सावलीसाठी सारेकाही…
(छाया-संतोष नागवेकर) अवघा महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघत आहे. अशावेळी मुक्या जनावरांचे हाल पुसायला मायानगरी मुंबईत वेळ तो कुणाला असणार ? पण या गाईला दादरच्या पुलावर चारापाणी देताना त्याच्या मालकाने अशी…
Mumbai news
(छाया-संतोष नागवेकर) अवघा महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघत आहे. अशावेळी मुक्या जनावरांचे हाल पुसायला मायानगरी मुंबईत वेळ तो कुणाला असणार ? पण या गाईला दादरच्या पुलावर चारापाणी देताना त्याच्या मालकाने अशी…
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. एकीकडे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, त्यांना वेगात आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त…
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या, मंगळवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर कि.मी १९.१०० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी…
पॅरिसमधिल जागतिक छायाचित्र स्पर्धेत पहिला क्रमांक मुंबई- औरंगाबादच्या बैजू पाटील यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपला ठसा उमठविला आहे. पॅरिसमधिल ३३ व्या जागतिक पक्षी आणि निर्सग छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील…
मुंबई : मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव आहे, अजून खूप सत्य उघड व्हायचयं असा…
नवी मुंबई : राज्य सरकारने आरटीई प्रवेश नियमावलीत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे प्रवेशप्रक्रिया करताना पालकवर्गात मोठा गोंधळ उडाला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असल्यास इतर खासगी अथवा अनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे स्वप्न भंगले आहे. सध्या आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना पालकांना इतर खासगी शाळांच्या जागा दिसत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत अनुदानित खासगी, विनाअनुदानित आणि महापालिका अशा सुमारे दीड हजार शाळा आहेत. नवी मुंबई शहर हे सिडकोने नियोजन करून वसवल्यामुळे प्रत्येक प्रभागात महापालिकेची शाळा आहे. ज्या भागात महापालिकेची शाळा आहे, त्याच परिसरात इतर संस्थांच्या खासगी आणि अनुदानित शाळाही आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ते उच्चवर्गीय गटांतील प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी ही चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घ्यावे, अशीच धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, तो वंचित राहू नये, याकरिता सरकारने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबले. याच धोरणातून आरटीईचा जन्म झाला. सरकारी शाळा अनुदानित आहेत, अशा स्वायत्त संस्थांमधून आरटीईद्वारे शिक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. त्यामुळे खासगी शाळांमध्ये पालकांना शिशू वर्गापासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देता येत होते; मात्र आता सरकारने आरटीई धोरणात बदल केल्यामुळे आरटीईच्या पोर्टलमधून खासगी शाळांची नावे गायब झाली आहेत. ज्या भागात सरकारी अथवा महापालिकेची शाळा आहे, अशा परिसरात इंग्रजी खासगी शाळांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पालकांना खासगीऐवजी सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवावे लागणार आहे. पोर्टलहून महापालिकेच्या शाळा गायब नवी मुंबई शहरात सीवूड्स, सारसोळे, कोपरखैरणे या ठिकाणी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा ज्या परिसरात आहेत, त्या ठिकाणच्या पालकांना आरटीई पोर्टलवर इतर खासगी शाळा दिसत नाही; मात्र महापालिकेच्या शाळाही पोर्टलवर दिसत नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा नवा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी महापालिकेचे नवीन पोर्टल सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता महापालिकेतर्फे वेगळे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरून पालकांना पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. हे पोर्टल अद्याप तयार न झाल्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवली असल्याचे समजते आहे. शाळांना मान्यता नाही नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना अद्याप दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळ मान्यता मिळवण्यात नवी मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरटीई पोर्टलवर नवी मुंबईच्या शाळा मान्यता नसल्याने दिसत नाही. मात्र, एकीकडे शाळांना परवानगी आणण्याचे आणि दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेकरिता पोर्टल तयार करण्याचे दोन्ही समांतर काम सुरू असल्याचे समजले. महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांना मान्यता घेणे आणि प्रवेशप्रक्रिया राबवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शहरातील पालकांकरिता स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मुंबई : मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात आहे. येथील म्हामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमीच घडतात. त्यात अनेकांना तत्काळ उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले आहेत; परंतु शहापूर तालुक्यात अपघातग्रस्तांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो; परंतु येथे उपचारास मर्यादा आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारांसाठी अपघातग्रस्तांना ठाणे, कल्याण व मुंबई यांसारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते. मागील वर्षी समृद्धी मार्गावर अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने ते मृतदेह उघड्यावर ठेवले होते. रस्ते अपघात झाल्यास जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे; मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. पाच एकर जागा मंजूर ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्गालगतच मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे जखमींना तत्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात; तर या रुग्णालयालगत पाच एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
