Category: रायगड

raigad news and updates

तीन वर्षांनंतर लालपरीचे होणार आगमन

ग्रामस्थांमध्ये जल्लोष   सोयगाव : वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी रविवारी (दि २०) बनोटी (ता.सोयगांव) येथील बसस्थानकाची पहाणी करून हिरवा कंदिल दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेली लालपरि गावात येणार असल्याने ग्रामस्थांत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तीन वर्षापूर्वी बनोटी येथील हिवरा नदिला आलेल्या महापुरात नदि वरील पुलासह एस. टी बसस्थानक वाहुन गेल्याने बस दोन किलोमीटर गावाबाहेरुन जात असल्याने महिला, विद्यार्थी, वृद्धांचे अतोनात हाल होत असल्याने बनोटी ग्रामपंचायतीने शासकीय अनुदानाची वाट न बघता बसस्थानकाचे काम हाती घेऊन पूर्ण झाल्याने सोयगाव, सिल्लोड, पाचोरा आगारास ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन बसेस पुर्वरत चालु करण्याची मागणी केल्यावर सोयगाव आगाराचे वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी शनिवारी बनोटी बसस्थानकाची पहाणी करीत बसेस पुर्वरत करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत आगार प्रमुख, चालक मनोज चव्हाण, वाहक रवि सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच उदय खैरनार, वामन जाधव, निळकंठ खैरनार, साहेबराव वेहळे, संतोष खैरनार, नामदेव चव्हाण, छोटूराम पाटील, योगेश निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 0000

 अतिवृष्टीच्या पावसात दोन घरे कोसळली

दोन्ही घरातील कुटुंबातील सदस्य जखमी   सोयगाव : बनोटी मंडळात झालेल्या शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टी मुळे  दोन घरे कोसळून त्यामध्ये दोन कुटुंबातील पाच जण दबल्याची घटना  सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे शनिवारी रात्रीला एक वाजता घडली ह्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन दोन्ही कुटुंबातील सदस्य  कीरकोळ जखमी झाले आहेत…महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे जखमीना उपचार करून रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी सोडण्यात आले आहे कीन्हीसह परीसरात गेल्या पाच  दीवसापासुन परतीच्या पावसाने थैमान घातले असुन ढगफुटी दुश्य मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाल्यांना मोठा पूर येत आहे शुक्रवार व शनिवार रात्री आठ वाजेनंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये कींन्ही येथील गौतम शंकर शेळके हे पत्नी ,आई,दोन मुलांसह घरात झोपलेले होते तसेच कैलास ओंकार लोखंडे हे देखील पत्नी व दोन मुलांसह झोपलेले असताना पावसामुळे मध्यरात्रीला जवळजवळ असलेले दोघे घराच्या भिंती पडल्याने घरे कोसळली त्यामध्ये दोघे कुटुंबातील पाच सदस्य दबले मोठा आवाज आल्याने आजुबाजुचे रहीवाशी सरपंच छबाबाई फलके,कीशोर फलके,पप्पु देशमुख, वाल्मीक शेळके,वामन शेळके,शेनपडु थोरात आदींनी त्या कुटुंबातील सदस्याना बाहेर काढले व तातडीने उपचार साठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यामध्ये प्रशिक गौतम शेळके(वय १३) ,पलक शेळके (वय १७) आणि छबाबाई शंकर शेळके(वय ६८) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून हे तिघेही झोपलेल्या अवस्थेत दबले यामध्ये ते जखमी झाले आहे त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी आणले आहे दरम्यान एकाच गावात दोन घरे पडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे पुर्ण नुकसान झाले आहे हे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु सुदैवाने ह्या घटनेत कुढल्याही जीवीतहानी झाली नाही तरी प्रशासनने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 00000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्राची पहिली सरमिसळ संपन्न

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ६८१ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे , आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ६ हजार २०० बॅलेट युनिट, ३ हजार ४०५ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ६८१ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे जावळे यांनी सांगितले. 0000

