Category: रायगड

raigad news and updates

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा

पनवेल : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी…

निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक- किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणुकीत विविध माध्यमांद्वारे प्रदर्शित किंवा प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, प्रतिनिधी…

थकबाकीदारांकडून विद्युत सहायक महिलेला धक्काबुक्की

  भांडुप: वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर काढून घेणाऱ्या महिला विद्युत सहायकास धक्काबुक्की व दमदाटी करण्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महावितरणच्या पनवेल शहर विभागांतर्गत पारगाव परिसरात ही घटना…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, २६ लाखाचा मुद्देमाल जप्त – रविकिरण कोले

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत एकूण १०७ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ८८ आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये ३७५२०  लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये २६ लाख ६१ हजार २१२ असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी दिली. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधीलकलम ३ अंतर्गत एकूण ६१ प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून पैकी १४ कलम-९३ अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आलेले आहेत. तसेच संशयित आरोपी ज्ञातपत्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम १४९) नुसारसंबंधीताना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण ४७० कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची ७ पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय  मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.  तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड जिल्ह्यात शेडूंग, ता.पनवेल, व चांदवे, ता.पोलादपूर येथे २ तपासणी नाके उभारण्यात आलेले असून तेथे संशयितवाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पारपाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्रीक्र. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक ०२१४१- २२८००१ वर संपर्क साधण्यात यावा.

परळ स्थानकाजवळून सुटणाऱ्या बेस्ट बस बंद

धारावी : मध्य रेल्वेवरील परळ (पूर्व) स्थानकाबाहेरून बेस्टतर्फे १६३ व १७७ क्रमांकाच्या बस सोडल्या जात होत्या. अचानक बेस्ट प्रशासनाने या बस बंद केल्‍याने प्रवासी नाराजी व्यक्‍त करीत आहेत. या मार्गावर…

कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर   उल्हासनगर – महानगरपालिकेने उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कंबर कसली असून त्याकरिता शहरातील 4 नामचिन कॉलेज व डॉक्टरांवर जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुक्त विकास ढाकणे, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी स्थायी समिती सभागृहात विधानसभा निवडणूकित जनजागृतीची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात चांदीबाई कॉलेज, आरकेटी कॉलेज,एसएसटी कॉलेज आणि वेदांत कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह सहायक आयुक्त विशाल कदम, मयुरी कदम,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग अधिकारी, समाजसेविका उपस्थित होते. या बैठकीत विकास ढाकणे, किशोर गवस यांनी सर्व सदस्यांनी निवडणुक जनजागृती निमित्ताने विविध लक्षवेधक नियोजन करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त परिणामकारक उपक्रम राबवून महापालिका क्षेत्रातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले. यासोबतच महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याकडूनही मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली असून शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. 0000

निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि ज्योती मीना यांची माध्यम कक्षास भेट

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि ज्योती मीना यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.* जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या कक्षाचा सहभाग आहे या बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली. राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिली. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 0000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला पेण विधानसभेचा आढावा

अशोक गायकवाड रायगड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पेण विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पेण येथील स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी पेण विधानसभा मतदार संघात निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, उत्तम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवडणूकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जावळे यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी जावळे व पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला. 0000

निवडणुक निर्भय, भयमुक्त, पारदर्शक पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे-राजेश कुमार

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील २०१५ च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मंगळवारी,(दि.२२ ऑक्टोंबर २०२४) रोजी रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि. २२) रोजी या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.निवडणूक खर्च निरीक्षक ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.

खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास तक्रार करा – महेश देवकाते

अशोक गायकवाड रायगड: खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन, पेण जि. रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यास्तव खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांकडून जादा भाडे – आकारण्यात येणाच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २१.१०.२०२४ ते ९.११.२०२४ या कालावधीत खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जादा भाडेदर आकारलेबाबतची तक्रार नोंदविण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्पलाईन क्रमांक:- २५२२३४-०२१४३ व कार्यालय ई-मेल आयडी:- dyrto.06-mh@gov.in येथे संपर्क साधावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी, बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्यप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ५० प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. पेण कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी केले आहे.