Category: मुंबई

Mumbai news

पुन्हा निवडणूक घ्या -संजय राऊत  

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…

महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही : उद्धव ठाकरे

मुंबई :  विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिकंले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी मविआच्या उमेदवारांना मतदान…

आम्ही आधुनिक अभिमन्यू  फडणवीस

मुंबई : विधानसभेच्या या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होत असल्याचे म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. तसेच आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह भेदल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “लोकसभेच्या निवडणुकीत जो…

आम्हीच खरी शिवसेना- शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या जनेतेन माझे ५६ आमदार विधानसभेत पाठवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवून दिले. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “जनतेने आज दाखवून दिलं. असली नकलीमध्ये…

महायुतीची लाट; मविआची वाट महायुती २३० मविआ ४६ इतर १२

जनतेच्या न्यायालयात एकनाथ शिंदे, अजित पवार जिंकले   स्वाती : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआची अक्षरशा वाट लागली. भाजपाप्रणित महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीला जेमतेम ४६ जागां…

 ठाणे व मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – प्रताप सरनाईक

 प्रताप सरनाईक हे १ लाख ९ हजार ११६ मताधिक्यांनी विजयी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो वॅन, मेट्रो प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय, कोविड-१९ च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मतदारांसमोर विकासकामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे.” आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.

मंगल प्रभात लोढा यांना पडलेल्या मतांची टक्केवारी मुंबईत सर्वाधिक!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा दणदणीत माताधिक्य घेऊन विजय झाला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्रात एकूण १३७९११ इतके एकूण मतदान झाले असून,…

देवेंद्र फडणवीस यांना मोहित कंबोज यांनी उचलून साजरा केला विजयाचा आनंद,

मुंबई : महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मोहीत कंबोज यांनी उचलून घेतलं होतं. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून…

आचारसंहिता संपताच मुंबई महापालिका उगारणार कारवाईचा बडगा

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मुंबईत बानरवाजीला उत येण्याची शक्यता आहे.…

 प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली

 चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी   मुंबई: मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तुकाराम काते विजयी झाले आणि त्यांना आव्हान देणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली. तुकाराम काते यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्येकर्त्यांनी चेंबूर परिसरात मोठा जल्लोष केला. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर विजयी झाले होते. यावेळी पक्षाने त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिले. त्यांच्यासमोर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली. यापूर्वी तुकाराम काते अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. चेंबूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र भाजपचे बळ मिळाल्यामुळे तुकाराम काते यांना मोठी मदत झाली. मतमोजणी दरम्यान काते आणि फातर्पेकर यांच्यात मोठी चुरस सुरू होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये तुकाराम काते पिछाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर काते यांनी आघाडी घेत फातर्पेकर यांना मागे टाकले. अखेर २१ व्या फेरीअंती काते यांचा १० हजार ८२२ मतांनी विजय झाला. काते यांना एकूण ६२ हजार ९९१ मते मिळाली, तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२ हजार १६९ मते मिळाली. ०००००