Category: रायगड

raigad news and updates

माथेरान : उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण अन थकवा…

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

माथेरान : पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात रिमझिम जलधारा अंगावर झेलण्यासाठी आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी पर्यटकांनी दुसऱ्या शनिवारी असलेल्या सुट्टीच्या दिवशी माथेरानला पसंती देत इथे गर्दी केल्यामुळे एकप्रकारे याठिकाणी…

जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ माथेरान मधील समस्त महिला वर्गाला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून ह्या महत्वपूर्ण कार्यास येथे सोमवार दि.७ पासून…

जुनी रद्दी विक्रीसाठी इच्छुक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात – सचिन विधाते

अशोक गायकवाड     रायगड : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित काढण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खरेदीदारांकडून दि.१० जुलै ते दि.२२ जुलै २०२४ (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा मागविण्यात येत असून पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सचिन विधाते यांनी केले आहे. मागविण्यात आलेल्या निविदा दि. २३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनेवल, केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल येथे उघडण्यात येतील. निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टिन नंबर व जी.एस.टी. भरल्याबाबत रिटर्न, पॅनकार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रूपये १० हजार या राष्ट्रीय बँकेचा डी.डी. (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल आरटीओ पनवेल (RTO PANVEL) यांचे नावे, दरपत्रक सादर करताना ते प्रति किलो मध्ये सादर करावेत, बंधपत्र रूपये १००/- (ज्यांचे टेंडर मंजूर करण्यात येईल त्याचे आवश्यक नियमाबाबतचे बंधपत्र लागेल), पेपरमील मालक/व्यवस्थापक हे रद्दी विकत घेत असतील तर पेपरमील त्यांच्या मालकीची आहे. याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच पेपरमील मालक व्यवस्थापक यांना आपण रद्दी पुरवठा करताना याबाबतचा संबंधीत पेपरमीलचा दाखला आणणे आवश्यक आहे,. प्राप्त झालेल्या निविदा मान्य करण्याचे वा रद्द करण्याचे सर्व अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी राखून ठेवले आहेत, मागविण्यात आलेल्या निविदा या आधीच्या अटी व शर्तीची पूर्तता करीत नसल्यामुळे रद्द समजण्यात याव्यात. दि.२२ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयास प्राप्त झालेल्या निविदांचाच विचार करण्यात येईल. त्यानंतर उशिराने प्राप्त होणाऱ्या निविदांचा कोणताही विचार केला जाणार नाही. निविदा दि.२३ जुलै २०२४ रोजी रोजी, दुपारी ३.०० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचे कक्षात उपस्थित निविदाधारकां समक्ष उघडण्यात येतील. दरपत्रक निविदा सादर करण्याचा पत्ता :-प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल. केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला, लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल. 00000

 जिल्हा रुग्णालयात “जागतिक लोकसंख्या दिन” साजरा

कुटुंब नियोजनाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे-डॉ.अंबादास देवमाने  अशोक गायकवाड     रायगड :अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने,यांनी सांगितले. कुटुंब नियोजन पद्धतीचा तसेच विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ११ जुलै हा दिवस “जागतिक लोकसंख्या दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीम. रेश्मा संकपाळ, वैद्यकीय पर्यवेक्षक राजेंद्र भिसे, अधिसेविका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिसेविका श्रीम.अनिता भोपी, पी.एच.एन. नंदिनी चव्हाण, परिसेविका श्रीम.उषा वावरे, श्रीम.मोकल, सुविधा दवटे आदि उपस्थित होते.जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाने १९८९ साली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. व पहिला लोकसंख्या दिन ११ जुलै १९९० रोजी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने सूचित केल्यानुसार नियोजित उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असून २७ जून ते १० जुलै या दरम्यान “दांम्पत्य संपर्क पंधरवडा” साजरा करण्यात आला व ११ जुलै ते २४ जुलै दरम्यान “लोकसंख्या स्थिरता पंधरवडा” साजरा करण्यात येणार असल्याबाबत प्रास्ताविक करताना निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे यांनी सांगितले. तर प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन यांनी २०२४ च्या लोकसंख्या दिनाचे शीर्षक (थीम) “माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा” व घोषवाक्य “ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दांपत्याची” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. तसेच अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे या करिता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी अलिबाग शहरामध्ये जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले तर समारोप प्रसंगी श्रीम.सारिखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनीनी पथनाट्यातून जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केल तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका गावंड, काजल भोईर, कांचन खारकर, मयूर हांडे व निलेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. 00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ माथेरान मधील समस्त महिला वर्गाला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून ह्या महत्वपूर्ण कार्यास येथे सोमवार दि.७ पासून…

नवीन ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात येणार अधिक पारदर्शकता- सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड     रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई-केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण, ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा. 00000

नवीन ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात येणार अधिक सुलभता आणि पारदर्शकता- सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई-केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण, ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा.

वरंध घाट ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद-किशन जावळे

रायगड :रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड-वरंध घाट हा रस्ता कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. रायगड जिल्हा हद्दीतील…