Category: रायगड

raigad news and updates

विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला निर्देश द्यावेत – हाजी शाहनवाझ खान

राज भंडारी   रायगड : राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळणं कठीण झालं आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता मुख्यामंत्र्यांनी मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे आवाहन प्रदेश एमआयएम विद्यार्थी आघाडी महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे. मुंबई विद्यापिठाचा देशातच नाही तर जगभरात नावलौकीक आहे. या विद्यापिठातंर्गत येणाऱ्या वसतीगृहातील समस्यांबाबत, असुविधांबाबत विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १२ ऑगस्ट) उपोषण आंदोलन पुकारले. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ याविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त करत विद्यार्थ्यानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ या गैरसोयींना विद्यार्थी त्रासले आहेत. याशिवाय वसतीगृहाच्या भोजनगृहातील अस्वच्छता, मध्यवर्ती वाचनालयाच्या वेळा, वायफाय सुविधा, विद्यापिठातील कलिना संकुलातील पाणी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांनी या समस्या आणि सुविधांबाबत वारंवार लेखी पाठपुरावा करुनही विद्यार्थ्याची दखल घेतली जात नाही. चर्चेसाठी बोलावतात, आश्वासने देतात, अंमलबजावणी होत नाही. हा घडत असलेला प्रकार योग्य नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला व गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण तातडीने मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे निवेदन त्यांनी केले आहे. 00000

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेचा लाभ घ्या – किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक…

पाड्यांवर महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन

किन्हवली : आदिवासी दुर्गम भागात गुंज सामाजिक संस्थेचे समन्वयक दत्तात्रय एस. पाटील यांच्या माध्यमातून विविधपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. शहापूर तालुक्यातील अनेक शाळा, आदिवासी पाड्यांवर गुंज संस्थेने ग्रामविकास, महिलांचे आरोग्य,…

घरोघरी तिरंगा अभियान देशप्रेमाचा जागर- किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबविले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भालेराव, अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी उत्तम धाईगडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. शाममराव कदम, देशमुख, अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात यावर्षीही अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठया उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सातत्याने त्यागाची आणि बालिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. तिरंगा पदयात्रेस जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी जावळे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

आदिवासी युवकाला मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र*

अशोक गायकवाड   अलिबाग : युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग वाघोली येथील चैतन्य…

घरोघरी तिरंगा अभियान देशप्रेमाचा जागर–जिल्हाधिकारी किशन जावळे*

अशोक गायकवाड   रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर…

गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलमुळे सुलभ आणि पारदर्शी व्यवहार-किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलचा उपयोग करावा. या माध्यमातून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील…

गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी अर्ज करा – डॉ. सचिन देशपांडे*

रायगड : पशुसंवर्धन विभागांतर्गत सन २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुधारित गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी या योजनेतून कर्जत, पनवेल, खालापूर व रोहा या चार तालुक्यातून पात्र गोशाळांची…

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ साठी अर्ज करा -किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून, या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे…

माथेरान मधील रस्त्यांची चाळण !

व्यापारी ,पर्यटक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त   माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक पावसाने वाहून गेल्याने रस्त्यांची गटारे झाली आहेत. धुळविरहीत रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणी नुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिल्याने इथे धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झाले आहे. तर नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते नकोशे वाटतात.एकीकडे याच क्ले ब्लॉकच्या रस्त्याचा वापर सुध्दा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे. काही ठिकाणी जुन्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे प्रवास करताना पर्यटकांना,नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ब्लॉक लावण्यास सध्यातरी कोर्टाने बंदी घातली आहे त्यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास न्यावी जेणेकरून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे. ——————————————————- हुतात्मा भाई कोतवाल नावाने नगरपरिषदेने शॉपिंग मार्केट बनविले स्टेशन परिसरात गजबजलेल्या परिसरात हे मार्केट असून नगरपरिषदेने प्रथम ह्याच रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता.  पण आज त्या रोडची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे ह्या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते. पण नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीही हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जात नाही ह्या रस्त्याला ज्या हुतात्म्यांचे नाव दिले आहे त्यांच्या नावाची तरी कदर करून हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी. प्रदिप घावरे— माजी नगरसेवक 00000