताने…

सोशियल मीडियावरील बंदीनिमित्ताने… ‌‘सोशल मीडिया‌’ प्लॅटफॉर्म्स केवळ संवादाचे माध्यम राहिलेली नाहीत, तर किशोरांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वर्तनावर खोलवर परिणाम करणारी प्रभावी साधने बनली आहेत. अशा परिस्थितीत, सरकार किंवा न्यायव्यवस्थेकडून या…

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला.…