रमेश औताडे मुंबई : नरीमन पॉइंट, मरीन लाइन्स समुद्रालगत एकूण ८ एकर जागेवर वसलेले एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र आहे. ‘संस्था भेट चर्चा थेट’ या उपक्रमाव्दारे एनसीपीए कलादालने तसेच लायब्ररी भेट व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी नयन कळे , मुख्य ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी तसेच रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या संकल्पनेतून कलाकार तसेच वाचकांसाठी असलेली सामाजिक बांधिलकी टाटा थिएटर, जमशेद भाभा थिएटर, एक्सप्रिमेंटल थिएटर, गोदरेज डान्स थिएटर, लिटील थिएटर, दिलीप पिरामल प्रदर्शन गॅलरी, एनसीपीए रेकॉर्डिंग स्टुडिओ इतर ची वैशिष्ट्ये, आसन क्षमता, विद्युत व्यवस्था, श्रोत्यांसाठी ध्वनी व्यवस्थापन, एनसीपीए आर्ट ॲट द पार्कची सामान्य नागरिकांसाठीची संकल्पना ही महत्वपूर्ण आहे.अशी माहिती नयन काळे यांनी दिली. लायब्ररीतील पुस्तकांची नियोजनबद्ध मांडणी,संदर्भित वास्तु विशारद पुस्तके,विविध संगीत क्षेत्रातील इसवी सनातील माहिती,सभासद नोंदणी प्रक्रिया,सभासदांना मिळणार-या सुविधांची माहिती सुजाता जाधव यांनी दिली. रूग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्थेच्या साधारण ३५ हून अधिक संस्था पदाधिका-यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवली. एनसीपीएच्या भेटीत मिळालेली माहिती सामाजिक संस्था पदाधिका-यांनी मौखिक प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही दिली. एनसीपीए व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनातून भेटीचा हेतू सफल झाल्याचे धनंजय पवार, नवीन कुमार पांचाळ, रमेश चव्हाण, श्रुती साडविलकर या समन्वयकांनी आपले मत व्यक्त केले. नयन काळे व सुजाता जाधव यांचा शाल व रुग्ण मित्र संस्था भेट चर्चा थेट तथा वैद्यकीय मदत पुस्तक देऊन नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे आरोग्य दूत सुभाष गायकवाड़ यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. संस्था भेटीत पूर्वा कदम, बाळकृष्ण नाणेकर, प्रदीप कुलकर्णी, अमिता शर्मा, सी.पी.पावसकर, गोविंद मोरे, प्रविण खेडेकर, प्रज्वला इंगळे, शांताराम मोरे, रूपाली कापसे, अक्षता कापसे, रोहन पालकर, एस.पी.जहागीरदार,अमेय गिरकर, छाया भटनागर, वैष्णवी शिंदे, अन्वी भटनागर, आद्या भटनागर,डाॅ.स्मिता तरे, डाॅ.अलका थरवळ, मिनाक्षी वेलणकर, आदिती गायकवाड, सुभाष गायकवाड, डी.डी.सावंत, रेहाना शेख, अख्तर हुसेन यांनी सहभाग घेतला.
अशोक गायकवाड नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील शासकीय ध्वजारोहण बुधवार दि.१ मे, २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याहस्ते कळंबोली सेक्टर १७ येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापनदिनाचा हा सोहळा लोकसभा निवडणूकीमुळे लावण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या व उत्साहात साजरा होणार आहे. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, उन्हाची तीव्रता लक्षात घेता उपस्थितांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईसह जगभरातील बहाई धर्मीय समुदाय आणि त्यांचे अनुयायी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीला येणारे दिवस मिळून 12 दिवस त्यांचा रिझवान महोत्सव उत्सव साजरा करतील अशी माहिती मरीन लाईन्स येथील बहाई सेंटर मध्ये उपस्थित बहाई समुदाय समोर नर्गिस गौर यांनी दिली.यावेळी बहाई धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. नर्गिस गौर पुढे म्हणाल्या कि जगाला सुख, शान्ति, प्रेम, आनंद,समृद्धी सोबतच मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या बहाई धार्मियांचा रिझवान हा वार्षिक मोहोत्सव असतो.याच वार्षिक महोत्सवा दरम्यान बहाई धर्माचे अवतार संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे प्रेषित म्हणून घोषित केले. ही घोषणा बहाउल्लाह ह्यांनी २१ एप्रिल १८६३ रोजी बगदादमधील टायग्रिस नदीकाठी एका बागेत केली ज्या बागेला त्यांनी “रिझवान”, म्हणजे “स्वर्ग” असे नाव दिले. या काळात बहाउल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिक तत्त्वांची घोषणा केली. मानवतेच्या जीवनाच्या उत्क्रांतीच्या एका नवीन टप्यावर येण्याचे संकेत शांतता आणि हिंसेचा अंत. सोबतच याच रिझवान उत्सवाच्या पहिल्या दिवशी जगभरातील हजारो भागात बहाई अनुयायी त्यांच्या स्थानिक प्रशासकीय परिषदांसाठी मतदान करतात. या बहाई निवडणुका अद्वितीय आहेत कारण या गुप्त मतदानाने व मतांच्या संख्या धिक्याच्याबळावर आणि उमेदवारी, नामांकन व प्रचार यांच्याशिवाय पार पडतात. मतदान करतांना बहाई भाविक निर्विवाद निष्ठा,निःस्वार्थ भक्ती, प्रशिक्षित मन, मान्यताप्राप्त कुवत आणि संपन्न अनुभव अशा प्रकारे मुल्यांकन करून तसेच वयोमान, विविधता, लिंग किंवा अशा अन्य बाबींचा यथोचित विचार करून व्यक्तींची निवड करतात. बहाई धर्म स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नऊ सदस्यीय परिषदांद्वारे आपले कामकाज चालवते. ही बहाईं भाविकांसाठी एक पवित्रतम प्रक्रिया असते, ज्यावेळी ते संपूर्णतः ईश्वराकडे उन्मुख होतात आणि उद्देशाच्या पावित्र्यासह, चेतनेच्या स्वातंत्र्यासह आणि हृदयाच्या शुद्धतेसह बहाई निवडणुकींमध्ये सहभागी होतात.असे नर्गिस गौर यांनी म्हटले.