Category: मुंबई

Mumbai news

छगन भुजबळ बंडाच्या तयारीत

स्वाती घोसाळकर  मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटात सारखे डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ बंडाच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी  समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करता यावे…

अथक चालणे हाच मुक्काम !

विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन प्रज्ञा जांभेकर मुंबई : शिक्षक-प्राध्यापक, लेखक-समीक्षक, पत्रकार-संपादक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असलेले विनय हर्डीकर 24 जून 2024 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत.…

मुंबई रत्न पुरस्कार कामगार नेते मारुती विश्वासराव यांना बहाल

मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय  सभागृहात  १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार,  ज्येष्ठ संपादक डॉ.  सुकृत खांडेकर यांच्या हस्ते, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधर कदम, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, शशिकांत सावंत, उद्योजक डॉ. नानजीभाई ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास अनिल ठाणेकर   ठाणे : लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांनाच तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता कोकण पदवीधर निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आमदार निरंजन डावखरे यांनी १२ वर्षांत पदवीधरांबरोबरच विविध विकासकामे केली. त्याचबरोबर विद्यार्थीभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न सोडविले. विधिमंडळातही ते सतत प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत, असे मत व्यक्त करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निरंजन डावखरें यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला. लोकसभेनंतर होणारी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे, असे या मेळाव्यात नमूद करून महायुतीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता कार्य करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ताकदीने निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिकमध्ये भाजपासह महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले असले, तरी राज्यात महायुतीला लक्षणीय मते मिळाली. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली. आता या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच लोकसभा निवडणुकीत काही एनजीओंनीही महाविकास आघाडीच्या साह्याने नरेटिव्ह निर्माण केले. मोदी द्वेषाने पछाडलेल्या काही एनजीओंमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले आहेत, असा आरोप करुन आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा आज सायंकाळी पार पडला. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, हेमंत सवरा, आमदार मंदाताई म्हात्रे, रमेश पाटील, प्रताप सरनाईक, उमाताई खापरे, गीता जैन, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, मनिषा कायंदे, माजी खासदार आनंद परांजपे, राजेंद्र गावित, माजी आमदार रविंद्र फाटक, संदीप नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव, मनसेचे पदाधिकारी अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आरपीआयचे भास्कर वाघमारे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे संकल्पपत्र असलेल्या `व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ००००

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू

अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार…   मुंबई : ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.…

लेट्स इमॅजिनचे वाडा, विक्रमगडमधील शाळांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई : जून महिन्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी लेट्स इमॅजिनने मॉर्गन स्टॅनलेतील कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने ( ग्लोबल व्हॉलंटरी मंथ या उपक्रमांतर्गत) वाडा आणि विक्रमगडमधील जिल्हा परिषदेच्या जवळपास 19 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. लेट्स इमॅजिनच्या पूर्णिमा नार्वेकर, मिहीर नागदा, कानन गोराडिया तसेच मॉर्गन स्टॅनलेच्या कर्मचारी प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. मुलांप्रमाणे शिक्षकांनाही उपयोगी असे साहित्य देण्यात आले.  पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम लेट्स इमॅजिन करते आहे.

मुंबई शहराची जिल्हास्तरीय पंच परीक्षा ३० जूनला

मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या पंच परीक्षेकरीता सोमवार दिनांक २४ जून पासून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. तरी जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या संघाच्या ज्या सदस्यांना ही परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पूर्ण भरून प्रवेश शुल्कसह शनि. दिनांक २२ जून पर्यंत कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीकरिता पंच समितीचे अध्यक्ष महेंद्र हळदणकर(९८६९८७८५८१) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (९८६९००३२२८) यांच्याशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे एका परिपत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो. ने प्रसार माध्यमांना कळविले आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २२ जूनला युवा संगीत महोत्सव

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक २२ जून २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या…

मुंबईत आठवलेंचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्‍वागत केले. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आठवले चैत्यभूमी येथे रवाना झाले. चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव केला. यावेळी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. ००००००

राज्यात माकप १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक?

 पवारांसोबत झाली सकारात्मक चर्चा!   मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  शरद पवार व  जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मा. आ.  नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार व जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली.