Category: मुंबई

Mumbai news

आरक्षणावरून आता आदिवासींचा एल्गार

धनगरांना धनगडांत सामवण्यास विरोध महायुतीच्या आमदारांनीच फडकावला लाल बावटा अकोले : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदीवासी धनगडांच्या आरक्षणात धनगरांचा समावेश करण्याच्या या जीआरविरोधात आदिवासींनीच…

निवडणूकीपुर्वी मुख्यमंत्र्यांचे मिशन पुनर्वसन !

शिरसाठ सिडकोचे अध्यक्ष तर अडसूळ, पाटलांना महामंडळ मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वी पक्षातील नाराज नेत्यांची नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन पुनर्वसन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजय शिरसाठ यांना थेट सिडकोचे…

जीभ छाटा नंतर आता गाडून टाकू !

शिवसेना आमदार संजय गायकवाडांची तालीबानी भाषा  गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल राहुल गांधींविरोधातील वक्तव्य भोवलं मुंबई : तालीबानी नेत्यांनाही लाजवेल अशी दंगलखोर भाषा वापरणे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच भोवले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते…

कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा

 रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी डोंबिवली – कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जिन्याचा मार्ग बंद करून उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा गाळ्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. या गाळे मालकांना त्यांच्या जमीन मालकी, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. ही कागदपत्रे येत्या सात दिवसाच्या कालावधीत गाळे मालकांनी सादर केली नाहीतर तिन्ही गाळे पालिकेकडून भुईसपाट केले जाणार आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात (आयरे परिसर) भूमाफियांनी गणपती सुट्टीच्या कालावधीत बेकायदा गाळे उभारल्या आहेत, अशा तक्रारी पालिकेच्या ग प्रभागाकडे आल्या होत्या. गणपतीची पालिकेला सुट्टी असल्याने त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला असल्याची चर्चा होती. या गाळ्यांना सुशोभित करून तेथे आर. के. एन्टरप्रायझेस हे घर, गाळ्यांची विक्री करणारे कार्यालय माफियांनी सुरू केले आहे. रेल्वे जिन्याच्या मार्गात, प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात बेकायदा गाळे उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी परिमंडळ उपायुक्त व्दासे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून बेकायदा गाळे उभारलेल्या जागेची पाहणी केली. स्थानिकांनी हे गाळे जुने असल्याचे आणि कार्यालय सजावट आता केली असल्याचे सांगितले. या गाळ्यांचा कोणीही जमीन मालक, चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यांची नावे, पत्ते देण्यास स्थानिक रहिवासी असमर्थतता दर्शवत होते. अखेर साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी तिन्ही गाळे मालकांच्या गाळ्यांवर नोटिसा लावून येत्या सात दिवसात गाळ्यांची जमीन मालकी, बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. गाळे मालकांनी या कालावधीत पालिकेला संपर्क केला नाहीतर त्यांचे गाळे भुईसपाट करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पालिका, रेल्वेच्या जागा हडप करून भूमाफिया या गाळ्यांमध्ये कार्यालये सुरू करतात. तेथून चाळ, इमारती मधील बेकायदा घरे, गाळ्यांची विक्री करतात, अशा तक्रारी आहेत. भूमाफियांनी आपले म्हणणे वेळेत सादर केले नाहीतर तातडीने हे बेकायदा गाळे पालिकेने जमीनदोस्त करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेले गाळे जुने असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गाळे मालकांना जमीन मालकी, बांधकामाची परवानगी, कर पावती अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली आहे. ही कागदपत्रे गाळे मालकांनी सादर करण्यास असमर्थतता दर्शवली तर गाळे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे तातडीने जमीनदोस्त केले जातील. संजयकुमार कुमावत , साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.    

