Category: होम

मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची…

 प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने राज्य शासन यावर्षी देणार

७५ हजार गोविंदांना प्रत्येकी १० लाखाचे विमा कवच ! अनिल ठाणेकर     ठाणे : परंपंरागत दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना, राज्य शासन यावर्षी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ७५ हजार गोविंदाना प्रत्येकी १० लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्वाचा सण गोकुळाष्टमी  म्हणजेच दहिकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई-ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात १५ ते ४० वयोगटातील तरूण-तरूणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दहिहंडी (गोविंदा) उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई-ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळअष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात.दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणार्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार ७५ हजार गोविंदाना ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यु झाल्यास परिवाराला दहा लाख मिळतील. तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रूपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख तसेच कायमस्वरूपी पुर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रूपये त्याचप्रमाणे अपघातामुळे रूग्णालयीन खर्च एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदाना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या सुमारे ७५ हजार गोविंदांना दहा लाखाचा विमा संरक्षण शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्यामुळे दहिहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

सर्वद फाऊंडेशनतर्फे डहाणूत आदिवासी  दिनाचे आयोजन

दिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद     मुंबई :  जागतिक  आदिवासी  दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू  मधील सारणी याठिकाणी  आदिवासी  नृत्यस्पर्धा आयोजित  केली  होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस  पाटील नाना लक्ष्मण  डगला यांनी श्रीफळ वाढवून आदिवासी  पारंपरिक  पद्धतीने  केले . यानंतर  सारणी गावच्या  ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा  सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा  उपाध्यक्षा श्रीमती  रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डॉ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन  स्वागत  केले .यानंतर  सर्वद फाऊंडेशन संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांनी  आदिवासी  दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा देऊन  आदिवासी  भाषा, संस्कृतीचे महत्त्व  विषद केले. यानंतर  वेगवेगळ्या  संघांनी तारपा नृत्य , गौरी  नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी  नाटक  सोंग काढणे हेही सादर करण्यात  आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी  केले. कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी  मंडळीनी परिश्रम  घेतले. आदिवासी  समाजाची संस्कृती  टिकून  राहण्यासाठी  सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात  आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रुपाली राऊत यांनी  पत्रकारांना सांगितले. 00000

एमएसपीसीच्या माध्यमातून फार्मासिस्ट होणार स्मार्ट

रमेश औताडे   मुंबई: महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदने  राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( एआय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ‘फार्मासिस्टची उन्नत्ती’ हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम,  कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ००००

घरोघरी तिरंगा अभियान देशप्रेमाचा जागर- किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबविले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भालेराव, अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी उत्तम धाईगडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. शाममराव कदम, देशमुख, अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात यावर्षीही अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठया उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सातत्याने त्यागाची आणि बालिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. तिरंगा पदयात्रेस जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी जावळे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

पृथ्वीच्या व प्राण्यांच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या निमित्ताने व्हावे वृक्षारोपण

श्रावण महिना आला की आगळे-वेगळे वातावरण निर्माण होते व सणांना सुरूवात होवून सर्वत्र उत्साह दिसून येतो.श्रावण महिन्यात नागपंचमीला अत्यंत महत्व दिल्या जाते. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजाअर्चना केली जाते.नागपंचमीचा…

क्रांती भरात, त्रुटी दारात

परामर्ष हेमंत देसाई 2026 पर्यंत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा सध्याच्या एकदशांशावरून एकपंचमांश असा वाढण्याचा दिलासादायक अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने प्रकट केला आहे. एव्हाना जगभरातून परदेशस्थांनी आपल्या मायभूमीत…

बंगाली गोर्बाचेव्ह

डाव्यांनी झापडबंदच असले पाहिजे, कामगारांच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे, उद्योजकांचे हीत आणि त्यांना पायघड्या घालायची काहीच गरज नाही, अशी मानसिकता पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील डाव्यांची होती. उद्योगच आले…

महायुतीने शंभर जागा जिंकल्यास माझे नाव बदला- जयंत पाटील

पुणे : “विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडून येणार आहेत, यापेक्षा आधिक जागा आल्या तर माझे नाव बदला”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिलं आहे. पुण्यातील मंचरमध्ये राष्ट्रवादीची…