Category: रायगड

raigad news and updates

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अंदाजे १९ कोटी तडजोड रक्कम वसूल – न्या. अमोल शिंदे

अशोक गायकवाड     अलिबाग : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व…

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक यशस्वी करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : महसूल विभागामार्फत१ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. शासननिर्णयानुसार सर्व तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. सप्ताहाच्या पूर्वतयारीची आढावाबैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रीकांत गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ०१ ते ०७ ऑगस्ट  या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 0000

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम – किशन जावळे

रायगड : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने ०१ जुलै २०२४ रोजीच्या…

२९ जुलैनंतर पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही – सोमनाथ घार्गे

रायगड : २९ जुलै २०२४ रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलीस भरती…

 कळंब पोश्री नदीपुलाला भगदाडामुळे वाहतुकीस धोकादायक

ताबडतोब उपाययोजना करा – विनोद भोईर     नेरळ : कळंब पोशिर नदीपुलावर मोठे भगदाड पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया विनोद भोईर ( ग्रामस्थ वारे) यांनी दिली आहे. तर कर्जत मुरबाड महामार्गावर असलेल्या पोशीर नदी पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे,त्यात सततच्या पावसाने पुलाला मोठे भगदाड पडून पुलाच्या एक बाजूचा आतील भराव वाहून गेला आहे,पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिली तर अवजड वाहनाच्या भाराने पुलाचा कळंब कडील भाग पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी, अशी प्रतिक्रिया दीपक म्हसे ( ग्रामस्थ खैरपाडा-कळंब) यांनी दिली आहे. कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंब येथील पोश्री नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो ,भगदाड पडलेल्या भागात बेरिकेट लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.मात्र सततधार पावसाने तसेच अवजड वाहनाच्या भारामुळे पुलाचा एकभाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मागील आठवड्या भरापासून सततधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे,त्यातच ठाणे आणी रायगड जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या कर्जत मुरबाड हायवे वरील कळंब येथील पोशीर नदीपुलावर कळंब कडील भागात मातीचा भराव खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे, शनिवारी सायंकाळी एका वाहन धारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असल्याचे दिसले तसेच पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून मोठा भगदाड पडला असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना या बाबत कळवले असता पोलिसांनी खचलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरता स्वरूपात बॅरिकेट्स लावल्या असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, सुमारे ७० ते ८० वर्ष जुनं बांधकाम असलेल्या व दगडी पिलरवर उभारलेल्या पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे मात्र जुनं बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालले आहे ,पुलाच स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत ,वृक्ष- वेळीच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणिक कमकुवत होत आहे,त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून यापुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ,वाहनधारक करत आहे.

कुलगुरू प्रा. डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी भारत सरकारकडून जाहीर

२९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा अशोक गायकवाड     रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.२९ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. ही पदवी विशिष्ट सेवा पदक मिळवलेले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून १९ विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी ,वास्तुशास्त्र ,हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे ३४० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. विद्यापीठ परिवाराकडून संलग्नित महाविद्यालयाकडून तसेच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 00000

उद्या माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर एआयएमआयएम करणार होमहवन

रायगड : गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत नसल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच एआयएमआयएमच्या वतीने देखील आता कठोर निर्णय घेवून प्रशासनाला याचे उत्तर…

२७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ५० हजार प्रकरणे – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात…

माथेरानमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

माथेरान : रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आकार केला असून मात्र मध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत असून कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडताना दिसत…

नागरिकांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा – किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत…