Category: मुंबई

Mumbai news

अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे सुरू

नवी मुंबई: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात आली असून घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभागातील पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांचे अधिनस्त सहकारी यांनी तांत्रिक समुहासह अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम सलग दोन दिवस पहाटेपर्यंत प्रभावीपणे राबवली. घणसोली विभागात ठाणे बेलापूर सर्विस रोड येथे हॉटेल रामडा, औरम निवासी संकुल येथील 2 मोठे होर्डिंग निष्काषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसीच्या फायर ब्रिगेड जवळ असलेले फार मोठ्या आकाराचे होर्डिंगही हटविण्यात आले. तुर्भे विभागामध्ये एपीएमसी मार्केट येथील एक मोठे अनधिकृत होर्डिंग तसेच तुर्भे रेल्वे स्टेशन नजीकची पदपथावर असलेली दोन मोठी अनधिकृत होर्डिंग पहाटेपर्यंत काम करून निष्कासित करण्यात आली. आजही वाशी विभागात हायवेनजिकचे मोठे होर्डींग निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे. विभाग कार्यालयांमार्फत त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले.

अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील ३०५ रहिवाशांना मिळाली घराची हमी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ३०५ रहिवाशांना अखेर मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीद्वारे दिली. मुंबई मंडळाने ३०५ घरांसाठी सोडत काढली असून या ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पुनर्वसित इमारती उभ्या राहण्यापूर्वीच या इमारतीत पात्र रहिवाशांना कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर असणार याची हमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीद्वारे ही हमी देण्यात येत आहे. आतापर्यंत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील अनेक पात्र रहिवाशांना घराची हमी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. म. जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्यातील सर्वच्या सर्व १२५० रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे घराची हमी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजे ९०० रहिवाशांसाठी सोडत काढून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. या टप्प्यातील ३०५ रहिवाशांची सोडत शिल्लक होती. काही बाबींच्या अनुषंगाने या सोडतीला रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे ही सोडत रखडली होती. मागील आठवड्यात, शुक्रवारी, १० मे रोजी ना. म. जोशी मार्ग येथील ३०५ रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्यात येणार होती. सोडतीची सर्व तयारही झाली होती. मात्र या सोडतीला एकही रहिवासी उपस्थित न राहिल्याने सोडत रद्द करावी लागली होती. मात्र ही सोडत रद्द करतानाच मुंबई मंडळाने १४ मे रोजी रहिवाशी उपस्थित राहिले नाही तरी सोडत काढण्यात येईल अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार मंगळवारी ३०५ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून पात्र ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता ३०५ रहिवासी रहात असलेल्या चार इमारती रिकाम्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या ३०५ रहिवाशांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

२० मे रोजी होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासन सज्ज – संजय यादव

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार, २ हजार ५२० मतदान केंद्रे अशोक गायकवाड मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या…

घर मालकाला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : बोरिवली पश्चिम येथे एका इमारतीत दिलीप त्रिवेदी यांचा फ्लॅट असून २०१६ मध्ये त्यांनी दुष्यंत सोनी यांच्या कुटुंबीयांना भाड्याने राहायला जागा दिली. कोरोना काळातही त्रिवेदी यांनी सोनी यांना घरात…

एनएमएमटी प्रशासनाकडून आवाहन

नवी मुंबई : मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा पाचवा टप्पा दि.२० मे २०२४ रोजी घोषित झालेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या विधानसभा मतदार संघाच्या…

‘शिक्षणाचा पाया म्हणून कलाशिक्षणाकडे पाहिले पाहिजे’

कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केलं मत रमेश औताडे मुंबई : निसर्ग हा माणसाचा गुरू आहे, कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी क्रिया आहे. या…

दाढी दंडा विरोधात न्यायालयात धाव

रमेश औताडे  मुंबई :काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे. दाढी…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धूमाकुळ

मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर…

मुंबईकरांचा निघाला घामटा !

मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?-अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…