Category: मुंबई

Mumbai news

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

विकास धारियाची प्रथम मानांकित महम्मद घुफ्रानवर मात मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने स्पर्धेतील प्रथम मानांकित व विद्यमान एशियन चॅम्पियन  महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये २५-८, १६-७ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) वि वि सौरभ मते ( डी. के. सी. सी. ) २५-१, १८-१४ फहीम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( डी. के. सी. सी. ) ११-२२, २५-२०, २५-६ प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ) १०-७, २५-१५ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि समिधा जाधव ( डी. के. सी. सी. ) २५-१२, २५-० वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) वि वि निलम घोडके ( पी. ओ. आर. सी. ) १५-२४, २५-७, १८-१६ रिंकी कुमारी ( पी. ओ. आर. सी. ) वि वि उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २५-२१, १६-२१, २५-५ अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ) वि वि सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ) २२-१४, २३-११

औपचारीकता!

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जाइन्टविरुद्ध खेळलेला सामना मुंबई इंडियन्ससाठी फक्त एक औपचारीकता होती. २०२२ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लीगमध्ये सर्वात शेवटचं स्थान पटकावलं होतं. यावर्षीसुद्धा मुंबई…

अविनाश भोसलेंना जामीन मंजूर

मुंबई: येस बँक आणि डीएचएफएलच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले…

सीसीटीव्ही बंद झाले तरी ईव्हिएम मात्र सुरक्षित

मुंबई  : बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डिसप्ले मॉनिटर बंद पडल्याच्या घटना आहेत.मात्र सीसीटीव्ही मॉनिटर बंद पडले असले तरी त्याचे रेकॉर्डींग अव्याहत यावेळी सुरू होते.तसेच स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था…

भावेश भिंडेला पोलिस कोठडी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण मुंबई: घाटकोपर येथे होर्डींग कोसळून १६ निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डींगचा मालक भावेश भिंडेला न्यायालयान येत्या २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला…

दाढी, दंडा विरोधात महापालिकेत् एल्गार 

रमेश औताडे  मुंबई : काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे.…

शिवाजीपार्कवर ‘सावरकर’ बीकेसीत ‘आंबेडकर’

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…

तुतारीचा आवाज झालाच नसल्याने वैफल्यग्रस्त अनिल देशमुखांनी गाठली खालची पातळी- सुनिल तटकरे

माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही… मुंबई  -पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे…

लोकसभा निवडणुकीसाठी लालपरी सज्ज

करणार लाखोंची कमाई मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी २४६ एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून त्यातून ९० लाखांचे उत्पन्न एसटीच्या मुंबई विभागाला मिळणार आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे ८५०० ते हजार रुपये मिळणार आहेत. तीन टप्पे झालेत. राज्यात मतदानाचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचाही त्यामध्ये समावेश आहे.

पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून या प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन मोनोरेल गाड्या दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भारतातच या गाड्यांची बांधणी करण्याचे निश्चित करून एमएमआरडीएने गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करीत असून यासाठी ५९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी पहिली गाडी तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. वडाळा कारडेपोत या गाडीची जोडणी करण्यात आली असून गेल्या आठवड्यापासून या गाडीच्या चचणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी रात्री करण्यात येत आहे. स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी रात्री धावत आहे. दरम्यान, महिनाभर ही चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही गाडी सेवेत रुजू होणार आहे. उर्वरित नऊ गाड्या टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. या सर्व दहाही गाड्या सेवेत दाखल झाल्यास आजघडीला प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल दर सहा मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.