मतमोजणीसाठी डहाणूत वाहतुकीत बदल
कासा, ता : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी डहाणूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सेंट मेरी हायस्कूल, मसोली येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी…
palghar news
कासा, ता : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी डहाणूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सेंट मेरी हायस्कूल, मसोली येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी…
परिसरावर प्रदूषणकारी धुराची चादर बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला. तर आगीमुळे बोईसर परिसरातील आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धुर पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागला. तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळील बेटेगाव येथील दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघर नगरपरिषद यांच्या एकूण चार बंबानी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. संपूर्ण बोईसर परिसरात काळा धूर पसरल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला. तीन तासानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
उल्हासनगर दि.20(सुनिल इंगळे ):- भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालया समोर पप्पू कलानी हे समर्थकासह समोर गेल्याने, दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. आयलानी यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन…
वसई : आज मतदानाच्या दिवशी कै.सौ. सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील श्री साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात बहुसंख्य मतदार यांनी मतदान झाल्यावर रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. निवडणुकीच्या धामधुमीत रक्तदान शिबिर न झाल्याने रक्तसाठा कमी होऊन गरजु रुग्णांना त्यामुळे बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागत होते.मतदानाच्या दिवशी रक्तदान करण्याचा अभिनव संकल्प सर्वामध्ये रुजवावा, या हेतूने लोकशाही संवर्धन करण्यासाठी जसे मतदान आवश्यक आहे तसे रुग्णांच्या संवर्धनासाठी रक्तदान आवश्यक असल्याचे आयोजक मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी छोटू आनंद, उमेश शिखरे, सुशांत धुळप, मूतूजा मिठाईवाला, हरीश बिष्ट, विकास दुबे, अली असगर यांनी विशेष सहकार्य केले.
डोंबिवली : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानाला आता काही तास उरले आहेत. त्यातच डोंबिवली येथे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि शहरप्रमुखपदाची…
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी मद्याच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे.…
अनिल ठाणेकर डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू (अज) मतदारसंघातील माकप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी निवडणूक सभांना संबोधित केले. तलासरी…
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे चांगले काम आहे. जनता त्यांच्या सोबत…
प्रकाश निकम यांचा दावा योगेश चांदेकर पालघरः विक्रमगड–विधानसभा मतदारसंघात विरोधकांनी पैशाचा वारेमाप वापर सुरू केला आहे. मी काही कोणत्या ठेकेदाराच्या किंवा नेत्याच्या पाठिंब्यावर उभा नाही. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाचा…
डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सवाल योगेश चांदेकर पालघरः राज्यात विधानसभेच्या ४० मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीने घर न घर पिंजून काढले आहे, अशी माहिती देताना महायुतीच्या सर्व संकल्पना काँग्रेसने चोरल्या असल्याचा…