Category: मुंबई

Mumbai news

मुंबई पोर्ट ट्रस्टची कामगार महिला उपासमारीने मेली माणूसकीला काळीमा फासणारी घटना रमेश औताडे

मुंबई : मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या कामगारामधील एक…

कुख्यात गुंड विशाल गवळीसह पत्नी साक्षीलाही अटक

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगावात निर्जनस्थळी देऊन हत्या करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर 24 तास उलटून जात…

जे.जे. रुग्णालयात नववर्षापासून यंत्रमानव करणार शस्त्रक्रिया

 डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना दिले जातेय प्रशिक्षण मुंबई : जे.जे. रुग्णालयत येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज व सुलभ पद्धतीने पार पाडव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर केला जात आहे. खासगी रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. यंत्रमानवाच्या मदतीने अचूक आणि सखोल पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. मात्र या पद्धतीची शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणारी नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ व्हावा यासाठी जे.जे. रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानव आणण्यात आला आहे. या यंत्रमानवाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका या प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये सध्या डॉक्टर व तंत्रज्ञांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी रुग्णाालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात येत आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याबरोबरच यंत्रमानवाच्या वापरासाठी उभारण्यात येत असलेले स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे प्रशिक्षण व काही तांत्रिक कामे पूर्ण होताच जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात होणार आहे. यंत्रमानवाच्या मदतीने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्त्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, अशी माहिती शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. कशी होते यंत्रमानवाची मदत प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यंत्रमानवामध्ये असलेले कॅमेरे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दाखवतो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते. यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपये खर्च जे.जे.रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना अद्ययावत व यंत्रमानवाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा लाभ व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर.

मुंबई: पिंपरी-चिंचवड विरुध्द पालघर, यजमान सांगली विरुध्द उस्मानाबाद या कुमारी गटाच्या उद्घाटनीय सामन्या बरोबरच अन्य चार सामन्याने सांगलवाडी, सांगली येथील ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ…

नवी मुंबईतील होल्डींग पाँडच्या पुनर्जिवीकरणासाठी गतीमान कार्यवाही

नवी मुंबई: नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने विशेषत्वाने पावसाळी कालावधीत समुद्राच्या भरतीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सिडकोने नवी मुंबई वसविताना डच पध्दतीने धारण तलावांची (होल्डींग पाँड) रचना…

आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा ६ जानेवारीपासून रंगणार

मुंबई : गिरनार  चहा  पुरस्कृत  आणि  मुंबई क्रिकेट  असोशिएशन  मान्यता प्राप्त  असलेली आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या ६ जानेवारी पासून शिवाजी पार्क येथे रंगणार आहे. यंदाचे या स्पर्धेचे ३१ वे वर्ष असून मुंबईतील  १६ नामांकित रुग्णालयीन क्रिकेट संघांचा  या…

कल्याणमधील मुलीच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगाराला राजकीय पाठबळ

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका कल्याण : येथील पूर्वेतील चक्कीनाका भागातील निष्पाप अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी येथील संतप्त नागरिकांनी मूक मोर्चा काढला. कल्याण पूर्वेतील नंदादीप नगर येथून पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या गुन्हेगाराला यापूर्वी नेहमीच राजकीय पाठबळ मिळत गेले. या गुन्हेगारावर सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये त्याला वेळीच शिक्षा झाल्या असत्या तर आता मुलीच्या हत्येचे धाडस त्याने केले नसते. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होतील यासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी केली आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख शरद पाटील आणि इतर या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. नागरिकांनी तोंडाला काळी पट्टी लावली होती. शांततेत मोर्चा काढण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसर, कोळसेवाडी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याण शहरातील वाढत्या गुन्हे प्रकरणाने नागरिक अस्वस्थ झाले आहेत. राजकीय पाठबळ अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. या गुन्हेगाराला यापूर्वीपासून राजकीय पाठबळ मिळाले आहे. त्याच्यावर यापूर्वीच्या गुन्ह्यात कठोर कारवाई झाली असती तर त्याने हा गुन्हा केला नसता. परंतु, यापूर्वी या गुन्हेगाराला नेहमीच राजकीय अभय मिळत गेले. या गुन्हेगाराला पाठबळ देणारे राजकीय लोक कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे महेश गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या गुन्ह्यातील आरोपींना विनाविलंब फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. कोट अल्पवयीन मुलीच्या हत्येमधून याप्रकरणातील गुन्हेगार किती विकृत, क्रूर आहे हे दिसून येते. मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने याप्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. -महेश गायकवाड,माजी नगरसेवक. कोट ज्या क्रूरतेचा कळस गाठून गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्याच पध्दतीने आता या प्रकरणातील गु्न्हेगारांचा न्याय झाला पाहिजे. या गु्न्हेगारांना लवकरात लवकर फाशी होईल यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.- शरद पाटील,ठाकरे गट शहरप्रमुख,कल्याण पूर्व.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा आज अठरा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत. या कामासाठी कल्याण, डोंबिवली,…

उल्हासनगरात प्रलंबित मागण्यांसाठी मनसे कामगार सेनेचे आंदोलन

उल्हासनगर : : गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. 10,20,30 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना सेवा लाभ दयावा, अनुकंम्पा तत्वावर असलेल्या कामगारांना न्याय दयावा, सर्वच संर्वगाच्या पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत त्वरित निर्णय घेणे, नियमबाह्य कारभार सोपवण्यात आलेल्या अधिकारी वर्गाबाबत खुलासा करणे, सफाई कामगार यांना मोफत घरे नावावर करणे, कत्राटी कामगारांची पगारवाढ करणे आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच 30 डिसेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर खळ खट्याक करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात अध्यक्ष दिलीप थोरात यांच्यासह सचिन साठे, अनिल देवकर, रमेश वाघेला, राजेश मकवान, हरेष बेहनवाल, अजय गायकवाड, समाधान निकम, नितू बोरकर, प्रमिला खाबायतकर, शांताराम शेळके आदी सहभागी झाले होते.

उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या

पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे. Slug – पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे.