Category: रायगड

raigad news and updates

एनडीआरएफच्या प्रशिक्षणचा उपयोग नवी मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी – शरद पवार

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी होणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.* जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात ते स्पृहनीय असल्याचे सांगत त्यांनी एनडीआरएफमार्फत आज मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. अनिता जवंजाळ, यशदाचे मुख्य प्रशिक्षक योगेश परदेशी तसेच एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंडे उपस्थित होते. पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले. २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकणाव्दारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहका-यांसह प्रात्याक्षिके दाखविली. आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

‘खरीप हंगाम २०२४’ पिकस्पर्धेसाठी शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा – रविंद्र बिनवडे

अशोक गायकवाड       रायगड : खरीप हंगाम २०२४ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वार्डावण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै दूसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती, जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची काग पत्रे – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमाकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुकापातळी सर्वसाधारण व आदिवासी गट रुपये पहिले ५ हजार, दुसरे ३ हजार, तिसरे २ हजार, जिल्हापातळी पहिले १० हजार, दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार, राज्यपातळी पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार, तिसरे ३० हजार. खरीप हंगाम सन २०२४ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

वृक्षारोपण आणि संवर्धन ही सर्वांची नैतिक जबाबदारी-उमेश जंगम

माथेरान : माथेरान मध्ये सुध्दा यावर्षी उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. त्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली असून आम्ही यांचे संगोपन करणार आहोतच परंतु सर्व नागरिकांनी…

जिल्ह्यात ४ हजारांच्या वर संवादक कुटुंबांना भेटी देऊन संवाद साधणार – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व निळा सुका अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियान ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ५ असे ४ हजार ४५ संवादक कुटुंबांना गृहभेटी घेवून संवाद साधणार आहेत. त्यानुसार कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन मध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखलें यांनी केले आहे.* शास्वत स्वच्छतेसाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृह भेटीच्या माध्यमातून जनजागृती साठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक घराना भेटी देऊन ओला, सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन बाबत माहिती देतील..यासाठी जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार ४५ संवादक कार्यरत राहतील. संवादक म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती,,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका,गट समन्वयक, जल सूरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. अभीयान अंतर्गत संपादकांनी गावातील सर्व कुटुंबाना‌ भेटी देऊन अभियानाची माहिती द्यायची आहे. गाव पातळीवर स्वच्छतेची लोक चळवळ उभी करण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे. दर आठवड्याला राज्य स्तरावरून गृह भेटीचां आढावा घेण्यात येणार आहे.

माथेरानच्या पेमास्टर पार्क पर्यंत ई रिक्षाची सुविधा द्या रहिवाशांची मागणी

माथेरान : माथेरान मध्ये सर्वांसाठी ई रिक्षाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.अनेक आव्हानांचा सामना करत,त्याचप्रमाणे काही लोकांचा वेळप्रसंगी विरोध पत्करून कोणत्याही परिस्थितीत माथेरानला विकासाकडे नेण्यासाठी ई रिक्षाच्या सुविधेला समस्त…

अभ्यासू वृत्ती, जिज्ञासा, खडतर मेहनत, प्रचंड वाचन हे प्रज्ञा पोवळे हिच्यात उपजत गुण – कुमार केतकर

  अशोक गायकवाड     रायगड :अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा ‘ज्ञान’ संपादन करण्यांची’ जिज्ञासा ‘खडतर मेहनत प्रचंड वाचन हे गुण खूपच आवश्यक असताना हे सर्व गुण प्रज्ञामध्ये आई-वडीलाकडून उपजत लाभल्याने तिच्या…

मिशन माथेरान सोशल ग्रुपच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

    माथेरान : स्व.मीनाक्षी तमीळ आमुधन यांच्या स्मरणार्थ दि.७ रोजी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत येथील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्ट, सेंट झेव्हियर स्कुल आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेतील सर्व शालेय…

बँक ऑफ इंडियाच्या थकीत कर्जदारांना कर्जमुक्त होण्याची सुवर्ण संधी – मुकेश कुमार

  अशोक गायकवाड     रायगड : ज्यांची खाती थकीत नॉन परफॉर्मिंग असेटस् (NPA) आहेत त्यांनी गुरुवार, ११ जुलैला थकीत नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) कर्ज खाती तडजोड करून या सुवर्ण…

चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

     वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले       उरण : शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे आक्कादेवी बांधार काठोकाठ भरला आहे. त्यामुळे रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येऊन वर्षा पर्यटनाचा…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात अडीच कोटीहुन अधिक महिलांना लाभ मिळणार-अदिती तटकरे

  अशोक गायकवाड     रायगड :’मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात अडीच कोटीहुन अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखाहुन अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनीं पर्यंत…