Category: पालघर

palghar news

उद्धव सेनेच्या पराभूत उमेदवाराने व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता भरले 4 लाख ७२ हजार रुपये

डोंबिवली : डोबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धव सेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत म्हात्रे यांचा पराभव झाला.…

उपचाराअभावी गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू

हाणूमधील घटनेने खळबळ कासा : डहाणू तालुक्यातील एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी डोंगरकर ( २६) असे या गर्भवती…

शहापूर विधानसभा राष्ट्रवादी उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी वाडा तालुक्यातील 3 हजार 946 मतांची आघाडी ठरली निर्णायक

जयेश पाटील, पालघर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यांच्यात चुरशीचीची लढत पाहायला मिळाली. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे 1671 मतांनी निवडून आले आहेत. दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या 49 बुथवर मिळालेल्या 3 हजार 946 मतांची आघाडी निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीने दौलत दरोडा यांना तारले आहे. लोकसभेतील आघाडी टिकवण्यात निलेश सांबरेना अपयश तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सांबरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या असून त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बुथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोबर यांना फक्त 9 बुथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 329 बूथ असून यात वाडा तालुक्यातील 49 बुथचाही समावेश आहे. शहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजित दादांचे राष्ट्रवादीच्या या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसऱ्या डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. मोज गटात शिवसेना (उबाठा)चे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे) चे सागर ठाकरे हे पंचायत समिती सदस्य आहेत. अबिटघर जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वलटे या जिल्हा परिषद सदस्य असून अभिर गणात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समिती सदस्य आहेत. तर कुडुस पंचायत समिती गणातील कोंढले ग्रामपंचायतमधील म्हसवल गाव व पाडे शहापूर विधानसभेत जोडलेले आहेत. वाडा तालुक्यातील 49 बूथमधील राजकीय परिस्थिती अशा प्रकारे असताना वाडा तालुक्यातील 49 बुध मध्ये 3 हजार 946 एवढी निर्णायक आघाडी देऊन आमदार दरोडा यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये राष्ट्रवादी (अप) चे उमेदवार दौलत दरोडा यांना 14069 राष्ट्रवादी (शप) चे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना 10153 तर निलेश सांबरे यांच्या उमेदवार रंजना उघडा यांना 4705 एवढी मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत.   कोट वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये येणाऱ्या गाव – पाड्यात आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मी स्वतः जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या कामांचाही आम्हाला फायदा झाला आहे. रोहिणी शेलार सभापती : महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर कोट वाडा तालुक्यातील मताधिक्य मिळविण्यासाठी विरोधकांनी आमच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र वाडा तालुक्यातील 49 बूथ मधील सुज्ञ मतदार राजाने आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची पोच पावती आमदार दौलत दरोडा यांना दिली आहे. जयेश शेलार अध्यक्ष : राष्ट्रवादी (अजितदादा) वाडा तालुका ००००

