Category: रायगड

raigad news and updates

कोकणवासीय समाज संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

माथेरान : माथेरान मध्ये दरवर्षी शेकडो झाडे अतिवृष्टीमुळे उन्मळून पडत असतात याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसून येत आहे. याकामी वृक्षारोपण ही काळाची गरज लक्षात घेऊन माथेरान मधील विविध…

विकत घेण्याची क्षमता माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये अधिक – श्याम मानव

 नागपूर : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी  प्रत्युत्तर देत श्याम मानव हे देखील काही…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी केले अभिवादन

रायगड : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयात केले अभिवादन भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवार,(दि.२३ जुलै) रोजी कर्जत तहसील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद प्रल्हाद कोटंबे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार आशा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अव्वल कारकून , महसूल सहायक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 0000

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करा-सुनील जाधव

 अशोक गायकवाड     रायगड : सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.२६ ऑगस्ट २०२४ पूर्वी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे ४११००१ यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनील जाधव यांनी केले आहे. या योजनेचे अटी व शती :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील, उत्पन्न मर्यादा रु.६ लक्ष राहील (फॉर्म नं. १६ व तहसिलदार/नायब तहसिलदार सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. शैक्षणिक अर्हता :- महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. व इयत्ता १२ वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्याथ्यांने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण व पदवी अभ्यासक्रमासाठी डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील. लाभाचे स्वरूप :- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक,शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची, इत्यादी शुल्क मंजुरी. योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु.५ हजार व शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु.५ हजार अशी एकूण रु.१० हजार प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल. अर्ज मिळण्याचे व सादर करण्याचे ठिकाण : विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.maharashtra.gov.in/ ताज्या घडामोडी आणि सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 00000

जन सुरक्षा विधेयकास जागृत कष्टकरी संघटनेचा विरोध – नॅन्सी गायकवाड*

अशोक गायकवाड     रायगड : महाराष्ट्र शासनाने पावसाळी आधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक आणले असून या विधेयकाला महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संघटनांकडून विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. या धर्तीवरच कर्जत तालुक्यातील…

अंबरनाथकरांची पाणी चिंता दूर

अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली…

२२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन-पुनिता गुरव

अशोक गायकवाड       रायगड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ ते दि.२८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)…

५९ शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     अलिबाग :रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलै ते २० जुलै दरम्यान…

अंबरनाथकरांची पाणी चिंता दूर

अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली…

सेंट झेव्हियर शाळेचा मनमानी कारभार :

पालक मुग गिळून गप्प ; जिल्हाधिकार्यांचा आदेश पायदळी तुडवून अतिवृष्टीत शाळा सुरू !     माथेरान : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार दि.२१ जुलै रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज…