Category: पालघर

palghar news

महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर मालवाहू वाहनाला आग

वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांगा पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे (महालक्ष्मी ) येथील उड्डाण पुलावर एका वाहनाला आग लागली लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वा. गुजरात वरून मुंबई दिशेला नवीन चारचाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये आंतरिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. गुजरात कडून मुंबई दिशेला नवीन चार चाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे. वाहनात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असून आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन बाजूला करून स्वतःचा जीव वाचवला आहे. अगदी काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून अग्निशामक दल पोहोचण्यासाठी वेळ झाल्यामुळे ट्रक आणि आतील नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरील महामार्ग पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ढिसाळ नियोजन अभावी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या जवळपास पाच किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्याही मार्गावर वाहने विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे सहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी असल्याने संध्याकाळच्या वेळी जाणाऱ्या कामगारांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

आमदार कोण? गावागावांत पैजांना ऊत

रोकड, वाहने, जमिनीही डावावर   सांगली : मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावरून चर्चा व पैजांना ऊत आला आहे. रोकड, वाहने, जमिनीही डावावर लावण्याचा खेळ रंगला. लोकसभेप्रमाणे विधानसभा निकालाबाबत असलेली उत्सुकता या पैजांमधून दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारच्या पैजा लागल्या होत्या. जेवणावळ्यांपासून पैशापर्यंत अन् वाहनापासून जमिनीपर्यंतच्या पैजा लागल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही अशाच पैजा आता लावल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले आहे. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यातच पैजांमधूनही धक्कादायकरीत्या अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सर्वाधिक पैजा सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत मतदारसंघात लावल्या जात आहेत. निकाल लागताच ठरल्याप्रमाणे पैजांचा हिशेब केला जाणार आहे. तोंडी व लेखी पैजा काही गावांत तोंडी, तर काही ठिकाणी लेखी स्वरूपात पैजा लावण्यात आल्या आहेत. लेखी पैजांवर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. जेवणावळ्यांच्या पैजा सर्वाधिक आहेत. जिथे चुरस, तिथे पैजा जिथे सहजासहजी अंदाज व्यक्त करणे मुश्कील आहे, अशा ठिकाणच्या निकालावर अधिक प्रमाणावर पैजा लावण्यात येत आहेत. सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत या मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात पैजा अधिक दिसताहेत. त्याखालोखाल शिराळा, खानापूर या मतदारसंघात पैजा लावल्या जात आहेत. राजकीय कार्यकर्ते अधिक पैजा लावणाऱ्यांमध्ये राजकीय कार्यकर्ते, नेते यांचा समावेश अधिक आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही पैजा लावल्या गेल्या आहेत. वादातूनही अनेकांनी डाव लावले आहेत.

मतमोजणीसाठी डहाणूत वाहतुकीत बदल

कासा, ता : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी डहाणूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सेंट मेरी हायस्कूल, मसोली येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी…

बोईसरमधील कंपनीच्या गोदामाला भीषण आग;

परिसरावर प्रदूषणकारी धुराची चादर बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला. तर आगीमुळे बोईसर परिसरातील आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धुर पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागला. तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळील बेटेगाव येथील दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघर नगरपरिषद यांच्या एकूण चार बंबानी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. संपूर्ण बोईसर परिसरात काळा धूर पसरल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला.  तीन तासानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उल्हासनगरात पप्पू कलानी व कुमार आयलानी आमने-सामने आल्याने दोन्ही गटात तणाव

  उल्हासनगर दि.20(सुनिल इंगळे ):- भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालया समोर पप्पू कलानी हे समर्थकासह समोर गेल्याने, दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. आयलानी यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन…

वसईकर जनतेने मतदानाला दिली रक्तदानाची जोड

वसई : आज मतदानाच्या दिवशी कै.सौ. सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील श्री साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात बहुसंख्य मतदार यांनी मतदान झाल्यावर रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. निवडणुकीच्या धामधुमीत रक्तदान शिबिर न झाल्याने रक्तसाठा कमी होऊन गरजु रुग्णांना त्यामुळे बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागत होते.मतदानाच्या दिवशी रक्तदान करण्याचा अभिनव संकल्प सर्वामध्ये रुजवावा, या हेतूने लोकशाही संवर्धन करण्यासाठी जसे मतदान आवश्यक आहे तसे रुग्णांच्या संवर्धनासाठी रक्तदान आवश्यक असल्याचे आयोजक मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी छोटू आनंद, उमेश शिखरे, सुशांत धुळप, मूतूजा मिठाईवाला, हरीश बिष्ट, विकास दुबे, अली असगर यांनी विशेष सहकार्य केले.

मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

डोंबिवली : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानाला आता काही तास उरले आहेत. त्यातच डोंबिवली येथे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि शहरप्रमुखपदाची…

डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी मद्याच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे.…

डहाणू मतदारसंघात विनोद निकोले यांच्यासाठी वृंदा करात मैदानात

अनिल ठाणेकर डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू (अज) मतदारसंघातील माकप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी निवडणूक सभांना संबोधित केले. तलासरी…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल-मुरलीधर मोहोळ

    पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे चांगले काम आहे. जनता त्यांच्या सोबत…