पडद्याआडून काम करणाऱ्या समन्वयक पटवर्धन यांच्यावर श्रेष्ठी खूश

 कोकणात महायुतीला यश मिळण्यात महत्त्वाची भूमिका पटवर्धन यांनी फडणवीस यांना दिल्या मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा   योगेश चांदेकर पालघरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि महायुतीला कोकणात विजयी करण्याच्या त्यांच्या या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेऊन त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. दरम्यान, पटवर्धन यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेऊन महायुतीच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुख्यमंत्री होण्यासाठीही सदिच्छा दिल्या. महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत यांच्यावर चव्हाण यांनी मोठी जबाबदारी सोपवली होती. पटवर्धन हे चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आहेत. राज्यातील महायुतीच्या यशाचे शिल्पकार जसे फडणवीस आहेत तसेच कोकणातील महायुतीच्या यशामागे पटवर्धन यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. महायुती एकसंघ ठेवण्याची जबाबदारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी पटवर्धन यांच्याकडे होती. रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण या चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यामागे समन्वयक म्हणून पटवर्धन यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही. महायुतीत कोणत्याही प्रकारचा बेबनाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पटवर्धन यांनी काम केले. युती अभेद्य ठेवणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवणे आणि चव्हाण यांच्याशी त्यांचा वारंवार समन्वय घडवून आणणे, त्याचबरोबर कोकणातील सर्व जिल्ह्यात महायुतीला मतदान होण्याच्या दृष्टीने संपूर्ण व्यूहरचना पटवर्धन यांनी केली. त्यासाठी वारंवार त्यांनी फडणवीस आणि चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले. संयम आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम अतिशय संयमी पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली. कुठेही वाद निर्माण होणार नाही किंवा गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्याचबरोबर महायुतीतील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही अडीअडचणी असतील, तर त्यावर चव्हाण यांच्याशी संपर्क ठेवून तोडगा काढण्याचे काम त्यांनी जागच्या जागी केले. त्याचबरोबर महायुतीला मदत करू शकणाऱ्या आणि पडद्याआड राहू इच्छिणाऱ्यांशी त्यांनी संपर्क ठेवला. पालकमंत्री चव्हाण यांच्यांशी चर्चा घडवून आणली. त्यातून महायुतीला अनेक दृश्य अदृश्य हातांची मदत झाली. त्याचा परिणाम कोकणामध्ये महायुतीला प्रचंड यश मि‍ळण्यात झाला. श्रेयवाद टा‍ळून समन्वय चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप कोकणात काम करीत असून त्यात पटवर्धन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची ही भूमिका अशीच राहणार आहे. अनेक नेते केलेल्या व न केलेल्या कामाचे श्रेय घेत असतात. फोटो काढून मिरवत असतात; परंतु याला अनिकेत पटवर्धन हे अपवाद आहेत. त्यांनी राज्याच्या तसेच केंद्राच्या नेतृत्वाशी आपले संबंध कायम ठेवले आहेत; किंबहुना ते वृद्धिंगत केले आहेत. नेत्यांशी चांगल्या समन्वयातून नेत्यांचा त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. पक्षहितापुढे सारे गौण राज्यातील अनेक नेत्यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध ठेवून त्यातून भाजपचे अधिकाधिक भले कसे होईल यासाठी अनिकेत प्रयत्न करत असतात फडणवीस आणि चव्हाण यांनी अनिकेत यांच्यासारखा एक चांगला पडद्याआड राहून काम करणारा संयमी कार्यकर्ता पक्षाला दिला. शांतपणे आणि संयमीपणे काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अनिकेत यांच्याकडे पाहिले जात असून त्यांचा पक्षाला यापुढे चांगला उपयोग होईल, असा विश्वास महायुतीच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यावर अनिकेत यांची अढळ निष्ठा असून कोणत्याही लाभासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग न करता पक्षहीत एक हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या पटवर्धन यांचे फडणवीस आणि चव्हाण यांनाही कौतुक आहे. पटवर्धन पडद्यामागून जरी काम करीत असले, तरी आपण पक्ष नेत्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या व्यूहनीतीनुसार काम करतो, याची त्यांना जाणीव आहे. आपण काय काय काम केले आणि त्याचा काय काय परिणाम झाला याचा अहवाल ते सातत्याने आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना देत असतात. त्यातून त्यांची कामावरची निष्ठा दिसते. 0000

डोंबिवलीत मतदानासाठी उभारलेल्या मंडपांचा वाहतुकीला अडथळा

डोंबिवली : डोंबिवली-कल्याणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या परिसरात पक्षीय कार्यकर्त्यांनी मतदारांना माहिती देण्यासाठी बूथ उभारले होते. या बूथच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. मतदान होऊन सहा दिवस उलटले तरी पक्षीय कार्यकर्त्यांनी हे मंडप न काढल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा येत आहे. या मंडपांच्या ठिकाणी आता दुचाकी, रिक्षा चालक निवारा म्हणून वाहने उभी करत आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर हे मंडप आहेत. त्यामुळे वाहन चालकांना या मंडपांचा अडथळा येत आहे. या मंडपांचे आधार खांब रस्त्यावर असल्याने अवजड वाहन या भागातून जात असेल तर त्याठिकाणी वाहन कोंडी होते. डोंबिवलीत अरूंद अशा महात्मा फुले रस्त्यावर, पालिका ह प्रभागाच्या कार्यालय परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पक्षीय कार्यालयांचे मंडप उभे आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमध्ये अनेक ठिकाणी आहे. हे मंडप काढून नेण्याची जबाबदारी पक्षीय कार्यकर्त्यांची आहे. परंतु, मतदान संपल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले आणि मंडप आहे त्याठिकाणीच राहिले असल्याची चर्चा आहे. काही मंडप हे रिक्षा वाहनतळांच्या बाजुला आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना वाहनतळावर रिक्षा उभ्या करताना या मंडपांचा अडथळा येत आहे. पक्षीय कार्यकर्त्यांनी हे मंडप उभारले आहेत. त्यामुळे पालिका कर्मचारी या मंडपांवर थेट कारवाई करताना दिसत नाहीत. थेट कारवाई केली तर अनावश्यक वाद उद्वभवेल अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटते. काही ठिकाणचे मंडप मोठे आहेत. त्याठिकाणी वाहनांना उन लागू नये म्हणून मोटारी उभ्या करून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक, रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने रस्ते अडवून उभ्या असणाऱ्या मंडपांवर कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिक, वाहन चालकांकडून केली जात आहे. 00000

डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल्वे मार्गातून प्रवास

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी जिन्यावरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी आणि मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गातून प्रवास करत आहेत. दररोज…

