Category: पालघर

palghar news

गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार प्रशासनाचे दुर्लक्ष

सरपंचांकडून वारसा नोंदीचे दाखले, उपसरपंचांची नियमबाह्य ठेकेदारी ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि उपसरपंच नियम डावलून कारभार करत आहेत. ते…

 उल्हासनगरात दिड लाखाचा गुटखा जप्त

 ६ जणावर गुन्हा, तिघांना अटक   उल्हासनगर : स्टेशन परिसरातुन काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये प्रतिबंधित गुटखा बुधवारी सकाळी घेऊन जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून एकूण ६ जणांना ताब्यात घेतले. एकूण १ लाख ६५ हजाराचा गुटखा जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या ६ मध्ये ३ महिलांनाचा समावेश आहे. उल्हासनगरात गेल्या आठवड्यात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकून ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी उल्हासनगर स्टेशनला परिसरातून एका बॅग मध्ये गुटखा घेऊन जाणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. ताब्यात घेतलेल्या सहा जणा मध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या टोळीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुटखा कुठून आणला व कुठे नेण्यात येत होता. याबाबतची चौकशी पोलीस करीत होते. जप्त केलेल्या गुटक्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपयाची असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. अटक केलेल्या ३ पुरुष आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला नागरिकांकडून चोप

उल्हासनगर  – जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात…

मुरबाडच्या लेखणीचा गोवा राज्याच्या राजधानीत सन्मान…

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेली 20 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये काम करत ,समता सामाजिक फाउंडेशनआणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष, वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यभर सामाजिक काम करणारे, शांत संयमी, अभ्यासु पत्रकार शंकर करडे  त्यांच्या कामाची दखल घेत,गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया, एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने 2024 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस, आरपीआय आठवले गटाचे,अध्यक्ष दिनेश उघडे, रमेश देसले, समाजसेवक भगवान भालेराव, दयानंद रातांबे, संतोष उघडे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, तसेच देशातुन व राज्यातून मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ.बी एन खरात,यांनी केले होते. करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्याचें विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ०००००

दिवा-भिवंडी-विक्रमगड नवा लोहमार्ग टाकण्याची खासदार सवरा यांची मागणी

रेल्वेमंत्र्यांचे विविध मागण्यांकडे वेधले लक्ष योगेश चांदेकर पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी…

डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त

डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या १५ मीटर रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी गाळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या…

दिवा-भिवंडी-विक्रमगड नवा लोहमार्ग टाकण्याची खासदार सवरा यांची मागणी

रेल्वेमंत्र्यांचे विविध मागण्यांकडे वेधले लक्ष योगेश चांदेकर पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात डॉ. सवरा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणत आहेत. त्यासंबंधीची निवेदनेही ते देत आहेत. गेल्या दहा-वीस वर्षात दिवा-भिवंडी-अंबाडी- कुडूस- वाडा- विक्रमगड या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढणे आवश्यक आहे. या भागात नवीन लोहमार्ग टाकला, तर प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन पर्यंत जाणे शक्य होईल. तसेच थेट कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ होईल. याशिवाय भिवंडी-वाडा हे लोहमार्गाच्या नकाशावर येऊ शकतील, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा द्या याबाबत खा. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वसई येथे मेगा टर्मिनल सुरू करण्याबाबत वैष्णव यांनी दिलेला आश्वासनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वे मंडळाच्या बैठकीत कच्छ एक्सप्रेस, दादर बिकानेर एक्सप्रेस, बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाजीपूर एक्सप्रेस या लांब पल्यांच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून याठिकाणी देशभरातील कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करतात; परंतु त्यांना दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांना मुंबई किंवा सुरतला गाड्या पकडण्यासाठी जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर या जिल्हास्तराचा विचार करून रेल्वे मंडळाला पालघर येथे या चार लांब पडलेल्या गाड्यांना थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मेमो गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वेची आरक्षित जागा नालासोपारामधील निलमोरे या गावात आहे तलावाच्या आकाराची ही जागा बाग आणि क्रीडांगणासाठी महापालिकेने आरक्षित केले आहे. या जागेवर खर्च करण्यासाठी रेल्वेने ही जागा वसई विरार महापालिकेकडे द्यावी आणि त्यापैकी दहा हजार चौरस फुटाची जागा कमी होण्यासाठी द्यावी, अशी मागणी खा. सवरा यांनी वैष्णव यांच्याकडे केली. मेमो गाड्या घोलवडपर्यंत आणण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय बलसाड फास्ट पॅसेंजरपूर्वी सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठपर्यंत मेमो गाड्या सुरू कराव्यात, सुरतसाठी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान आणि सायंकाळी चार ते संध्याकाळी सात दरम्यान पॅसेंजर अगोदर मेमो सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.     उपनगरीय सेवा वापीपर्यंत वाढवा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सध्या डहाणूपर्यंत आहे. ती घोलवड किंवा उंबरगाव, वापी पर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही सेवा वाढवली, तर त्याचा फायदा विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल असे खासदार सवरा यांनी म्हटले आहे.  

