मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक
मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५…
Mumbai news
मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५…
लाडक्या मंत्र्यांसाठी योजना मंत्री संजय राठोड, बिल्डरमंत्री लाभार्थी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करा- विजय वडेट्टीवार मुंबई : महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रीमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डरमंत्री सरकारचा लाडका आहे. कागद पत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने सुरू केला आहे. नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाईची मागणी करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर आज हल्लाबोल केला. आपल्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचार कागपत्रांची हेराफेरी समोर आणली. अधिक माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम मंत्री संजय राठोड यांनी केला असून गोरबंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे.मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकारकक्षा बाहेर जावून मदत केली आहे. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे.गोरबंजारा समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड यांनी मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केले आहे. २२०० कोटी बजेट असताना ८००० कोटींची टेंडर काढली आहेत. असेही वडेट्टीवार म्हणाले. सरकारमधील बिल्डर मंत्र्याने तर कहरच केला आहे. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली ७०० कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आले आहे.असे वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केली. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
समानता आणण्यासाठी उच्चधिकारी समिती स्थापन मुंबई : विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहेत. वित्त विभागाचे अपर मुख्यसचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची सदर समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १० सप्टेंबरला ‘शासन निर्णय ‘ जारी केला आहे. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये नियोजन, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण व आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिवांसह उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव या समितीचे सदस्य असतील. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या याशिवाय भविष्यात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एक समानता रहावी, यासाठी ही समिती धोरण आखणार आहे. बार्टीमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने बार्टीच्या संशोधक विद्यार्थी संघटनांकडून शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याची वारंवार विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार २०२२ मधील ७६३ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून व शपथ पत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. हा निधी बार्टीनेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याकरिता शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बगिचा आरक्षणावर बेकायदा इमारतीची उभारणी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील रेतीबंदर छेद रस्ता ते सत्यावान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिर मैदानाजवळ कल्याण डोंबिवली पालिकेचे बगिचा आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून भूमाफियांनी खरेदीदारांची फसवणूक सुरू केली आहे, अशी तक्रार उमेशनगर मधील रहिवासी संजय वसंत म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, पालिकेच्या साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना देण्यात आल्या आहेत. शशिकांत सुरेश म्हात्रे, योगेश हरिश्चंद्र भोईर या भूमाफियांनी मधुकर शांताराम म्हात्रे, शरद शांताराम म्हात्रे यांच्या सहकार्याने या बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. ही बेकायदा इमारत पालिकेने यापूर्वी अनधिकृत घोषित केली आहे. बगिचा आरक्षणावरील ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी म्हणून आपण सतत पालिकेत पत्रव्यवहार करत आहोत. आपणास पालिकेच्या ह प्रभागा कार्यालयाकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात येऊन या बेकायदा इमारतीला अधिकारी पाठबळ देत आहेत, असे संजय म्हात्रे यांनी सांगितले. सात माळ्याच्या या बेकायदा इमारतीची पालिकेची बनावट बांधकाम कागदपत्रे, महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून उभारणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी पध्दतीने या इमारतीमधील सदनिका भूमाफिया घर खरेदीदारांना विक्री करत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.या बेकायदा इमारतीवर भुईसपाट करण्याची कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा आपण उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले. या बेकायदा इमारतीपासून १०० फुटावर राहुलनगरमध्ये रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या दोन बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बेकायदा इमारतींवरही पालिकेकडून कारवाई केली जात नाही. आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालून गावदेवी मंदिराजवळील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांची आणि राहुलनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या तिन्ही बेकायदा इमारती भुईसपाट करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आणि ह प्रभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. याविषयी उघड बोलले तर त्रास होईल या भीतीने कोणीही रहिवासी उघडपणे बोलत नाही. देवीचापाडा गावदेवी मंदिर येथील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांनी उभारलेल्या बेकायदा इमारतीची माहिती घेतो. ही इमारत यापूर्वीच अनधिकृत म्हणून घोषित केली आहे की नाही याविषयी खात्री करतो. ही इमारत आरक्षित भूखंडावर उभी असेल तर आयुक्तांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्यात येईल. याशिवाय, राहुलनगरमधील दोन्ही बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे.-राजेश सावंतसाहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.
भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली. खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.
मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कविता राणाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने व्ही. कुलदीपचा ११-४, ११-४, ११-४ असा सहज पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक जोरकस फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे व्ही. कुलदीपला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कविता राणा विरुद्ध कृतिका यामधील महिलांची अंतिम लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या कृतिका अग्रवालला अखेर कविता राणाने ११-६, ३-११, ११-७ असे चकविले आणि कविताने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुष गटामध्ये अंकित धीकोनिया, व्ही. कुलदीप, आशिष दवे, अभी चटोपाध्याय तर महिला गटामध्ये कविता राणा, कृतिका अग्रवाल, प्रार्थना मस्तुल, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.
मुंबई : येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय नववीत शिकत असलेल्या द्रिश्या श्रीकांत नाईक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत द्रिश्याने चमकदार कामगिरी करताना ६ गुणांची कमाई करुन आपले हरियाणाचे तिकिट पक्के केले. या स्पर्धेत तिने ६ विजय मिळविले. तर दोन सामने गमावले. तिचा चौथा क्रमांक लागला. स्पर्धेत प्रथम ६ क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. शेवटच्या फेरीत द्रिश्याने यजमान कोल्हापूरच्या प्रथम मानांकन देण्यात आलेल्या दिव्या पाटीलचा पराभव करुन स्पर्धेत खळबळ माजवली. तसेच तिने पुण्याच्या फिडे रेटेड खेळाडू राजराजेश्वरी देशमुखला देखील नमविण्याचा पराक्रम केला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली द्रिश्या मुंबईची एकमेव खेळाडू आहे. ३ वर्षे स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणाऱ्या द्रिश्याचे केतन पाटील प्रशिक्षक आहेत. ती रोज ४ तास नियमित सराव करते. तिचे वडिल आंतर कॉलेज बुद्धिबळ स्पर्धेत खेळले होते.
मुंबई : घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला पहायला मिळतात. ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीमती शुभांगी जयंत लेले यांच्या निवासस्थानी सुपूत्र आनंद, स्नुषा स्नेहा आणि नात मधुरा ही मंडळी दरवर्षी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतात. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा बनवून त्यापासून विविध प्रकारची सजावट करतात. पेन्सिली, सोडावॉटर बाटल्या, छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जुन्या वह्या, पुस्तके, किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या वस्तूंच्या खोक्यांचा वापर सजावटीसाठी करुन आनंद जयंत लेले यांनी पारितोषिके पटकावली आहेत. ग्रंथ आणि साहित्य यांचा उपयोग करुन साहित्य प्रेमी गणरायही भक्तांच्या दर्शनाला आले आहेत. यंदा कोरोगेटेड बॉक्सच्या पुठ्ठ्यातून मंदिर साकारुन त्याला छानशी रंगसंगती करुन भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे.
दादरच्या सुंदरनगरी अवतरली अयोध्या : श्री सिद्धिविनायक अंध अपंग सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या सुंदरनगर, दादर येथील निवासस्थानी श्री गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. या विलोभनीय मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी लोटत आहे.
मुंबई : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये जे ऐतिहासिक भाषण केले त्याला १३१ वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे ” राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास ” संस्थेने राष्ट्रप्रेम उत्सव चे आयोजन केले असल्याची माहिती न्यास चे अध्यक्ष नीरज कुमार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ११ सप्टेंबर रोजी होत असलेल्या या राष्ट्रप्रेम उत्सवामध्ये युवकांच्या भविष्यावर परिसंवाद, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन, देव धर्म या पेक्षा देश मोठा आहे या विषयावर भव्य नाटक, राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, मनजीत सिंग,कुमार सुशांत, रोशन सिंग उपस्थित होते.