 उल्हासनगर मतदारसंघालाही हवे मंत्रीपद

 आजपर्यंत मंत्रिपदापासून शहर वंचित   उल्हासनगर :उल्हासनगर मतदारसंघाला एकदाही मंत्रीपद मिळाले नसल्याने, कलानी गड उध्वस्त करणाऱ्या आमदार कुमार आयलानी यांना सिंधी समाजाचे नेतृत्व म्हणून मंत्री पद देण्याची मागणी सिंधी समाज व सामाजिक संघटनेकडून होत आहे. आयलानी यांनी प्रथम पप्पू कलानी, त्यानंतर ज्योती कलानी व आता ओमी कलानी यांना पराभूत केले. उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी बदलून टाकल्याचे बोलले जाते. सन-२००९ साली आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला. पप्पू कलानी सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले होते. सन-२०१४ साली ज्योती कलानी यांच्याकडून आयलानी यांचा मोदी लाटेत पराभव झाला. मात्र सन-२०१९ साली आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा थोड्या फरक्याने पराभूत केले. तर आता ओमी कलानी यांना पराभवाची धूळ चारली. कुमार आयलानी सलग दुसऱ्यांदा आमदार पदी निवडून आले. सिंधी नेतृत्व व कलानी गड उध्वस्थ केला म्हणून कुमार आयलानी यांचा मंत्री पदासाठी विचार होण्याची मागणी सिंधी कॉन्सिल व समर्थकांना वरिष्ठ नेत्याकडे केली. मतदारसंघ सुरवातीला जनसंघ, भाजपच गड राहिला असून त्यानंतर पप्पू कलानी यांच्या कुटुंबाकडे २५ वर्ष राहिला आहे. भाजपचे कुमार आयलानी सलग दुसऱ्यादा व त्यापूर्वी एकवेळा असे तीन वेळा आमदार पदी निवडून आले. राज्यात सिंधी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून तो उल्हासनगरकडे सिंधी नेतृत्व म्हणून बघतो. भाजपचा मतदार म्हणून सिंधी समाजाकडे बघितले जाते. आयलानी यांना मंत्रिपद दिल्यास, तो समाज भाजपकडे झुकणार असल्याचे आयलानी यांच्या समर्थकाचे म्हणणे आहे. आयलानी यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सिंधी सामाजिक संघटना भाजप नेतृत्वाकडे लेखी मागणी करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 000

सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार शिंदे कुटुंबीयांच्या ‘राजकारणा’मुळे पक्षावर गंडांतर

सोलापूर : एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव…

दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी

कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे पालघर  : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून…

 उल्हासनगरात कलानींना नाकारले, आयलानींवरच विश्वास;

 कुमार आयलानी विक्रमी मतांनी विजयी   उल्हासनगरः अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे. आयलानी ३० हजार ७५४ मतांनी विजयी झाले आहेत. आयलानी यांना ८२ हजार २३१ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ओमी कलानी यांना ५१ हजार ४७७ मते मिळाली आहेत. यंदा कलानी पिता पुत्रांच्या आक्रमक प्रचारालाही उल्हासनगरच्या मतदारांनी नाकारले. ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्याने कुमार आयलानी यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दशकात उल्हासनगर विधानसभेत आलटून पालटून आमदार निवडून येत होते. मात्र यंदा आयलानी यांनी या परंपरेलाही छेद दिला आहे. उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत यंदा आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर कलानी कुटुंबियांचे कडवे आव्हान होते. कुमार आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने त्यांची गच्छंतीच्या चर्चा रंगल्या होत्या. उल्हासनगर शहरात विशेष कामगिरी दाखवू न शकल्याने आयलानी यांच्यावर टीकाही होत होती. यंदा पहिल्यांदा पप्पू कलानी आणि त्यांचा पुत्र ओमी कलानी प्रचारात सक्रीय होते. त्यांनी आक्रमकपणे प्रचारही केला होता. मात्र कलानी पिता पुत्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शेवटच्या टप्प्यात कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांनी एका कार्यक्रमात केलेले भावनीक भाषण यामुळे कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा चर्चेत आली. उल्हासनगर विधानसभेचा भाग असलेल्या वरप, म्हारळ, कांबा या मराठी पट्ट्यात कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपेक्षा आयलानी बरे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत होती. या भागात अखेरच्या टप्प्यात मतदानही चांगले झाले. त्यामुळे कुमार आयलानी यांचा मार्ग मोकळ्या झाल्याचे बोलले जाते. पहिल्या फेऱीपासून कुमार आयलानी आघाडीवर होते. अखेर ३० हजार ७५४ मतांनी कुमार आयलानी यांनी कलानी यांना पराभवाची धुळ चारली. विक्रमी विजय गेल्या काही निवडणुकांमध्ये अवघ्या काही मतांनी उमेदवार विजयी होत होते. २००४ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांचा २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २००९ निवडणुकीत ७ हजार मतांनी आयलानी विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ निवडणुकीत १ हजार ८६३ मतांनी ज्योती कलानी जिंकल्या होत्या. तर २०१९ निवडणुकीत २००४ मतांनी आयलानी जिंकले होते. त्यानंतर आता तब्बल ३० हजार ७५४ मतांनी आयलानी जिंकले आहेत. त्यामुळे हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.