 कर्व्हालो कुटुंबीयांनी जपले दोनशे वर्षांचे गुलाबी लसणाचे वाण

 नव्वद वर्षांच्या निकलस आजोबांची वाण जतनासाठी धडपड   योगेश चांदेकर पालघरः अलीकडच्या काळात शेती करणे कठीण झाले आहे. त्यात वसई सारख्या परिसरात तर शेतीऐवजी उद्योग आणि नोकऱ्या करण्याकडे लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत वसई तालुक्यातील गिरीज गावातील मारोडेवाडी येथे निकलस कर्व्हालो, त्याचे चिरंजीव अनिल आणि सून हर्षाली यांनी वाडवडीलांची गुलाबी लसणाच्या शेतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.अवघ्या दोन गुंठ्यांत हे गुलाबी लसणाचे हे वाण जिवंत ठेवण्यासाठी हे कुटुंब अतोनात कष्ट घेत असून पालघर जिल्ह्यात यांच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न कुठेही घेतले जात नाही त्यामुळे त्यांच्या लसणाचा सुगंध दूरवर दरवळत असून लसूण लागवडी अगोदरच खरेदीचे बुकिंग झालेले असते. वसई जवळ कर्व्हालो कुटुंबीयांची शेती आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. केळी, कांदा बोकर्ली, वांगी, फ्लावर्स, बनकेळी आदी पिके घेतली जातात. हे कुटुंब बाहेरून फारसे काही खरेदी करत नाही. तेल वगळता अन्य गरजा या त्यांच्या शेतीतून पूर्ण होतात. टाळेबंदीच्या काळात तर त्यांचे सर्व कुटुंब शेतीतील उत्पादनावरच जगत होते; उलट बाहेर सर्व बंद असल्याने त्यांना शेतीतील पिकांतून जादा उत्पन्न मिळाले. गुलाबी लसणाच्या शेतीत पडला नाही खंड अन्य पिकांच्या साखळीत जरी बदल करीत असले, तरी गुलाबी लसणाची शेती मात्र ते कायम करतात. अर्थात ती फार मोठ्या क्षेत्रावर केली जात नाही. वसई पश्चिम मधील गिरीज तलावानजीक मारोडे भागात त्यांची ही लसणाची शेती आहे. या परिसरातील जमीन अतिशय कडक असते; परंतु अनिल स्वतःच्या पावर ट्रिलरने तीन-चार वेळा मशागत करून ती भुसभुशीत करतात. त्यात शेणखत घातले जाते. कर्व्हालो कुटुंबीयांनी रासायनिक खतांना दूर ठेवले असून सेंद्रिय खते आणि शेणखतावरच भर दिला आहे. लसणाची शेती फारच अवघड लसणाची शेती तितकीशी सोपी नाही. एकेक पाकळी स्वतंत्र करून खणप्याने अर्धा इंच खोल पाकळी लावावी लागते. दोन पाकळ्यांच्या मध्ये वितभर अंतर ठेवावे लागते. हा लसूण रुजायला पंधरा दिवस लागतात. लसूण लावल्यानंतर त्याला पोहोच पाणी दिले जाते. पाणी जास्त दिले, तर लसूण सडण्याचा धोका असतो. त्यामुळे पोहोच पाणी ठराविक अंतराने द्यावे लागते. पंधरा दिवसानंतर कुठे लसूण पातळ झाला असेल, तर पुन्हा मोकळ्या जागी दुसऱ्यांदा लसणाची लागवड करावी लागते. जमिनीचा पोत बिघडू नये, म्हणून निर्माल्यापासून तयार केलेले खतच या गुलाबी लसणाच्या शेतीसाठी वापरले जाते. एरवी दर दहा दिवसांनी पाणी दिले जाते, तर ऊन वाढल्यानंतर मात्र आठ दिवसांनी पाणी द्यावे लागते. नव्वद दिवसात लसून तयार होतो. त्या अगोदर त्यावर करपा पडायला लागला, तर फवारणी करावी लागते; शिवाय दव पडण्याच्या काळात अधिक लक्ष द्यावे लागते. एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते. गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व पात पडायला लागली की लसून काढणीला आला, असा त्याचा अर्थ होतो. लसणाची शेती करणेही कांद्याइतके सोपे नसते, खुडणार नाही अशा पद्धतीने लसून काढावा लागतो. शेतातच २०-२५ दिवस तो सुकून ठेवावा लागतो. नंतर अर्धा अर्धा किलोचे पॅक तयार करून ते घरातील माळ्यावर ठेवले जातात. या गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. लसून आणि गूळ खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर रक्त पातळ होते. लसूण माळ्यावर ठेवला, की घराबाहेर त्याचा सुगंध जातो. त्यामुळे आमच्याकडे लसूण आहे हे सर्वांना समजते, असे हर्षाली यांनी सांगितले. दोनशे वर्षापासून आजोबा, पणजोबांनी जपलेले गुलाबी लसणाचे वाण जपण्यासाठी निकलस, अनिल आणि हर्षाली खूप कष्ट घेतात. मजूर मिळत नसल्याने समस्या कर्व्हालो कुटुंबीयांच्या लसणाची ख्याती दूरवर पसरली असून लसून लागवडीच्या अगोदरच त्यांच्याकडे आगाऊ नोंदणी केली जाते. कधी कधी एक एक वर्ष अगोदर नोंदणी असते. विशेषतः ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्याकडून तर हमखास गुलाबी लसणाची मागणी येते. अलीकडच्या काळात शेती परवडत नाही. विशेषतः कोकणातील शेती तुकड्या तुकड्याची आहे. त्यामुळे मशागत करता येत नाही; शिवाय मजूर मिळत नाही. ही वेगळी समस्या असतानाही कर्व्हालो कुटुंबीयांनी आपल्याशी मजुरांची एक टोळी कायम जोडून ठेवली असून, या महिलांच्या मदतीने लसूण लागवड आणि काढणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. निकलस आजोबांना आता शेती परवडत नाही, त्यामुळे शेती सोडण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याची खंत आहे. कोट ‘आपण केवळ आवडीमुळेच हे गुलाबी लसणाचे वाण जतन करण्यासाठी झटपटतो आहोत. माझ्या मुलाने आणि सुनेने शेती जपली आहे, याचा मला अभिमान आहे. पुढच्या काळात कोणी शेती करील, की नाही याबाबत संभ्रम आहे. -निकलस कर्व्हालो, गुलाबी लसून उत्पादक

 “मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही”

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दिल्लीवारीवरच्या अफवांवर स्पष्टीकरण   डोंबिवली : मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या इतर नेत्यांबरोबर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांचेही नाव चर्चेला येत आहे. शनिवारी ते तातडीने दिल्ली येथे गेल्याची चर्चा समाजमाध्यमांवर पसरली होती. काही माध्यमांनी याविषयी बातम्या चालविल्या. या सगळ्या अफवांवर स्पष्टीकरण देताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मात्र, मी डोंबिवलीतच आहे, मी दिल्लीला गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण ट्विटर (एक्स) च्या माध्यमातून रविवारी दिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. मी दोन दिवसात किंवा मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण देऊन नेते चव्हाण यांनी सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. आठवडा होत आला तरी राज्याचा मुख्यमंत्री ठरत नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेच्या माध्यमांतून अफवा पसरत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याच्या जोरदार हालचाली दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबरोबर, या चर्चेबरोबर मराठा चेहरा महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याच्या चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहेत. मध्यप्रदेश, हरियाणाचा अनुभव भाजप नेत्यांच्या गाठीशी आहेत. या राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्याही स्वप्नात, मनात नसलेले चेहरे भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर बसवून त्या त्या राज्यातील भाजपच्या इच्छुक, मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी सज्ज असलेल्या नेत्यांना हादरे दिले होते. आता तीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली जात आहे की काय, अशी धाकधूक भाजपच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्य भाजपमधील एक मोठा गट मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसला आहे. तर, मराठा आरक्षण, आंदोलने विचारात घेता मराठा चेहरा महाराष्ट्राला असावा या चर्चा आणि अफवांच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरिश महाजन यांची नावे विविध माध्यमांतून चर्चेला येत आहेत. मोहोळ यांनी समाज माध्यमातून आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारपासून रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने, अखेर चव्हाण यांना आपण दिल्लीत गेलेलो नाही आणि डोंबिवलीत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या सर्व गुप्त हालचालींचे सूत्रधार म्हणून रवींद्र चव्हाण यांनी पार पाडलेली जबाबदारी. कोकणासह, ठाणे, कोकणपट्टीवरील त्यांची हुकमत आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेथे जेथे जोरकसपणे प्रचार केला. तेथील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आले. ते चौथ्यादा निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्याचे राज्य कारभारतील महत्वाचे स्थान विचार घेता, जिल्ह्यावर आता भाजपची हुकमत वाढविण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत येत असावे, असे सांगत भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर मात्र, या सगळ्या अफवाच आहेत. दोन दिवसात खरे काय ते चित्र पुढे येईल, असे सांगितले. 0000

 गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

मुरबाड शहरी व ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु मुरबाड : (राजीव चंदने ) संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असली तरी तो बिनधास्तपणे दुध डेयरी, पानटपरी व वडापाव गाडीवर चोरून विकला जात आहे. शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटका थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेस पडत असतात. मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यातील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनदास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा उघड चर्चा आहे. मात्र असे असतांना गेल्या पाच ते सहा वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एक ही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करीत आहेत, अनेक वृत्तपत्रात गुटखा माफिया बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही? असा सवाल मुरबाड शहरातील शिवसेना पक्षाचे (उ. बा. ठा.) कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केला आहे. शहर व ग्रामीण भागातील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या परंतु या गुटखा माफियाना पोलिसांचा अभय असल्यामुळे ते बिनधास्त पणे खुलेआम गुटखा विक्री करीत आहेत, या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत,आणि त्या गुटखा माफियावंर मुरबाड पोलिसांना कडक कारवाई करण्यास भाग पाडू आणि कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू —–नरेश देसले, शिवसेना(उ.बा.ठा )कार्यकर्ते 000000