 तीन वर्षांनंतर लालपरीचे होणार आगमन

ग्रामस्थांमध्ये जल्लोष   सोयगाव : वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी रविवारी (दि २०) बनोटी (ता.सोयगांव) येथील बसस्थानकाची पहाणी करून हिरवा कंदिल दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेली लालपरि गावात येणार असल्याने ग्रामस्थांत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तीन वर्षापूर्वी बनोटी येथील हिवरा नदिला आलेल्या महापुरात नदि वरील पुलासह एस. टी बसस्थानक वाहुन गेल्याने बस दोन किलोमीटर गावाबाहेरुन जात असल्याने महिला, विद्यार्थी, वृद्धांचे अतोनात हाल होत असल्याने बनोटी ग्रामपंचायतीने शासकीय अनुदानाची वाट न बघता बसस्थानकाचे काम हाती घेऊन पूर्ण झाल्याने सोयगाव, सिल्लोड, पाचोरा आगारास ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन बसेस पुर्वरत चालु करण्याची मागणी केल्यावर सोयगाव आगाराचे वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी शनिवारी बनोटी बसस्थानकाची पहाणी करीत बसेस पुर्वरत करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत आगार प्रमुख, चालक मनोज चव्हाण, वाहक रवि सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच उदय खैरनार, वामन जाधव, निळकंठ खैरनार, साहेबराव वेहळे, संतोष खैरनार, नामदेव चव्हाण, छोटूराम पाटील, योगेश निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 0000

 अतिवृष्टीच्या पावसात दोन घरे कोसळली

दोन्ही घरातील कुटुंबातील सदस्य जखमी   सोयगाव : बनोटी मंडळात झालेल्या शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टी मुळे  दोन घरे कोसळून त्यामध्ये दोन कुटुंबातील पाच जण दबल्याची घटना  सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे शनिवारी रात्रीला एक वाजता घडली ह्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन दोन्ही कुटुंबातील सदस्य  कीरकोळ जखमी झाले आहेत…महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे जखमीना उपचार करून रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी सोडण्यात आले आहे कीन्हीसह परीसरात गेल्या पाच  दीवसापासुन परतीच्या पावसाने थैमान घातले असुन ढगफुटी दुश्य मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाल्यांना मोठा पूर येत आहे शुक्रवार व शनिवार रात्री आठ वाजेनंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये कींन्ही येथील गौतम शंकर शेळके हे पत्नी ,आई,दोन मुलांसह घरात झोपलेले होते तसेच कैलास ओंकार लोखंडे हे देखील पत्नी व दोन मुलांसह झोपलेले असताना पावसामुळे मध्यरात्रीला जवळजवळ असलेले दोघे घराच्या भिंती पडल्याने घरे कोसळली त्यामध्ये दोघे कुटुंबातील पाच सदस्य दबले मोठा आवाज आल्याने आजुबाजुचे रहीवाशी सरपंच छबाबाई फलके,कीशोर फलके,पप्पु देशमुख, वाल्मीक शेळके,वामन शेळके,शेनपडु थोरात आदींनी त्या कुटुंबातील सदस्याना बाहेर काढले व तातडीने उपचार साठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यामध्ये प्रशिक गौतम शेळके(वय १३) ,पलक शेळके (वय १७) आणि छबाबाई शंकर शेळके(वय ६८) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून हे तिघेही झोपलेल्या अवस्थेत दबले यामध्ये ते जखमी झाले आहे त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी आणले आहे दरम्यान एकाच गावात दोन घरे पडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे पुर्ण नुकसान झाले आहे हे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु सुदैवाने ह्या घटनेत कुढल्याही जीवीतहानी झाली नाही तरी प्रशासनने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 किनाऱ्यावरील मच्छिमार बोटींवर नियंत्रणासाठी मनाई आदेश – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.* भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने, रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व बोर्टीनी अधिसूचित केलेल्या ठिकाणीच सदर बोर्टीचे अवागमन करावे. सदर बोटींनी अधिसूचित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपल्या बोटींचे अवागमन केल्यास, सदर बोट जप्त करुन, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये सागरी सुरक्षा पोलीस दल यांनी आपली गस्त तीनपटीने वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. मत्स्यविभाग रायगड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दल यांनी विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील समुद्रातील आपली गस्त वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. जिल्ह्यातील समुद्र किनारा असणाऱ्या गावांच्या संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने समुद्र किनारा विभागातील संबंधित तलाठी, बिट मार्शल, ग्रामसेवकआणि कोतवाल यांची सनियंत्रण समिती गठीत करुन, समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कोणताही गैरप्रकारहोणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. 0000

