Category: होम

 मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी

 राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब   बदलापूरः शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश केला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी पवार तयारी करत होते. या प्रवेशासह त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथून शरद पवार गटातून इच्छुक असलेले बदलापुरचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकेकाळी कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. सुरूवातीला शांताराम घोलप आणि पुढे गोटीराम पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला. गोटीराम पवार यांच्या चार टर्म आमदारकीनंतर आता पुन्हा त्यांचे पुत्र सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काही वर्षांपूर्वी सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही दिले होते. त्यांच्याकडे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदही होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही जागा भाजपला गेल्याने इच्छुक असलेले सुभाष पवार यांची कोंडी झाली. पवार यांनी महाविकास आघाडीची दारे यापूर्वीच ठोठावली होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी तसा संपर्क यापूर्वीच केल्याची माहिती होती. रविवारी भाजपने आपल्या पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर केल्यानंतर सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा पारंपारिक सामना होणार आहे. पवारांच्या प्रवेशाला आक्षेप ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला ते ठेकेदार आहेत. वडिलांच्या पुण्याईवर यांचे राजकारण आहे. अशाप्रकारे पक्षानेही लोकांना प्रवेश आणि उमेदवारी देणे योग्य नाही. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला आणि ज्याने लोकसभेला पक्षविरोधी काम केले त्याला उमेदवारी दिल्यास आमचा विरोध राहिल. आम्ही निवडणूक लढवणार कशा पद्धतीने ते लवकरच जाहीर करू. – शैलेश वडनेरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शऱद पवार) पक्ष, बदलापूर.

अकृषिक कराच्या जाचातुन मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून केळकर यांचा सत्कार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषिक कर पूर्णतः माफ करण्यात आला. त्यामुळे अकृषिक (एन ए) कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जाचातून मुक्तता झाली. या निमित्त महाराष्ट्रातील साडेचार कोटी रहिवाश्यांच्यावतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने नुकतेच आमदार संजय केळकर यांचा जाहिर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि ॲड.अल्केश कदम आदीसह रहिवाशी उपस्थित होते. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत तर ठाणे जिल्ह्यात ३३ हजार आणि शहरात साडेचार हजार सोसायट्या आहेत. अकृषिक (एनए) कराच्या नोटीसांमुळे राज्यातील साडेचार कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. या बरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळामध्ये तसेच, २०१८ ते २०२३ पर्यंत संबंधीत तीन मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि दोन कर हा जाच कशासाठी असा सवाल करीत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी अकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमुन एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारने अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. यानिमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी आ. संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहिर सत्कार केला. 0000

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवमध्ये

मुंबई :   महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची २०२४-२५ वर्षातील सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमान पदाखाली धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात येत असल्याची…

 राष्ट्रीय स्तरावरील’कोकण रत्न’ राष्ट्रीय मेनू २०२५ शिबिर रत्नागिरीत

रत्नागिरी : अशोक गायकवाड* २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली. ‘हमारा समुदंर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ या शिबिराचा शुभांरभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरीया परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटीकल मैल नौका भ्रमण असणार आहे. या शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे. नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबीरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदल याबाबतची माहिती मिळणार आहे. तर कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यु, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यु बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते. 000

भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण मंजूर झाल्यास व्यापार दुपटीने वाढेल – राज्यपाल

मुंबई : अशोक गायकवाड भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल, असे मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार – उद्योजकांचे भव्य आर्थिक शिष्टमंडळ (बेल्जियम इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार असून त्यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जीयमचेङङङ मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी येथे दिली.वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. बेल्जीयमचा महाराष्ट्र व गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार असून बेल्जियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेसोमवारी ळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले. बेल्जीयम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्जीयम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा संजय मणियार, राहुल बर्वे विजेते

मुंबई : असोसिएशनच्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील पंच व पदाधिकारी यांच्यासाठी विशेष आयोजित केलेली रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा रविवारी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे पार…

भारत सरकारने कांडला बंदराचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांची  मुंबई बंदराचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

 वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ मी वाचले, तुम्हीही वाचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनही पार पडले. साटेलकरसर यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य विशद केले. मुख्याध्यापक जी बी परब सर यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इयत्ता सहावी टे दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. सुयश सद्गुरू साटेलकर (रडार सिस्टीम – प्रथम क्रमांक), कौशल माधवराव भोसले आणि विक्रम वसंत भूतकडे (रिचार्जेबल टेबल फॅन- द्वितीय क्रमांक), कुंदन धनंजय नाटेकर ( स्मार्ट होम )आणि तेजस निलेश शेट्ये (ग्रास कटर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.  शालेय समिती अध्यक्ष निलिमा सावंत, सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. कदम मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 0000 माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची  निवड चाचणी २३ ऑक्टोबरला मुंबई :  माहुल, चेंबूर  येथील  वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी  बुधवार, २३ ऑक्टोबरला  दुपारी ३ ते ६ या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून १ सप्टेंबर २००५ ते ३१ ऑगस्ट २०१२ या दरम्यानच्या काळात जन्मलेली  मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक मुलांनी वरील दिवशी क्रिकेट किट, क्रिकेटचा पांढरा गणवेश आणि जन्माच्या दाखल्यासह माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८६५५३३७८८५ किंवा ७०२११४७४७५  येथे  संपर्क साधावा.

उत्तर भारतीयांच्या हाती ओवळा- माजिवडा विधानसभेच्या विजयाचा पासवर्ड

 स्थानिक भूमिपुत्र दुसऱ्या क्रमांकावर   ठाणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ओवळा- माजिवडा विधानसभेत मात्र निवडणुकीचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांत पहिल्या क्रमांकाचा मतदार उत्तर भारतीय असल्याने त्याची मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्या उमेदवाराला विजयाची खात्री असणार आहे. ओवळा- माजिवडा हा मतदारसंघ ठाण्यापासून थेट भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. येथे निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन्ही वेळा निवडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती; मात्र आताचे चित्र वेगळे आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन शिवसेना अर्थात दोन शिवसेनेचे उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभ्या राहिल्याने त्यामध्ये बहुतांश मतदार ठाण्याबाहेरून येथे राहायला आला आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्र मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. परराज्यातून येथे वास्तव्याला आलेल्यांची संख्या वाढली असून ती ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. ही संख्या सुमारे तीन लाख एवढी झाली आहे. त्यात उत्तर भारतीयांसह मारवाडी, गुजराती, दक्षिण भारतीय अशा परप्रांतीयांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या पाच लाख ४० हजार २९३ आहे. तर, नव्या मतदारांची संख्या ११,७५४ हजारांवर पोहोचली आहे. यावरून या मतदारसंघावर परराज्यातील मतदारांचा कब्जा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानंतर दुसरा क्रमांक आगरी मतदारांचा लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जाती-जमातीमधील मतदारांचे येथे वास्तव्य आहे. अशा परिस्थितीमुळे या मतदारसंघातील बरेचसे चित्र उमेदवार कोणत्या राज्यातील आहे, त्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उत्तर भारतीय अथवा इतर राज्यातील उमेदवार उभा केला तर ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारी ठरणार आहे. येथे राहणाऱ्या उत्तर भारतातल्या भाजपप्रेमी मतदाराने प्रांतानुसार मतदान करण्याचा निर्णय घेतला तर तो महायुतीला मारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच काशिमीरा येथे नव्याने वसलेल्या काशिगाव झोपडपट्टीत मतदारसुद्धा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबई आणि इतर ठिकाणांहून बाधित झालेले नागरिक येथे वसले आहेत. त्यामध्ये बहुतांश मतदार दक्षिण भारतातील आहेत. त्यांनी या मतदारसंघात मतदानाच्या नावांची नोंदणी करून घेतलेली आहे. हा मतदारसुद्धा चेहरा पाहून मतदान करण्याची चिन्हे आहेत. सरनाईकांचे पारडे जड शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक येथून २००९ ते २०१९ असे सलग तिसऱ्यांदा येथून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते ९०४१ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी या निवडणुकीत ३६.०३ टक्के मते मिळवली होती. यावेळी एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते; तर २०१४ मध्ये हा फरक १०,९०६ एवढा होता. यावेळी त्यांना ३६.७५ टक्के मते मिळाली होती. यावेळी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर, २०१९ मध्ये मात्र सरनाईक मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८४,००८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला ३३,५८५ मते मिळाली होती, तर सरनाईक यांना १,१७,५९३ मते मिळाली होती. या वेळीसुद्धा १४ उमेदवार रिंगणात होते.

 परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे गृहनिर्माण धोरण हवे!

 मुंबई ग्राहक पंचायतीच्या परिषदेत सूर   मुंबई : एकीकडे गरीबांना मोफत घरे मिळतात. मध्यमवर्गीय गरजुंना परवडणारी घरे खरोखरच उपलब्ध करुन द्यायची शासनाची इच्छा असेल तर तसे प्रतिबिंब गृहनिर्माण धोरणात दिसले पाहिजे. गृहप्रकल्पांसाठी शासनाला द्यावा लागणाऱ्या शुल्काचा पुनर्विचार केला गेला तर घरांच्या किमती कमी होऊन परवडणारी घरे निर्माण होऊ शकतात, असा सूर राज्याच्या प्रस्तावीत गृहनिर्माण धोरणाबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून शनिवारी आयोजित केलेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आला. शासनाने पुढाकार घेऊन भाडे तत्त्वावरील घरनिर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचे (महारेरा) माजी अध्यक्ष गौतम चॅटर्जी, नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, मुंबई गृहनिर्माण मंडळाचे माजी मुख्य अधिकारी अरविंद ढोले, विकासक डॉमनिक रोमेल, वास्तुरचनाकार निखील दिक्षीत, योमेश राव तसेच मुंबई विकास समितीचे ए. व्ही शेणॉय, अ‍ॅड. श्रीप्रसाद परब, अ‍ॅड. पार्थसारथी आदी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचे गृहनिर्माण धोरण ही भविष्यातील दिशा ठरवत असते. अशा वेळी सर्व संबंधितांशी चर्चा करून अशी धोरणे निश्चित केली पाहिजेत. या धोरणात महारेराकडे गृहप्रकल्पांची नोंदणी तसेच दंडात्मक कारवाईतून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा झाली पाहिजे असे नमूद आहे. परंतु रेरा कायद्यातच ही रक्कम प्राधिकरणाकडे जमा करण्याची तरतूद आहे, याकडे चॅटर्जी यांनी लक्ष वेधले. बांधकामविषयक परवानग्यांबाबत काय धोरण असावे, यासाठी २०१७-१८ मध्ये माझ्यासह माजी पालिका आयुक्त शरद काळे, माजी नगरविकास प्रधान सचिव रामनाथ झा यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने बांधकामविषयक परवानग्या देताना होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे परवानग्या देण्याची सूचना केली होती. या अहवालाची अमलबजावणी केली तरी बांधकाम विषयक परवानग्यांमध्ये सुसूत्रता येईल, असेही त्यांनी सांगितले. घरनिर्मितीसाठी शासनाला शुल्काच्या रुपाने बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यामुळे सद्यस्थितीत विकासकाने कितीही ठरविले तरी तो परवडणारे घर देऊ शकत नाही. घरांच्या किमती कमी करू, असे वाटले तरीही त्यात प्राप्तीकर कायद्याचा अडथळा आहे, याकडे विकासक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी लक्ष वेधले. शासनाला परवडणारी घरे निर्माण करायची असतील तर भाडेतत्त्वावरील घरांची अधिकाधिक निर्मिती करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. ब्रिटिशांच्या काळात चाळी बांधण्यात आल्या. या चाळींमध्ये भाड्याची घरे उपलब्ध होती. काही विश्वस्त संस्थांनीही घरे उभारली तीही भाड्याने उपलब्ध होती. मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या व्यक्तीला भाड्याचे घरच परवडू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासनाने उपलब्ध भूखंडापैकी २५ टक्के भूखंड शून्य किमतीने उपलब्ध करून द्यावा. बांधकामासाठी येणारा खर्च देऊन भाडेतत्त्वावरील घरे कोणाकडूनही बांधून घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या सर्व शिफारशींचे संकलन करून ते शासनाला सादर केले जाणार आहे. याशिवाय शासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.