अनंत चतुर्दशी दिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

नवी मुंबई  : महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव 7 सप्टेंबर पासून अत्यंत उत्साहात संपन्न होत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यातबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला. पीओपी ऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास अनेक नागरिकांनी पसंती दर्शविली. शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणा-या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र म्हणून महानगरपालिकेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 137 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम अशा 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह सहा दिवस व सात दिवस अशा चारही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या चार विसर्जन दिवशी 35720 श्रीमूर्तीना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले असून पोलीस विभागाचे याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य होत आहे नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्यवस्तू गरजू मुलांना आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या रितीने पार पडले असून अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा विसर्जन सोहळाही निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 भाजपचे आमदार नितेश राणेंवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

   एआयएमआयएमच्या गृहमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर एनआरआय पोलिसांनी घेतली दखल नवी मुंबई : एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत असल्याच्या तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह उलवे सेक्टर १९ मधील गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उलवे येथे गणेशोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण केले. यामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक समाजाला अपमानित करणारे भाषण करून मुस्लिम समाजाला हिरवा साप अशी उपमा देवून त्यांना ठेवण्याची भाषा केली. यावेळी दिनांक १५ सप्टेंबर रोजी एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तसेच नितेश राणे यांना मुरुड येथे जाण्यासाठी परवागणी नाकारण्याची विनंती केली असता तत्काळ याची अंमलबजावणी करण्यात येवून तशा सूचना गृहमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी उलवे येथील घटनेच्या विरोधात नितेश राणे आणि आयोजक यांच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ धार्मिक भावना भडकविणे, ३५१ (२) गुन्हेगारी धमकी, ३५२ अशांतता पसरवून विशिष्ट समाजाला अपमानित करणे या कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भाजपचे आमदार नितेश राणेंवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 एआयएमआयएमच्या गृहमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर एनआरआय पोलिसांनी घेतली दखल नवी मुंबई : एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत असल्याच्या तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह उलवे सेक्टर १९ मधील गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उलवे येथे गणेशोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण केले. यामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक समाजाला अपमानित करणारे भाषण करून मुस्लिम समाजाला हिरवा साप अशी उपमा देवून त्यांना ठेवण्याची भाषा केली. यावेळी दिनांक १५ सप्टेंबर रोजी एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तसेच नितेश राणे यांना मुरुड येथे जाण्यासाठी परवागणी नाकारण्याची विनंती केली असता तत्काळ याची अंमलबजावणी करण्यात येवून तशा सूचना गृहमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी उलवे येथील घटनेच्या विरोधात नितेश राणे आणि आयोजक यांच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ धार्मिक भावना भडकविणे, ३५१ (२) गुन्हेगारी धमकी, ३५२ अशांतता पसरवून विशिष्ट समाजाला अपमानित करणे या कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संविधानाच्या लढ्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेणार – शरद पवार

रमेश औताडे मुंबई : संविधानाचा लढा मजबूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेण्यात येईल. अशी माहिती  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने सादर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर दिली. पक्षाचे अध्यक्ष नारायण बागडे यांनी सिल्वर ओक बंगल्यावर ” लोकसभा निवडणूक एक सविस्तर अहवाल ” शरद पवार यांना भेटून सादर केला त्यावेळी पवार बोलत होते. मागिल लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी रिपब्लीकन मोर्चाने आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळून संविधानाच्या बाजूने उभे असलेल्यांना विजय प्राप्त करून कसा दिला याची सर्व विभागवार माहिती या अहवालात बागडे यांनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे  मोठे नेते प्रतिगामी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते तर काही पक्ष आघाडी मतदानाचे विभाजन करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा संविधानाचे अस्तित्व धोक्यात होते अशा वेळेस मोठी जबाबदारी आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांवर आली होती. तेव्हा याच कार्यकर्त्यांनी प्रस्थापित नेत्यांचा घातकी हेतू नाकारून पुरोगामी परिवर्तनवादी पक्षाच्या बाजूने दंड थोपटले होते. हिच बाब या अहवालातून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता पवार यांनी याबाबत बागडे यांचे कौतुक केले. यावेळी शाम बागुल, प्रा.रमेश दुपारे, दिलीप कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील – अनंत विष्णु

रमेश औताडे मुंबई : दारूबंदी करून मोफत आरोग्य व शिक्षण तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण केली  तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी  मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी . गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण. अजून  रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी  म्हणाले. सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था,  शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.

गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार!

बाप्पामुळे कष्‍टकऱ्यांची उपासमारीपासून सुटका मुंबई ः मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भक्तिभावाने करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव अद्याप जोरात सुरू आहे. बाप्पामुळे कित्येक हौशी कलावंत,…