Category: पालघर

palghar news

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ,…

भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

भाजपचे स्थानिक आमदार कुमार ऐलानी यांच्या दबावाखाली पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा संजय गुप्ता यांचा आरोप   उल्हासनगर : मुंबई खार येथील रहिवासी आणि उल्हासनगरचे व्यापारी मुकेश वाधवा यांच्या…

 विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून ५५ कोटीचा निधी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न   डोंबिवली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली शहर परिसरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडून डोंबिवली शहरासाठी विशेष मुलभूत सोयी सुविधांतर्गत ५५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील एकूण २१५ कामे या निधीतून केली जाणार आहेत. या विकास कामांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, नाला बंदिस्ती, गटार, पायवाटा, बगिचा, उद्यान विकसित करणे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, विरंगुळा केंद्र, भटक्या मृत प्राण्यांसाठी विद्युत दाहिनी उभारणे, मुख्य चौक सुशोभिकरण अशी अनेक प्रकारची कामे केली जाणार आहेत. डोंबिवली शहरातील काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले असले तरी शहरांतर्गत काही रस्ते हे डांबरीचे आहेत. वाढत्या वस्तीचा विचार करून हेही रस्ते काँक्रिटचे होणे गरजेचे आहे. याशिवाय शहरातील वाढत्या वस्तीचा विचार करून नागरिकांना मनोरजंनाची ठिकाणी विकसित करण्याची आवश्यकता आहे. माणकोली पूल, टिटवाळा ते काटई बाह्य वळण रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर शहरांतर्गत पोहच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. हे मुद्दे मंत्री चव्हाण यांनी शासनाकडे मांडले. दूरगामी विचार करून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे डोंबिवली शहरासाठी मूलभुत सोयी सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. डोंबिवली शहर विकासाचा विचार करून शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. नगरविकास विभागाने डोंबिवली शहरासाठी ५५ कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला. दोन टप्प्यांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. २५ कोटीच्या निधीतून १०० विकास कामे आणि २५ कोटीच्या निधीतून ११५ विकास कामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कल्याण डोंबिवली पालिकेने निवीदा प्रक्रिया राबवून ही कामे करायचे आदेश आहेत. या कामांमुळे डोंबिवली शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मागील काही वर्षापासून पावसाळा आला की डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा होते. काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या नियंत्रणाखाली आहेत. हे रस्ते या यंत्रणाकडून वेळीच सुस्थितीत केले जात नसल्याने त्याचा त्रास डोंबिवलीतील प्रवाशांना होतो. हे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पक्षीय भेद न ठेवता डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागात ही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी मंत्री चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी शहरासाठी दिलेली ही भेट मानली जात आहे. कोट कल्याण डोंबिवली पालिकेतील विकास कामांसाठी निधीची उपलब्धता पाहता डोंबिवलीतील महत्वाची विकास कामे पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यामळे डोंबिवलीतील विकास कामांसाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी नगरविकास विभागाने तात्काळ मान्य केली. शहरासाठी आपल्या प्रयत्नातून ५५ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठीची निवीदा प्रक्रिया पार पडली की तात्काळ ही कामे सुरू केली जातील. – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली

उल्हासनगर: उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली झाली आहे. उल्हासनगर शहरासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना शहरातून मोठ्या सन्मानाने निरोप देण्यात आला. उल्हासनगर कॅम्प ३ येथील…

 मृत्यूपूर्वी 7 व्या वेतनाची एकत्रित रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृतांचे आंदोलन

2 हजार रुपयांची भीक नकोचे पालिकेला दिले पत्र   उल्हासनगर – सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रसंगी मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय? अशी हाक शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला दिली होती. मात्र पालिकेने या हाकेला प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या सेवनिवृत्तांनी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आंदोलन पुकारले आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील अनुदेय ठरणारी थकबाकी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचा शासन निर्णय असताना उल्हासनगर महानगर पालिकेने पाच वर्षानंतर फेब्रुवारी 2023 पासून दर महा दोन हजार रुपये याप्रमाणे ती प्रदान करणे सुरू केले आहे. सेवनिवृत्तांची फरकाची थकबाकी, निवृत्ती उपदान व निवृत्ती वेतन या सर्वांच्या फरकाची एकत्रित 5 ते 10 लाख रुपये होते.पण ती एकरकमी देण्याऐवजी 2 हजार रुपये प्रतिमाह देण्यात येत आहे. आता या तुटपुंज्या रकमेची आम्हाला भीक नको असे पत्रच सेवनिवृत्तांनी महानगरपालिकेला दिले आहे. हे सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आणि राज असरोंकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, नंदलाल समतानी, उमेश ठाकूर, अरुण जाधव, विलास सावळे, रतन दंडगव्हाळ, राकेश रॉय, सुंदर गजवानी, भगवान कुमावत, डी. एल. मगर, मनोहर पानसरे, भागवत पाटील, वामन सोनोने आदी बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करणार आहेत.

विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटविल्याने डोंबिवलीत तीव्र नाराजी

डोंबिवली : पुणे येथील गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने देशभरातील विद्वतजन, अर्थतज्ज्ञांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील…

आव्हानांवर मात करणारं शिक्षण देणारे  ‘बोकंद स’र शिक्षक आणि विद्यार्थी घडवणारा संस्थाचालक

पालघरः वर्गात चार भिंतीच्या आत आणि शाळेच्या वेळेत केवळ पुस्तक घेऊन ज्ञानदान करणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि असं काम करणारा शिक्षकही नव्हे, तर शिक्षणाची व्याख्या फार विस्तृत आहे. भारताचे दुसरे…

रक्षेतून वृक्षारोपणाने दिवंगताला श्रद्धांजली

मुरबाड : शहरालगतच्या टेंभरे (बु.) गावचे जेष्ठ ग्रामस्थ नंदा गौरू गायकवाड यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन जावई, दोन मुले, दोन पुतणी, दोन पुतणे व नऊ नातवंडे असा कटुंब असून तालुक्यात गायकवाड कुटुंबाचा मोठा गोतावळा असल्याने अंत्यविधी कार्याला मोठ्याप्रमाणात गर्दी होती. गावच्या वेशीवरील मुरबाडी नदीकाठी त्यांचा अंत्यविधी उरकल्यावर प्रेताची रक्षा नदीत न वाहता गायकवाड कुटुंबीयांनी सदर राखेतून पर्यावरण पूरक निर्णय घेतला. एरवी गावच्या स्मशानभूमीत दहन केलेल्या प्रेताची राख स्मशानभूमीच्या शेजारील मुरबाडी नदीत सोडली जाते. सदर नदीचा पाणी गावात दैनंदिन कामांसाठी वापरला जातो. तसेच गावातील जनावरे दररोज नदीवर पाणी पिण्यासाठी येत असून गावातील महिलांची दिवसभर कपडे धुवण्यासाठी नदीवर गर्दी असते. त्यामुळे प्रेताच्या राखेने नदीपात्र दूषित होण्याची संभावना असल्याने ती राख व वाहिलेली हार, फुले गोणींमध्ये भरून गायकवाड कुटुंबीयांनी नदीपात्रात न टाकता नदीकाठी खड्डे करून उपस्थितीतांच्या हस्ते त्यात जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, फणस, करंज, कदंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यासाठी वापरली. त्यामुळे रोपांना खत मिळून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागेल व हीच बाबांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना गायकवाड कटुंबियांनी व्यक्त केली. तर या निर्णयाने जुन्या अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्यास मदत होऊन तालुक्यातून एक सामाजिक तथा वैज्ञानिक प्रबोधनाचा संदेश सर्वत्र जाईल व एका नवीन नैसर्गिक विचारसरणीचा पाया मुरबाड तालुक्यातून रोवला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध

खासदार सवरा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने योगेश चांदेकर पालघरः लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत विरोधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने विक्रमगड येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली या वेळी आंदोलन करण्यात आले. अमेरिकेने रशियाची शकले केली. रशियानंतर भारत हा जगातील मोठी शक्ती असून, तिला भारताची शकले करायची आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या या कूट कारस्थानाला हातभार लावण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा या वेळी खा. सवरा यांनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देऊन डॉ. सवरा यांनी पंडित नेहरू यांचा हा विचार विरोधामुळे कसा रद्द करावा लागला, हे सांगितले. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेसचे सर्वच नेते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि त्यांची नाटक कंपनी देशात एक आणि परदेशात वेगळेच नाटक कसे करत आहे, हे सांगून जनतेला आता काँग्रेसचा खरा चेहरा सांगितला पाहिजे, असे ते म्हणाले. संविधान डोक्यावर घेणाऱ्यांचे ढोंग उघडे राहुल गांधी लोकसभेत येताना संविधान डोक्यावर घेऊन येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कसे वचनबद्ध आहोत असे सांगतात. हे त्यांचे ढोंग अमेरिकेतील त्यांच्या वक्तव्याने उघडे पाडले आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१९मध्ये प्रचंड बहुमत असतानाही आरक्षणाला कसा धक्का लागू दिला नाही, याचा उल्लेख करून खा. सवरा म्हणाले, की मोदी यांनी स्वतःच लोकसभेत सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा अवतरले, तरी आरक्षण बदलू शकत नाही, एवढे आरक्षण भक्कम आहे. विधानसभेत आरक्षणविरोधकांची सत्ता येऊ देणार नाही भारतात किंवा महाराष्ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांची सत्ता येऊ द्यायची नसेल, तर त्या विरोधात जनजागृती करावी लागेल. जनतेला विश्वासात घ्यावे लागेल आणि आरक्षण संपवण्यास निघालेल्या या पक्षांना घरी बसवावे लागेल, असा इशारा डॉ. सवरा यांनी दिला. काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्याचा मुखवटा टराटरा पाडून आरक्षणाला विरोध करणाऱ्या या पक्षाला धडा शिकवला पाहिजे, असा ठाम निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा कसा आहे, हे जनतेला पटवून द्यावे आणि आरक्षण विरोधक आता सत्तेत नको, अशी मानसिकता जनतेची तयार करायला हवी. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण रद्द करायला निघालेल्या या काँग्रेसला आता कधीच सत्तेत येणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.

डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली

डोंबिवली : बदलापूरमधून गेल्या महिन्यात चोरीला गेलेली रिक्षा डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली आहे. चोरीच्या रिक्षेवरील चालक विना गणवेश डोंबिवली पूर्वेत रामनगर भागात रिक्षा चालवत होता. डोंबिवली वाहतूक विभागाच्या…