ढगफुटीच्या पावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळला

सोयगाव :भरपावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजता घडली दरम्यान रात्रीच्यावेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही सोयगाव-बनोटी रस्त्यावर असलेल्या निमखेडी फाट्यावर बस स्थानकाचा भरपावसात स्लॅब कोसळून बस स्थानक धोकादायक झाले आहे त्यामुळे शनिवारी पहाटेपासून प्रवाशांची गैरसोय झाली होती दरम्यान रात्रीची वेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नसल्याचे प्रशासन कडून स्पष्ट करण्यात आले आहे सोयगाव परिसरात शुक्रवारी रात्री अतिवृष्टी चा मुसळधार पाऊस झाला दरम्यान या वादळीपावसाने निमखेडी बस स्थानकचा स्लॅब कोसळला आहे शनिवारी महसूल कडून घटनेचा पंचनामा करून संबंधित विभागाला अहवाल पाठविण्यात आला आहे.. 00000

 कापुस मोजणी करतांना झाड कोसळले…

शेतकरीसह पाच मजुर कीरकोळ जखमी… वरठाण शिवारातील घटना   सोयगाव;-. कापुस वेचणी करुन एका निबांच्या झाडाखाली कापसाची मोजणी करीत असतांना अचानकपणे झाड कोसळुन त्या खाली शेतमालक व पाच मजुर दबल्याची घटना वरठाण शिवारात शुक्रवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नसुन पाचही जणांना  मार लागलेला आहे. वरठाण येथील अशोक धनसिंग सोळंके गट.न १०७  मध्ये शुक्रवारी महीला व पुरुष जवळपास वीस मजुर कीलो प्रमाणे कापूस वेचणी चे काम करीत होते दीवसभर कापुस वेचणी करुन झाल्यावर सायंकाळी पाच सुमारास अचानक वादळीवारा सुटला यावेळी कापुस पावसात ओला होऊ नये यासाठी सर्व गोण्यातील कापूस निबांच्या झाडाखाली आणुन मोजणीचे काम करीत असताना आलेल्या वादळामुळे अचानकपणे निबांचे झाड कोसळले कसे बसे मजुर त्या ठीकाणाहुन पळाले पण यावेळी शेतकरी अशोक सोळंके,मजुर, दीलीप खंडाळे,अजय सुर्यवंशी, शाहरुख तडवी,अनिसा शेख,जया सोनवणे असे झाडाच्या फाद्यांत दबले क्षणाचा विलंभ न करता काही मजुरांनी त्यांना बाहेर काढले जर वेळीच मजुर झाडाखालुन पळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती म्हणून देव तारी त्याला कोण मारी असे उद्गागार यावेळी मजुरांचे निघत होते दरम्यान ह्या घटनेत शेतकरीसह पाचही मजुरांना  मार लागलेला आहे.

एस्टीपीकडून रस्ते पूर्ववत करण्यास सुरुवात

माथेरान : दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण प्रकल्प( एस्टीपी ) कामे पूर्ण करण्यासाठी कामाने वेग घेतला असून ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठेत रस्त्यांची खोदाई पूर्ण करण्यात आली आहे. त्या भागातील रस्ते बुजवून पूर्ववत करण्यात येत आहेत. चार महिने पावसाळ्यात ही कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या नंतर या कामाना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.खोदाई केल्यानंतर सर्व मातीचा उपयोग होण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठविण्यात येत आहे. लवकरच या रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येणार असून हे रस्ते पूर्ववत केले जाणार असल्याचे संबंधीत ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात गावांमध्ये स्वच्छता दिसून येणार असल्याने अनेक ठिकाणी शौचालयाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची दुर्गंधी यायची.काही हॉटेल धारकांनी स्वतःच्या हॉटेलमध्ये एस्टीपी प्लांट केला नसल्याने त्या हॉटेलचे सांडपाणी मुख्य रस्त्यावरील चेंबर मध्ये कचरा गोळा झाल्यास सर्व घाण परिसरात पसरल्याने दुर्गंधीचे प्रमाण दिसून यायचे. एस्टीपी प्लांट मुळे गावात दुर्गंधी हद्दपार होणार असून स्वच्छता राखण्यास मदत होईल असे सुज्ञ,अभ्यासू  नागरिक बोलत आहेत.

माथेरानमधील सर्वपक्षीयांनी अनावश्यक मतदारांची नावे वगळणे गरजेचे !

  माथेरान : माथेरान मधील सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रभाग मिळून जेमतेम ३९०० इतकी मतदार संख्या आहे. यातील बहुतांश मतदार हे याठिकाणी वास्तव्यास नसून त्यांचा वास्तव्याचा रेशनकार्ड तसेच स्वतःच्या घराचा पुरावा…