झैद – समृद्धीला अग्र मानांकन
एम सी एफ कॅरम स्पर्धा मुंबई:महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने २३ ते २५ मे दरम्यान ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा…
Mumbai news
एम सी एफ कॅरम स्पर्धा मुंबई:महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने २३ ते २५ मे दरम्यान ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा…
मुंबई / रमेश औताडे टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जगातील नंबर एक एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्स फोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्स फोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. असे गिरीश हड़कर, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स आणि मनकिरन चौहान एमडी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. या भागीदारीबद्दल संजय दत्त, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे एमडी आणि सीओ यांनी सांगितले की, सेल्सफोर्स सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला डेटा, इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांना एकाच सिस्टीममध्ये आणता आले. अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स यांनी सांगितले की, कोणतेही तंत्रज्ञान वापरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ते खरोखर ग्राहकाला अधिक चांगली सेवा देते का? टाटा रियल्टीच्या बाबतीत याचे उत्तर स्पष्ट आहे. प्रीमियम प्रकल्प आणि ग्राहक-केंद्रित कामासाठी ओळखली जाणारी टीआरआयएल आता आपले कामकाज आणि ग्राहक सेवा आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील टप्प्यात, कंपनी आपल्या कमर्शियल रिअल इस्टेट व्यवसायातही सेल्सफोर्सचा विस्तार करत आहे. तसेच रेसिडेन्शियल विभागात एजंटफोर्स मार्केटिंग आणि डेटा ३6० च्या मदतीने अधिक वैयक्तिकृत सेवा आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देण्यावर भर दिला जात आहे.
आठ वर्षांत ९,२८६ कोटींचा तोटा मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमावर आर्थिक संकट अधिकच गडद होत असून, गेल्या आठ वर्षांत झालेला तब्बल ९,२८६ कोटी रुपयांचा तोटा हा नैसर्गिक नसून…
आमदार प्रशांत ठाकूर यांची समिटला सदिच्छा भेट नवी मुंबई : अशोक गायकवाड नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बेलापूरच्या दि पार्क हॉटेल मध्ये बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समिटला सदिच्छा भेट देऊन आयोजकांना आगामी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच थायलंड येथून आलेले PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश यांना देखील शुभेच्छा दिल्या. या समिटमध्ये विविध व्यवसायिकांच्या पॅनल डिस्कशन साठी मॉडरेटर म्हणून काम पाहणाऱ्या सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर यांचे देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. यू बिझनेस मिट चे फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष दिवा : दिवा – मुंब्रा सीमेवर असलेले शिळफाटा तसेच भारत गिअर्स उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंग, लोखंडी केबिनच्या अतिक्रमणा विरोधात समाजसेवक विनोद वास्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रशासनाने दखल घेत तक्रार क्रमांक २६०३२२५ नोंदवला असून, संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. “आपली निवेदन/तक्रार संबंधित विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. सदर तक्रारीवरील कार्यवाहीबाबत अहवाल प्राप्त होताच आपणांस अवगत करण्यात येईल,” असे लेखी उत्तर तक्रारदारास देण्यात आले आहे. शिळफाटा उड्डाणपुलाखाली NHAI च्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा वाहन पार्किंग करण्यास परवानगी नसतानाही येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग व लोखंडी केबिन उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथे रोजच्या रोज मोठ्या लक्झरी बसेस, ट्रक, रिक्षा, टुरिस्ट गाड्या, चार चाकी आणि दु चाकी वाहने उभी असल्यामुळे वाहतूक व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करते का, अतिक्रमण हटवले जाते का, याकडे आता शिळ- डायघर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “प्रशासनाने तक्रार क्रमांक देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता संबंधित विभाग उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग व केबिनबाबत काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया समाजसेवक विनोद वास्कर यांनी दिली.
आरती परब दिवा : दिवा शहरात वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाने जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे. यासाठी शहरातील लहान- मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिवा शहर हे पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ बनले असून येथे खरेदीदारांची मोठी वर्दळ असते. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे शहरात अनेक दुकाने, हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नर तसेच गोडाऊन्स उभारण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दुकानांमध्ये कचरापेटीची व्यवस्था नसल्याने ग्राहकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यावर फेकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. “स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून शहरातील प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याची आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानात छोटी कचरापेटी ठेवली तर ग्राहक रस्त्यावर कचरा टाकण्याऐवजी त्याचा योग्य वापर करतील,” असे ऍड. आदेश भगत यांनी सांगितले. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच इमारतींच्या मागील भागात कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “नागरिकांनीही उपलब्ध कचरापेटीचाच वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य केले, तर ‘स्वच्छ दिवा, सुंदर दिवा’ हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते,” असेही त्यांनी म्हटले आहे.
रमेश औताडे मुंबई : अनुसूचित जाती आरक्षण ऊपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने १५ जूनपर्यंत जाहीर न केल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान २५ जूनला आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाचे नेते राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी दिला. मातंग समाजाच्या सोबत इतर जातीना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.आजच्या बैठकीत इतर जातीचे नेते मोठ्या प्रमाणात हजर झाले होते. मातंग समाजाला आरक्षण पाहिजे असा समज सर्वत्र पसरला आहे. मात्र मातंग समाजा बरोबर इतर जातीला आरक्षण पाहिजे असे बाबुराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाने आदेश दिले आहेत. अनेक समित्या नेमल्या आहेत. मग हे आरक्षण संविधानिक नाही कसे? असा सवाल यावेळी करण्यात आला. सरकारने वेळोवेळी आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. आंदोलन तीव्र झाले की शिष्टमंडळाला बोलवायचे व वेळ मारून पुढील वेळी बघू असे आश्वासन दिले की काम झाले. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागते. असे किती दिवस चालणार? असा सवाल बाबुराव मुखेडकर यांनी केला. 00000000
रमेश औताडे मुंबई : सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.
अपना बाजारच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त मुंबई: अपना बाजारचा ७८ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पर्यटन तसेच मुंबईत रक्ताचा तुटवडा…
मदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नांना यश मुंबई,: मालाड पूर्व कुरार गाव भागातील संस्कार कॉलेज ते जी. जी. महालकरी मार्ग ह्या नवीन नियोजित १८.३० मी विकास नियोजन रस्त्यातील पहिल्या टप्प्यातील…