Category: मुंबई

Mumbai news

फडणवीसांची विनंती मान्य होणारी नाही- बावनकुळे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र फडणवीस यांचा हा निर्णय…

विधानसभेला महाविकास आघाडीच्या 185 जागा येणार : संजय राऊत

मुंबई : “लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना जबाबदारीने मुक्त केलं आहे. त्यांना विधानसभेसाठी मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी १८५ जागा जिंकल्यानंतर कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम…

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार !

मुंबई : मुंबईसह आज राज्यात सकाळी पावसाने दमदार हजेरी लावलीय. येत्या १४ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं…

फडणवीसांनी मोदींना तोंडघशी पाडले- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला महाराष्ट्रात ४५ पारचा आकडा दिला होता, तो आकडा गृहित धरुन तिथं मोदींनी चारशे पारची घोषणा केली आणि मोदी तोंडघशी पडले. अशी टीका करतानाच महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण…

अजित पवारांचे नाराज आमदार शरद पवारांच्या संपर्कात ?

मुंबई : जिंकून येण्याची हमी हा मंत्र असणाऱ्या भाजपाप्रणीत महायुतीत अजित पवरांच्या आमदारांचा दारूण पराभव झाला. एक तटकरेंचा अपवाद वगळलला तर अजित पवारांना स्वत:च्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. यामुळे अजित पवारांच्या…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप !

उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजीनाम्याची तयारी   “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, पक्षाला विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे जेणेकरून विधानसभेसाठी पक्षात पुर्णवेळ काम करता येईल ”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा…

हिवताप, डेंग्यूमुक्त मुंबईसाठी कृती आराखडा तयार करणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश मुंबई : मुंबई डेंग्यू व हिवतापमुक्त करण्यासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर भर देण्याबरोबर कृती आराखडा तया करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर जनजागृतीवर अधिक भर द्यायला हवा, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले. पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात जून हा ‘हिवताप विरोधी महिना’ म्हणून पाळण्यात येतो. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी एकत्रितरित्या मुंबईमध्ये दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. सुधाकर शिंदे बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून हिवताप निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सूचित केले. राज्य सरकारच्या हिवताप आणि कीटकजन्य आजार विभागाच्या तांत्रिक अधिकारी डॉ. रुप कुमारी यांनी रुग्णांवरील उपचाराबद्दलच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच हिवताप नियंत्रणासाठी १ – ३ – ७ धोरणचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे पथकप्रमुख डॉ. बद्री थापा यांनी हिवताप उद्रेकांचा तपास कसा करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच आवाहन केले. डॉ. एन. आर. तुली यांनी दिल्लीत विविध उपाययोजना कशा प्रकारे राबविल्या जातात, तसेच समुदाय जागरुकता कशी केली जाते यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबई महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सर्वांना सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे आवाहन केले. हिवताप, डेंग्यू नियंत्रणात आणणे, त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, कीटकनियंत्रण प्रभावीपणे राबविणे इत्यादी विषयांवर या परिसंवादात चर्चा झाली. यावेळी मुबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व ७ परिमंडळातील उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदींचा सहभाग होता.

मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी मुंबई: मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. चारही भावंडे सुखरूप असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. यातील तक्रारदाराचे अनुक्रमे अठरा, पंधरा, आठ आणि अकरा वर्षांचे चार भाचे त्यांच्या सावत्र आईसोबत २६ मेला घर सोडून निघून गेले होते. कौटुंबिक वादातून या सर्वांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. २८ मे रोजी मुलांची आई एकटी घरी परत आली होती. मात्र चारही भावंडे घरी न आल्याने त्यांच्या मामांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पथकाला मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. सावत्र आईच्या चौकशीतून ते सर्वजण अंधेरीहून दादर, कल्याण असे रेल्वेने पंजाब मेल पकडून दिल्लीच्या दिशेने गेले होते. मात्र मध्य प्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकात तिने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिने चौघांनाही घरी येण्याचा सल्ला दिला, मात्र ते चौघेही घरी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते पुढे निघून गेले; तर त्यांची आई पुन्हा मुंबईत निघून आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना ते चौघेही ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले होते. तिथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला होता. त्यामुळे या पथकाने ग्वाल्हेर शहरातील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या व्यक्तीने त्यांना माधव बाल निकेतन या आश्रमात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली. तिथे या चौघांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गॅस वाहिनीच्या सुरक्षेसाठी ‘डायल बिफोर डिग’ उपक्रम

मुंबई : महानगर गॅसच्या वायूवाहिनीला होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘डायल बिफोर डिग’ म्हणजेच खोदण्यापूर्वी सूचना द्या, हा उपक्रम महानगर गॅसने सुरू केला आहे. महानगर गॅसतर्फे महामुंबई परिसरात स्वयंपाकघरात लागणारे पीएनजी तसेच वाहनांचे इंधन असलेला सीएनजी वायू पुरवला जातो. हा पुरवठा अखंड राहावा, यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात आढळलेल्या कोणत्याही नियोजित खोदकामाची माहिती-तक्रार महानगर गॅसकडे करावी. ज्यामुळे वायू वाहिनीचे अपघाती नुकसान टळेल, त्यामुळे वायू गळती होणार नाही किंवा घरांना नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होणार नाही. तसेच संभाव्य सुरक्षा धोके टाळणार असल्याचे म्हटले आहे. खोदकामाची माहिती महानगर गॅसला खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीरशैव कक्कया-ढोर समाजाचे आंदोलन

धारावी  : वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने संत कक्कया आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्‍यातील समाजबांधवांनी आंदोलनासाठी…