आशियाँ फाऊंडेशनने दिला महिला सबलीकरणाचा नारा
ठाणे : आशियाँ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यात सध्या महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यावर जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने आशियाँ फाऊंडेशनने विविध गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात पथनाट्य सादर करून जनजागरण अभियान राबविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिरेश उजगरे, वेदांत खोत, प्रशांत अदनवाले, रवींद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत समाजामध्ये जनजागरण व्हावे तसेच कायद्याची माहिती जनतेला मिळावी, या दृष्टिकोनातून आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण अभियान सुरू केले आहे. रविवारी या संस्थेच्या वतीने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी रितेश जाधव, साक्षी मंचेकर,राहुल जगताप, सीताराम खडे, आकाश लोणारे यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नारपोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे पथनाट्य सादर केले. या प्रसंगी बालगोपाळ मित्रमंडळ, साई प्रसन्न को. सो. नारपोलीचे अध्यक्ष घोसाळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
६ कोटींच्या क्रीडांगण आणि खुले नाट्यगृह यांच्या लोकार्पणाची कर्जतकरांना आस- दिलीप गडकरी
Untitield-1 अशोक गायकवाड कर्जत : आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडलेल्या ६ कोटींच्या कर्जत मधील आंबराई येथे असलेले खुले नाट्यगृह व क्रीडांगण यांच्या लोकार्पणाची कर्जतकर आतुरतेने वाट पहात असल्याचे उपरोधिक वक्तव्य समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी केले आहे. कर्जत नगरपरिषदने १९९५ मध्ये युडीआरसी अंतर्गत आंबराई येथे खुल्या नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. ५२ लाख रूपये अपेक्षित खर्चापैकी कर्जत नगरपरिषदने यूडीआरसीकडून २२ लाख रुपये कर्ज घेतले होते व शासनाकडून ३० लाख रुपये अनुदान मिळाले होते.९५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही नोव्हेंबर २०२० पर्यंत म्हणजे २५ वर्ष अर्धवट राहिलेले काम नाट्यरसिक , क्रीडारसिक , जागृत पत्रकार , नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये खुले नाट्यगृह आणि क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला.या कामासाठी सुमारे ४ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपये खर्च केले आहेत.म्हणजे या प्रकल्पावर जवळ जवळ सहा कोटी रुपये खर्च करून सुध्दा २९ वर्षांत ह्याचा वापर करता येऊ नये ही गंभीर बाब आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोकाट सुटलेली कुत्री , दागिने खेचून नेणारे चोरटे व सुसाट वाहनं चालवणारे चालक यांच्यापासून जीव मुठीत घेऊन ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात. जर का आंबराई येथे फिरण्याची सोय झाली तर ज्येष्ठ नागरीकांना सुरक्षितपणे फिरता येईल.तसेच नाट्यगृह सुरू झाले तर तेथे ज्येष्ठ नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करता येतील.तरी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते , आमदार , माजी आमदार , भावी आमदार (सर्व इच्छूक उमेदवार ) यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून हा २९ वर्ष रेंगाळलेला प्रकल्प ताबडतोब लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा असल्याचे समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी म्हटले आहे.
भाजपचे आमदार नितेश राणेंवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एआयएमआयएमच्या गृहमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर एनआरआय पोलिसांनी घेतली दखल नवी मुंबई : एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत असल्याच्या तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह उलवे सेक्टर १९ मधील गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उलवे येथे गणेशोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण केले. यामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक समाजाला अपमानित करणारे भाषण करून मुस्लिम समाजाला हिरवा साप अशी उपमा देवून त्यांना ठेवण्याची भाषा केली. यावेळी दिनांक १५ सप्टेंबर रोजी एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तसेच नितेश राणे यांना मुरुड येथे जाण्यासाठी परवागणी नाकारण्याची विनंती केली असता तत्काळ याची अंमलबजावणी करण्यात येवून तशा सूचना गृहमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी उलवे येथील घटनेच्या विरोधात नितेश राणे आणि आयोजक यांच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ धार्मिक भावना भडकविणे, ३५१ (२) गुन्हेगारी धमकी, ३५२ अशांतता पसरवून विशिष्ट समाजाला अपमानित करणे या कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संविधानाच्या लढ्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेणार – शरद पवार
रमेश औताडे मुंबई : संविधानाचा लढा मजबूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने सादर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर दिली. पक्षाचे अध्यक्ष नारायण बागडे यांनी सिल्वर ओक बंगल्यावर ” लोकसभा निवडणूक एक सविस्तर अहवाल ” शरद पवार यांना भेटून सादर केला त्यावेळी पवार बोलत होते. मागिल लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी रिपब्लीकन मोर्चाने आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळून संविधानाच्या बाजूने उभे असलेल्यांना विजय प्राप्त करून कसा दिला याची सर्व विभागवार माहिती या अहवालात बागडे यांनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते प्रतिगामी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते तर काही पक्ष आघाडी मतदानाचे विभाजन करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा संविधानाचे अस्तित्व धोक्यात होते अशा वेळेस मोठी जबाबदारी आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांवर आली होती. तेव्हा याच कार्यकर्त्यांनी प्रस्थापित नेत्यांचा घातकी हेतू नाकारून पुरोगामी परिवर्तनवादी पक्षाच्या बाजूने दंड थोपटले होते. हिच बाब या अहवालातून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता पवार यांनी याबाबत बागडे यांचे कौतुक केले. यावेळी शाम बागुल, प्रा.रमेश दुपारे, दिलीप कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील – अनंत विष्णु
रमेश औताडे मुंबई : दारूबंदी करून मोफत आरोग्य व शिक्षण तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण केली तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी . गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण. अजून रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी म्हणाले. सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.
गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार!
बाप्पामुळे कष्टकऱ्यांची उपासमारीपासून सुटका मुंबई ः मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भक्तिभावाने करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव अद्याप जोरात सुरू आहे. बाप्पामुळे कित्येक हौशी कलावंत,…
मलवाहिन्यांवरील उघडी गटारे बंद करणार
पालिका ७३ लाख ९५ हजार रुपयांचा करणार खर्च मुंबई ः वाहनांची ये-जा सुरळीत होण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील मलवाहिन्यांवरील गटारे झाकणांनी बंद करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर…
राणी बाग बुधवारी सुरू राहणार
मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी (ता. १८) खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. १९) बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र…