महाराष्ट्र विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री. निलेश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांनी श्री. मदाने यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुस्तके प्रदान करुन सन्मानित केले.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड
अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साडेचार लाख रुपयांना बाळाची विक्री
तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश मुंबई : दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भादंवि कलम ३७०, ३४ सह अल्पवयीन न्याय (काळजी व संरक्षण) कायदा कलम ८० व ८१ अंतर्गत सहाजणांविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सीमा खान (३२) या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, हुसैन शेख या एक वर्ष सात महिन्यांच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाची आई नाजमीन शेख व वडील मोहम्मद शेख मालाड मालवणी परिसारीतल अब्दुल हमीद रोड परिसरातील वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने स्वतः आपल्या बाळाची विक्री केली. त्यासाठी अंधेरी पश्चिम इंदिरा नगर येथील तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात राहणारी राबिया अन्सारी व सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने या बाळाची विक्री करण्यात आली. साकीना शेख ही या दाम्पत्याची परिचित आहे. सायबा अन्सारीच्या परिचयातून ठाण्यातील इंद्रदीप ऊर्फ इंदर व्हटवार (४३) याला बाळाची विक्री करण्यात आली. व्हटवार हा चांगल्या कुटुंबातील असून समलिंगी आहे. त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता. वैद्यकीय खर्चासह चार लाख ६५ हजार रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सध्या अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅफरीन सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरणाच्या बनावामुळे बिंग फुलले मुलाची आत्या घरी आली असता मुलगा दिसून आला नाही. अखेर तिने भावाला विचारले असता एका व्यावायिकाने त्याचे अपहरण केल्याची खोटी माहिती सांगितली होती. त्यानंतर मुलाच्या आत्याने तात्काळ भावाला व त्याच्या पत्नीला मालवणी पोलीस ठाण्यात घेऊन गेली होती. त्यावेळी त्यांनी जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. पण त्याने बनवलेल्या कथेमध्ये अनेक चुका दिसू लागल्या त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला. आई-वडिलांनीच मुलांची विक्री केल्याची ही पहिली घटना नाही.
वाशी विभागात अनधिकृत झोपड्यावर धडक कारवाई
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यालयाअंतर्गत वाशीगांव व सेक्टर- ३१ येथे बेकायदेशीर / अनधिकृत झोपडपटटया वसलेल्या आहेत तसेच वाशीगांव परिसरातील नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडया वसलेल्या आहेत. केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत, वाशी येथील उद्यानाकरीता आरक्षीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर, वाशी सायन पनवेल हायवे लगत तसेच वाशीगांव खाडी किनारी लगत उभारण्यात आलेल्या झोपडपटटयांवर तोडक कारवाई करुन एकूण ६३८ अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मजूर व जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
४०० पार घोषणेचा फटका बसला- भुजबळ
मुंबई : देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर…
राज्यात घटलेल्या मतदानाच फटका कुणाला बसणार ?
48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा? मुंबई : लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होऊनही मतदारांना मतदान पेटीपर्यंत घेऊन जाण्यात सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. राज्यातील ४८ पैकी तब्बल…
मध्ये रेल्वेवर ३६ तासांचा मेगाब्लॅक
मुंबई : मध्य रेल्वेवरून येत्या १ आणि २ जूनला प्रवास करीत असाल तर रेल्वेचा प्रवास टाळा . कारण १ आणि २ जून रोजी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या…
खुषखबर ! पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार
मुंबई : उन्हाने होरपळून गेलेल्या अवघ्या देशवासीयांसाठी खुषखबर आहे. येत्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी…
विधान परिषद निवडणूकीत युती-आघाडीत धुसफूस
स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणूकीत गळ्यातगळे घालून युतीधर्म निभावण्याच्या आणाभाका घेणारी महायुती आणि महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणूकीवरून धुसफूस सुरु झाली आहे. ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. पण त्यापुर्वीच…
