Category: मुंबई

Mumbai news

अतिक्रमण विभागाने तुर्भे विभागात केली तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली…

हरियाणा व महाराष्ट्राची परीस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल – रमेश चेन्नीथला

मुंबई : हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून…

मुंबईतील कौशल्य केंद्र एक लाख तरुणांना देणार प्रशिक्षण  – पियूष गोयल

मुंबई – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी आज कांदिवली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली. शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने…

वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त

वाहतूक पोलिसांचे कल्याणकरांना आवाहन कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नका, तसेच, दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी स्वतःच्या वाहनाऐवजी रिक्षा…

डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

डोंबिवली : शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश युवासेना सचिव आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी रविवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे…

– तिसरी मुंबई मास्टर्स स्क्वॉश स्पर्धा

अव्वल मानांकित राजपालला पराभवाचा धक्का मुंबई, 6 ऑक्टोबर: जिद्दीने आणि निर्धाराने खेळताना वरिंदर सिंगने अव्वल मानांकित संजय राजपालवर 11-7, 5-11, 11-8,12-10 असा शानदार विजय नोंदवत स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…

नंदू नाटेकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धा

पुण्याच्या दर्शन पुजारी व पूर्वा बर्वेला एकेरीत विजेतेपद मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनरायझर्स नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरीत अनुक्रमे…

शहाड उड्डाणपुल होणार चारपदरी

डोंबिवली, ता. ६ : शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत; मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर…

कमलाबाई कडवे स्मृती कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ६० मुलींमध्ये चुरस  

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणारी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे,…

काशिमिऱ्यात घोडागाड्यांची शर्यत

  ६ घोडे जप्त, तिघांना अटक वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्‍या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून ६ घोड्यांची सुटका केली आणि ३ जणांना अटक करण्यात आली आहे. वरसावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) या प्राण्यांसाठी काम करणार्‍या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि घोड्यांची सुटका केली. या कारवाईत ओवीन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक केली आहे. घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेच्या कलम २९१, २८१, १२५, ३(५) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिंबधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी भाईंदरच्या उत्तन गाव परिसरात राहणारे असून ऊरूस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत ६ घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येखखील पशू आश्रमात ठेवण्यात आले आहे.