Category: महाराष्ट्र

Maharashtra News

एकच वादा ‘सुर्या’ दादा

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर अखेर मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर अपेक्षित विजय मिळवता आला. सूर्याच्या घणाघाती शतकामुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैराबादविरुद्ध ७ विकेट्सनी विजय मिळवला. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र आता बाद फेरी…

अजित पवार, शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व निवडणूकीनंतर संपेल

पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी ० साताऱ्यात उदयनराजे दिड लाखाच्या मताने पडणार ० बारामतीत सुप्रीया सुळे जिंकणार ० लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व संपणार कराड – लोकसभा निवडणुकीनंतर अजित…

शिवसेनेचे आमदार-खासदार भाजपामुळेच जिंकले-महाजन

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टिका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एवढे लक्षात ठेवावे की त्यांचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते…

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना ‘जागा’ दाखवू- शरद पवार

इंदापूर: ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची ‘जागा’ दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू…

मुख्यमंत्र्यांनीही जोर लावला तरी विजय आमचाच – राजू शेट्टी 

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही जोर लावला तीर जिंकणार आम्हीच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा सह अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला…

अन् रोहीत पवारांना अश्रु अनावर झाले

बारामती : पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं. जोपर्यंत लढण्यासाठी नवी…

सलग तिसऱ्या दिवशी नागपूरात भूकंपाचे धक्के

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. महिन्याभरात चौथ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात 2.7 रेक्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. काल, 4 एप्रिलला…

पुरवठा वाहनात चक्क तीन क्विंटल पन्नास किलो धान्य कमी

ग्रामस्थांच्या तपासणी अंती जरंडीला प्रकार उघडकीस सोयगाव : सोयगाव च्या पुरवठा विभागाकडून जरंडी गावासाठी आलेल्या रेशनचे धान्याचे वाहनाची ग्रामस्थांसह दक्षता समितीने वाहनातील रेशनचे धान्याची तपासणी करून घटनास्थळी च धान्य मोजणी केली त्या वाहनातील तीन क्विंटल धान्य कमी भरल्या चा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे याप्रकरणी ग्रामस्थांच्या मागणी वरून ग्रामपंचायत ने पंचनामा केला आहे. जरंडी गावात खरेदी विक्री संघाचे दुकान आहे गावातील विविध योजनेच्या ८८९ शिधापत्रिका धारक आहे त्यासाठी १२८ क्विंटल रेशनचे धान्य लागते मे महिन्यासाठी पुरवठा विभागाकडून शुक्रवारी जरंडी च्या रेशन दुकानाला सोयगाव वरून धान्य पुरवठा करण्यासाठी आलेल्या वाहनाला दुकानाजवळ येताच ग्रामस्थांसह दक्षता समितीचे सदस्त व उपसरपंच संजय पाटील यांनी हे वाहन खाली करण्याचा आधी वाहनाखाली वजन काटा लावून वाहनातील गहू तांदुळाच्या गोण्याची मोजणी केली असता प्रत्येक धान्याच्या गोणीत प्रत्येकी एक किलो याप्रमाणे धान्य कमी भरून गोनी चे वजन पन्नास किलो ऐवजी ४८ ते ४९ पन्नास किलो भरल्या मुळे २५६ गोण्या मध्ये तब्बल दोन क्विंटल पन्नास किलो व एक गव्हाची गोनी याप्रमाणे तीन क्विंटल धान्य कमी भरले असून जरंडी च्या लाभार्थ्यांच्या धान्य ला ऐन दुष्काळात कात्री लावली आहे ऐन दुष्काळात मे महिन्यात तब्बल शंभराहून अधिक कुटुंबियांना धान्य वाचून उपास मार होणार असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून सोयगाव तहसील व खरेदी विक्री संघ यांना लेखी पत्र दिले आहे यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही.

मोदींकडून शेतकऱ्यांचे हाल होतायेत-शरद पवार

नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी  सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले. सुप्रिया सुळे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली.  इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.